मुंबई : महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मुंबई, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि उत्कर्ष व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला व पुरुष, ज्युनियर आणि सिनियर अनइक्युप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिला गटात नवी मुंबईची सना अशपाक मुल्ला, ज्युनियर विभागात मुंबई उपनगरचा रोहित पाटेकर आणि सिनियर पुरुष गटात दि मुंबईचा मनोज मोरे यांनी “सर्वोत्तम लिप्टर”चा मान मिळवला. सिनेकलावंत शशिकांत खानविलकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचा बक्षिस समारंभ आरएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय राऊत आणि महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मुंबईचे मानद सचिव सैदल सोंडे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे सर्वसाधारण महिला गटाचे सांघिक विजेतेपद मुंबई उपनगर संघाने मिळवले.
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते
ज्युनियर मुली : ओवी सैदल सोंडे, सलोनी पांचाळ, पूर्वा सावंत, रिया गुजर, वाश्रवी देवलेकर, प्रणाली हुमाले
सिनियर महिला : श्रिया यादव, शागुप्ता अफसाना शेख, प्रियांका जसानी, सना अशपाक मुल्ला, अमिशा
ज्युनियर मुले : अजय थेरडे, करण अर्जुन रेवर, सिद्धार्थ निलेकर, रोहित पाटेकर, महादेव कबीर, सोहम राठोड
सिनियर पुरुष : प्रसाद कदम, जयदीप मोरे, किरण जगदाळे, अक्षय कारंडे, कुणाल राठोड, सागर महाडेश्वर, मनोज मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *