कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीटने सपाट न करता खोदलेल्या स्थितीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज खड्ड्यांचा त्रास होत आहे.

लांबलचक आकाराच्या या खोदलेल्या चऱ्या, खड्डे प्रेम ऑटो चौक येथे स्मशानभूमी समोर, बिर्ला महाविद्यालय रस्त्यावर आहेत. कल्याण रेल्वे स्थानकाकडून शहाडमार्गे मुरबाडकडे जाणारी आणि येणारी वाहने प्रेम ऑटो चौकातून बिर्ला महाविद्यालयमार्गे ठाणे, मुंबईकडे जातात, काही कल्याण रेल्वे स्थानकाकडे, शहरात येतात. सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणून प्रेम ऑटो चौक ओळखला जातो.

गेल्या दहा दिवसांपासून या चौकात लांबलचक आकाराच्या चऱ्या खोदण्यात आल्या आहेत. तेथे काही कामे करण्यात आली. या कामानंतर खोदलेल्या चऱ्या आहे त्या स्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून वाहन नेताना चालकाला कसरत करावी लागते. वेगात वाहन असेल तर ते या खड्ड्यात आपटून पुढे जाते. त्याचा वाहनातील प्रवाशांना त्रास होतो. एसटी बसमधील प्रवासी या खड्ड्यांमुळे बसमध्ये हेलपाटले जातात. रुग्णवाहिका चालकाला या भागातून रुग्ण नेताना काळजी घ्यावी लागते. या खड्ड्यांच्या समोर पालिकेची वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. विविध भागातून नागरिक पार्थिव घेऊन येथे येतात. त्यांनाही या खड्ड्यांचा त्रास होतो. बिर्ला महाविद्यालय, योगीधाम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी वाहू बस याच चौकातून येजा करतात. त्यामुळे विद्यार्थीही या खड्ड्यांनी त्रस्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *