राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम

 

कल्याण : नुकतीच पारोळा केंद्र समुहातील शाळांची डिसेंबर महिन्याची शिक्षण परिषद जि प उच्च प्राथमिक शाळा क्र २ पारोळा येथे गुणवत्तापुर्ण व उत्साहवर्धक वातावरणात केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शाळेतील शिक्षिकांनी शिक्षणाचे महत्व सांगणारी भव्य सुंदर व आकर्षक रांगोळी शाळेच्या प्रांगणात साकारून सर्वांचेच लक्ष आकर्षित केले.
शाळेच्या विदयार्थीनींनी अगळया वेगळ्या पद्धतीने व विविध वेशभुषा परिधान करीत ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. आपण सदैव ज्या पर्यावरणात जीवन जगतो ते स्वच्छ, सुंदर, निर्मल असले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेपासुनच बालकांच्या मनावर पर्यावरण जतन, रक्षण व संवर्धन हे ध्येय बिंबविण्याचा शाळा शिक्षकांचा प्रयत्न दिसुन आला. झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा ही नाटिका अतिशय प्रबोधन करणारी विदयार्थ्यांनी सादर करून याबाबत जागृती केली.
या सर्व २५ गुणवंत विद्यार्थ्यांना जि प शाळा क्र ३ पारोळा शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी आपल्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रम अंतर्गत रायटिंग पॅड देवुन प्रोत्साहित केले. शिक्षण परिषदेत अपेक्षित विषयांवर चर्चेत सर्वच शिक्षक यांनी सहभागी होवुन आपले त्या त्या विषयानुसार अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्याक रविंद्र पाटील, मंगला शिवदे, किशोर पाटील, मोहन बागुल, स्वाती देवरे, शितल पाटील, मयुरी पाटील, मंगला पाटील, स्नेहल वराडे, विठोबा महाजन या शिक्षकांनी विदयार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम बसवुन शिक्षण परिषदेचे उत्कृष्टपणे आयोजन केले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *