ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २ जानेवारी ते ३ जानेवारी या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, कळवा येथे आयोजित करण्यात आला आहे. विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असून या विषयानुरूप विद्यार्थ्यां मार्फत ११० प्रदर्शनीय साहित्याची मांडणी केली जाणार आहे.
महानगरपालिका व तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाला पूरक असे विशेष प्राविण्य प्राप्त व समाजासाठी उपयुक्त असे प्रकल्प जिल्हा स्तरावरील प्रदर्शनामध्ये मांडणी केले जाणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक यांनी या विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन नवीन संकल्पना व प्रतिकृतींची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. या प्रदर्शनात इयत्ता ६ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.  माध्यमिक, प्राथमिक, आदिवासी, दिव्यांग, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. जिल्हास्तरासाठी निवड झालेल्या सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.अन्न, आरोग्य आणि स्वच्छता (A Food, Health and Hygiene), वाहतुक आणि दळणवळन (Transport And Communication), नैसर्गिक शेती (Natural Farming), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical Modeling and Computational Thinking), कचरा व्यवस्थापन (Waste Management), संसाधन व्यवस्थापन (Resource Management) या विषयावरील  प्रदर्शनामध्ये ११० प्रदर्शनीय साहित्याची मांडणी केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *