ठाणे : मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांचे विनामूल्य प्रदर्शन ठाणे पूर्व येथील महापालिकेचे खुले कलादालनात संपन्न झाले. प्रदर्शनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मंडलिक यांनी हस्ते केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक सावंत हे आवर्जून उपस्थित होते.
प्रदर्शनात महाराष्ट्रातून विविधांगी सुमारे २५० हून अधिक दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दिवाळीअंक वाचकांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती.
निशिकांत महांकाळ, विनोद भोईर, हेमंत आळवे, विनोद ठाणेकर आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दिवाळी अंकांची माहिती व महती सांगून संस्था हा उपक्रम अनेक वर्ष एक सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक लोकांना निदान एकाच ठिकाणी चाळता यावेत, हाताळता यावेत यासाठी संस्था हा उपक्रम अनेक वर्ष राबवीत आहे असे प्रतिपादन केले. स्वराज सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.