मुंबई : पुरस्कार प्राप्त मानकरी : मंगेश मोरे (दै. सामना), घन:श्याम भडेकर (ज्येष्ठ पत्रकार),सचिन लुंगसे (दै. लोकमत), विनोद राऊत (दै. सकाळ), पांडुरंग म्हस्के (दै. सकाळ) मुंबई, गुरुवार : मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दरवर्षी पत्रकार दिनी दि. ६ जानेवारी रोजी दिले जाणार आहेत. विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण यांनी जाहीर केले. सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :
पुरस्कारांचा तपशील
१. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री. मंगेश मोरे
२. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणार्या पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक : श्री. घन:श्याम भडेकर
३. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार : श्री. सचिन लुंगसे
४. विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार : श्री. विनोद राऊत
५. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार : श्री. पांडुरंग म्हस्के
हे पुरस्कार महनीय प्रवक्ते श्री. महावीर जोंधळे यांच्या हस्ते सोमवार, दि. ६ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथे आयोजित पत्रकार दिन समारंभात दिले जाणार आहेत.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह श्री. शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.
०००००