रिझर्व्ह बँकेचा निर्णय, डिजिटल पेमेंटच्या कक्षेत नवी क्रांती
मुंबई : आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण यूपीआय वापरतो, इतकी याची व्याप्ती आता विस्तारली आहे. डिजिटल पेमेंटच्या याच कक्षेत आजपासून नवी क्रांती येत आहे. आजपासून यूपीआय नियमांबाबत मोठा बदल झाला असून रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार यूजर्स आता कोणत्याही यूपीए अॅपचा वापर करून डिजिटल वॉलेटद्वारे पैसे देऊ शकतात. याचा सर्वात मोठा फायदा असा असेल की, कोणत्याही एकाच अॅपवर अजिबात अवलंबून राहावे लागणार नाही.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण केवायसी म्हणजेच नो यूवर कस्टमर अपडेट करणे आवश्यक आहे. पीपीआयधारक त्यांचे इन्स्ट्रुमेंट जसे की गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीमसारख्या यूपीआय अॅप्सशी लिंक करू शकतात. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच फीचर फोन यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता यूपीआय १२३ पे वापरून १० हजार रुपयांपर्यंतचे यूपीआय पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. पूर्वी ही मर्यादा ५ हजार रुपये होती. रिझर्व्ह बँकेने यूपीआय ट्रान्सॅक्शन आणि वॉलेट पेमेंटच्या लिमिट बदलल्या आहेत. ही लिमिट वाढवण्यात आली आहे. नवीन नियमानुसार लोक आता यूपीआय १२३ पे वापरून ५ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतील. आता प्रीपेड वॉलेट फोन पे, यूपीआय आणि पेटीएम वापरणे सोपे झाले आहे, परंतु या नवीन नियमाचा फायदा घेण्यासाठी वॉलेटचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि वॉलेट अॅपशी लिंक असणे आवश्यक आहे.
000000