सखोल स्वच्छता मोहीमेत

नवी मुंबई : शहरातील प्रदुषणाला आळा बसावा व हवा गुणवत्ता चांगली राहावी यादृष्टीने सखोल स्वच्छता मोहीमांचा पंधरवडा महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार 13 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असून 30 डिसेंबर पासून या मोहीमांना प्रभावी रितीने सुरुवात करण्यात आलेली आहे.
यामध्ये ब्रशझाडू, फ्लीपर मशीन यांच्या सहाय्याने रस्ते, पदपथ, दुभाजक या ठिकाणी साचलेली धूळ, माती यांची सखोल सफाई करण्यात येत असून त्यानंतर फॉगर्स मशीनव्दारे मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द झालेले प्रक्रियाकृत पाणी वापरुन स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे रस्ते स्वच्छतेप्रमाणेच हवेतील धूळीचे प्रमाण कमी होउुन हवा गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत आहे. नागरिकांकडून या डीप क्लीनिंग मोहीमेचे मोठया प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी बेलापूर विभागात पारसिक हिल या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांनी स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगातून सखोल स्वच्छता केली. विशेष म्हणजे या मोहीमेत एसआयइएस महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
नेरुळ विभागात सहा.आयुक्त  जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्रशांत कॉर्नर ते राजीव गांधी उड्डाणपूल ते वझीराणी स्पोर्टस्‍ क्लब पर्यंत रस्ते सफाई करण्यात आली. तुर्भे विभागात सहा.आयुक्त प्रबोधन मवाडे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली कोपरी तलाव परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली.
अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मुख्य रस्ते, त्याबाजूचे पदपथ व त्यामधील दुभाजक यांच्या कडेला जमिनीशी घट्ट झालेली माती व धूळ यांची ब्रश झाडूने स्वच्छता मित्रांनी सखोल स्वच्छता केली व त्यानंतर फॉगींग मशीनाव्दारे प्रक्रियाकृत पाणी मारुन रस्ते व पदपथ स्वच्छ करण्यात आले. उदयाही सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले असून यामुळे वातावरणातील धूळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून या मोहीमेचे नवी मुंबईकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *