स्वराज्य संघटनेचा पुढाकार

 

उल्हासनगर : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ॲड.जय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करणाऱ्या स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून मागच्या महिन्यात सप्तखंजेरी निर्माते, राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी खंजेरीच्या तालात स्वराज्य संघटनेचे उद्घाटन केले होते.

नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्यावर ॲड.गायकवाड यांनी संघटनेच्या वतीने गोरगरीब,गरजूंच्या कायदेशीर सल्ल्यासाठी मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू केले असून त्यात 23 वकिलांचे पॅनल सज्ज करण्यात आले आहे.

15 डिसेंबर रोजी हजारोंच्या उपस्थितीत सत्यपाल महाराज यांच्या हस्ते स्वराज्य संघटनेचे उद्घाटन झाल्यावर संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड यांनी गरीब,गरजू नागरिकांसाठी व अत्याचार पिडीत महिलांसाठी विधी विभागाच्या वतीने”मोफत कायदेशीर सल्ला केंद्र”सुरु केले आहे.

त्यात ॲड.कल्पेश माने,जय गायकवाड, सचिन खंडागळे,वर्षा कांबळे,प्रियेश जाधव,दिपक अहिरे,राहुल बनकर,नितीन घार्गे,रुपेश उबाळे,विजेंद्र चांदणे,प्रगत दोंदे,निलेश धिवरे,सचिन वाघमारे,निखिलेश आसरानी,ओम कराड,मार्शल नाडर,सन्नी सिंह,पूनम पांडगळे,सुप्रिया बागुल,सुधीर पंडित,अंशू गुप्ता,संस्कार शिंदे,जगदीश चिकणकर या 23 वकिलांच्या पॅनलचा समावेश आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *