मुंबईत सूफी परिषदेत विचारवंतांचा मत
मुंबई : मानवतेच्या कल्य़ाणासाठी आयुष्य व्यतित केलेल्या हजरत अल्हाज ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह हसनी यांचा उरूसनिमित्ताने सज्जाद नसीन डॉ. सूफी फैजुल हसन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अॅण्टॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया येथे सूफी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सज्जाद नसीन डॉ. सूफी फैजुल हसन शहा यांची यावेळी उपस्थिती होती.
स्वतःचा स्वार्थ विसरून ज्यावेळी मनुष्य इतरांसाठी सेवाभाव धारण करतो, तेव्हा त्याचे परमेश्वराशी नाते जोडले जाते आणि जीवन सार्थक होते, मन आतून आणि बाहेरून शुद्ध ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजेत, असे विचार मौलाना अर्शद निझामी यांनी व्यक्त केले.
अखिल मानवतेच्या कल्याणार्थ खलिफांचे मार्गदर्शन हे त्यांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे सूफी विचारानुसार ते हे कार्य करू शकतील. ही शिकवण देण्यासाठी खानकाह (आश्रम) महत्वाचे स्थान आहे. कारण प्रत्येक श्रद्धाळू इथे येऊन एक चांगला विचार नेत असतो, असे विचार मौलाना मौलाना मुफ्ती यांनी व्यक्त केले. हजरत मौलाना असगर अली अशरफ यांचे चिश्ती सूफी संत आणि तर धर्मीयांशी त्यांचे ते तर इंग्रजी भाषेत फैझल फैझी यांचे तस्सवूफ-सूफीझम या विषयावरील मार्गदर्शन झाले. सूफी हकीम वसी यांनी सूफी पंथाचे महत्व सांगितले. या परिषदेचे सूत्रसंचालन सूफी अब्दुल्ला मजीदी यांनी केले.