नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरल्याने दृश्यमानता कमालीची घटली. त्यामुळे किमान २५ रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यांत धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती. जम्मू-काश्मीरात काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. श्रीनगमध्ये गोठणबिंदूच्या वर तापमानाची नोंद झाली. हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
- पंजाब व हरयाणा राज्यामध्ये मंगळवारीदेखील कडाक्याची थंडी पसरली होती. गुरुदासपूर जिल्ह्यात सर्वात कमी ५ अंश सेल्सिअस तापमानाची होते.