महेंद्र सातपुते
मुंबई- मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्‌घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. जय जिनेंद्र को-ऑप. हौसिंग सोसायटी, शॉप नं -०६, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उद्‌घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून घाटकोपर विधानसभेचे पराग शहा, माजी मंत्री प्रकाश मेहता, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, शरदचंद्र पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती निमंत्रक व मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर, उपाध्यक्ष अंकुश मोरे, समाजसेवक सुभाष पवार व मुंबई हौसिंग फेडरेशनचे संचालक अजय बागल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *