जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहभाग घेतला. जालना येथील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. अति दगदगीमुळे तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असून त्यांना सलाईन लावण्यात आली असून उपचार सुरु आहेत.