आर्ट स्पॅशच्यावतीने आयोजित
ठाणे : आर्ट स्पॅशच्यावतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आर्ट एक्झीबीशनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेक विविध कलाकृती रंगविल्या.
आर्ट स्पॅशच्या संचालिका आणि कला शिक्षक नंदा भोसले यांनी समाजसेविका जयश्री शेळके यांच्यासहकार्याने हे प्रदर्शन घोडबंदर रोड येथील हावरे सिटी रोड वरील बिट्स या कलादालनात आयोजित केले होते. 5 ते 55 वयोगटातील ८० विद्यार्थी आणि शिक्षकांनी या प्रदर्शनात भाग घेत विविध कलाकृती साकारल्या. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रदर्शनाला माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी भेट देत विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.