भाविकांना कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण
ठाणे : जीवनविद्या मिशन आयोजित 56 वा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा शनिवार दिनांक 18 जानेवारी व रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत जे. के. ग्राम ग्राउंड, पोखरण रोड 1, कॅडबरी कंपनीच्या समोर, ठाणे (प.)-400606 येथे साजरा करण्यात येणार आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र प्रबोधक श्री प्रल्हाद वामनराव पै (B. Tech IIT मुंबई (Powai ), MAM, TQM Japan) “सर्व सुखी सर्व भूती….” या विषयावर रात्री 8 ते 9 या वेळेत प्रबोधन करणार आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संतानी या भूमीत राहून जनकल्यानाचे कार्य केले. त्यातील एक संत म्हणजे “ज्ञानेश्वर माऊली”.
ज्ञानेश्वर माऊलीं विषयी कृतज्ञता म्हणून जीवनविद्या मिशन तर्फे गेली 55 वर्ष “ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा” म्हणून महाराष्ट्राच्या विविध शहरात साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला अगदी लहान मुलांपासून, तरुणांपर्यंत आणि वृध्दांपर्यंत सर्वांचीच जवळजवळ हजारोंच्या संख्येने उपस्थिती असते.
अगदी सर्वांनाच म्हणजे आताच्या काळातील युवांनाही या कार्यक्रमातून जीवनाला उपयुक्त असे मार्गदर्शन लाभणार आहे.
जीवनविद्या मिशन तर्फे महाराष्ट्रातील प्रत्येकाला “श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा” कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण आहे., या सोहोळ्यास विनामूल्य प्रवेश असून लाभ अमूल्य असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
00000