माथाडी कामगार मेळावा संपन्न

राजेंद्र साळसकर

मुंबई-महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस, माजी आमदार व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा ५० वा वाढदिवस नुकताच विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवीमुंबई याठिकाणी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात साजरा करण्यात आला.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री मा.ना.गणेशजी नाईक, माजी मंत्री व युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनोज जामसुतकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, आनंद पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. भारतीताई पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, नरेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी व प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील आदी मान्यवर आणि माथाडी कामगार -कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, फाम असोसिएशनचे मोहन गुरनानी, सिनेस्टार, राजकीय नेते यांनी दुरध्वनी व व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी वन मंत्री गणेशजी नाईक, माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे व आमदार निरंजन डावखरे यांनी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना दिर्घायुष्य व पदोपदी यश मिळण्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.

कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची माथाडी व मराठा समाजाला न्याय मिळण्याची चळवळ पुढे नेण्याचे व या घटकाला न्याय मिळण्यासाठी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा युवकांना उद्योजक करण्याचे कार्य सातत्याने चालू ठेवण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *