ठाणे : निवृत्तीनंतर आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा समाजाला व्हावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम राबवताना गेली २९ वर्षे तुम्हीं दिलेल्या साथीमुळेच ते शक्य झाले, त्यामुळे तुम्हीं होतात म्हणून मी आहे असे भावपूर्ण मनोगत ७५ वर्षीय अनंत कदम यांनी व्यक्त केले.
कुठल्याही कर्मचाऱ्याला निवृत्ती, बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती हे नवीन नाही. पण वरील गोष्टीमुळे निंर्माण होणार दुरावा वार्षिक स्नेहसंमेलनतून निघून जावा म्हणून बँक ऑफ इंडियाच्या काळबा देवी शाखेने १९९६ साली हा उपक्रम सुरु केला. यंदा या मित्र मेळाव्याचे २९ वे वर्ष होते. पहिल्या वर्षांपासून अनंत कदम हे या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आले आहेत. सुरुवातीला स्नेहसंमेलनाचे स्वरूप असलेल्या या मित्र मेळाव्याला मागील काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली. सुरुवातीच्या काळापासून मित्र मेळाव्यात सहभागी होणाऱ्या १०६ अधिकारी,कर्मचाऱ्यांना देवाज्ञा झाली. यावर्षी ५५ महिला आणि पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गतवर्षी दिवंगत झालेल्या १० सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ८० वर्षीय अविनाश दांडेकर, शरद हर्डीकर, प्रल्हाद नाखवा, सहाय्यक व्यवस्थापक सतीश प्रभू यांनी वेगवेगळ्या उपक्रमाचा आढावा घेत आठवणीना उजाळा दिला नायर सभागृहात झालेल्या या मित्र मेळाव्यात मुंबई मॅरेथॉनमधील ४.५ किलोमीटर अंतराची वॉकथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ७५ वर्षीय बलराम मेनन यांना यावेळी गौरवण्यात आले.शंकर नांदोस्कर ( जय गंगे भगिरथी ), अश्विनी राणे (संय्या मिलके जाना रे), सुलभ अय्यर (एका तळ्यात होती बदके साथ ), यक्षा धुलधोया (जीना इसिका नाम है ) यांनी स्वरमैफलित रंग भरले. सतीश प्रभू यांनी आभार प्रदर्शन करताना पुढील वर्षी ३० वे वर्षे साजरे करताना वेगळे उपक्रम घेऊन अनंत कदम आणि छायाचित्रकार नरु शहा तयार असतील असे सांगितले.