कल्याण : कल्याणपूर्वेतील समाजसेवक कृष्णा पाटील यांना आपल्या सामाजिक कार्याबद्दल पुढारी वृत्तपत्राच्या वतीने कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे कृष्णा पाटील हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून, गोर गरिबांनाच्या मदतीला धावून जाणे, अनाथ आश्रमाला मदत करणे, गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, सार्वजनिक मंडळांना विविध सण उत्सवासाठी मदत करणे आदी अनेक प्रकारे नगरिकांच्या सुख दुखात धावून जात असतात. पाटील यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना डोंबिवली येथील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याहस्ते कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.