कल्याण : १ ते ७ फेब्रुवारी वनवणवा सप्ताह साजरा करून सर्वत्र जनजागृती केली जाते. जंगलातील मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक कारणांमुळे आग लागण्याचे घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. जंगलाला आग लागून झाडं नाहीसे होत आहेत त्यावर अवलंबून असलेली पक्षांची घरटी, ढोली व त्यांची अंडी थोडक्यात वन्यजीवन आणि वनसंपदा नष्ट होऊन वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ठाकुर्ली येथील मंजुनाथ महाविद्यालय येथे आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर वनवणवा, आगीची कारणे, साहित्यांचे आधारे आग विझविणे इ. यासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
तसेच प्रथोमचार पेटी मधील त्रिकोणी पट्टी, बॅडेजचा वापर करणे, कृत्रिम पद्धतीने स्ट्रेचर बनविणे याविषयावर वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी प्राध्यापिका निशा देवधर, माधुरी महाराव तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक, विद्यार्थी वर्ग, शिक्षकवृंद व महाविद्यालयीन अन्य कर्मचारी उपस्थीत असल्याची माहिती प्रशिक्षण मार्गदर्शक सुहास पवार यांनी दिली.