गोंदिया : गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हनुमंत कथा महोत्सवा’च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराजांचे मार्गदर्शन घेतले तसेच त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. सद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात मन प्रसन्न झाल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

या महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे अर्धातास हनुमान कथा श्रवण केली. हनुमान चरित्रातील भक्ती, शौर्य, निष्ठा आणि सेवा या मूल्यांवर आधारित कथाकथनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. मुख्यमंत्री फडणवीस हे संपूर्ण वेळ कथेत तल्लीन झालेले दिसून आले.

हनुमंत कथेमधून समाजाला आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मक विचार आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

हनुमंत कथा महोत्सवामुळे गोंदिया परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *