विरोधकांची युती स्वार्थासाठी झाली आहे
उल्हासनगर- (सुनिल इंगळे) उल्हासनगर महानगर निवडणुकीत विरोधकांची युती ही स्वार्थासाठी झालेली आहे. परंतु आपल्याला ही निवडणूक भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी जिंकायची आहे. यावेळी भाजपचा महापौर होणार असून पन्नास जागांवर विजय मिळेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना व्यक्त केला.
मतदान पंधरा जानेवारीला होणार असून आपल्याकडे वेळ कमी आहे त्यासाठी कार्क्रत्यांनी चौवीस तासापेकी सोळा तास काम करावे. काही लोक आपल्या स्वार्थासाठी पार्टी सोडून गेले त्याचा त्यांना पश्चाताप होणार. केंद्रात व राज्यात एकाच पार्टीची समविचारी सत्ता असल्याने विकास जोमात होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवाभाऊंची  विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवा. कमळाला मत विकासाला मत, कमळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत. भारतीय जनता पार्टी ही सर्व समस्यांचे उत्तर आहे. उल्हासनगरातील गुंडागर्दी संपवण्यासाठी कमळाला मत देण्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले.
सदर कार्यकर्ता मेळाव्यास आमदार कुमार आयलानी, शहर अध्यक्ष राजेश वाधारिया, मीना आयलानी, नरेंद्र राजानी, लाल पंजाबी, प्रदीप रामचंदणी, अर्चना करंकाळे, मंगला चांडा, प्रशांत पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *