कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त
कल्याण : पु.ल. कट्टा कल्याण ही साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून पु ल कट्याने सन २००६ साली पोलिसातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून पोलीस प्रतिभा संमेलनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते तर समारोप गृहमंत्री आर आर पाटील यांनी केले होते. तर सदर संमेलनाचे अध्यक्षपद पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांनी भूषविले होते. २०२५-२०२६ हे वर्ष कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून पुल कट्ट्याने नारायण सुर्वे यांना अभिवादन करण्याकरिता विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कोणत्याही कवितेवर आधारित “ रंग तुमचे, शब्द नारायण सुर्वेचे “ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि चित्रकला स्पर्धा १) शालेय गट इयत्ता ८ वी ते १२ वी २) महाविद्यालयीन पदवी, पदवीका आणि ३) खुला गट अन्य सर्वांसाठी अशा तीन गटात होणार असून स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धाकांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कोणत्याही एका कवितेवर आधारित चित्र १२×१८ इंच कागदावर काढून डीपी मध्ये स्कॅन करून pulkatta20@gimail.com या ईमेलवर ज्या कवितेवर आधारित चित्र आहे त्या कवितेसह १५ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवावे असे आवाहन पु ल कट्टा संयोजक प्रा. महेंद्र भावसार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८६९८६९८४४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
00000000
