मुलाचे तिकीट कापल्यामुळे नाराज० एन निवडणूकीच्या धामधुमीत सुर्वे गायब० एकनाथ शिंदेचा सुर्वेंवर भडकले ० पक्षशिस्तीतीचा बडगा उगारला जाणार ?

स्वाती घोसाळकर

मुंबई: मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाराजी नाट्यास सामोरे जावे लागत आहे. मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे आधीच नाराज असलेले मागाठाणेचे शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आता मुलाचे तिकीट कापल्यामुळे पक्षनेतृत्वावर संतप्त झाले आहेत. एन निवडणूकीच्या धामधुमीत ते नॉटरिचेबल झाल्यामुळे एकनाथ शिंदेही भडकल्याचे सुत्रांची माहिती आहे.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर असल्याची तक्रार मागाठाण्यातील महायुतीच्या उमेदवारांनी केली आहे. यामुळं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे प्रकाश सुर्वे यांच्यावर भडकले असल्याची माहिती आहे.

प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक पाच मधून इच्छुक होता. त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. राज सुर्वे याला माघार घ्यायला सांगत त्याची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी संजय घाडी यांना जाहीर केली. मुलाला उमेदवारी देऊ न शकल्यामुळे सुर्वे नाराज आहेत. सुर्वे यांच्या मुलावर काही महिन्यापुर्वी खंडणी आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल झाले होते.

प्रकाश सुर्वे यांचा विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ३, ४ आणि ५ च्या उमेदवारीवरुन शिवसेनेत मोठा असंतोष होता. वॉर्ड क्रमांक  ३ भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर याच्यासाठी सोडण्यात आला. वॉर्ड क्रमांक चार मधून मंगेश पगारे निवडणूक लढवत आहेत. तर, वॉर्ड क्रमांक ५ मध्ये आता संजय घाडी निवडणूक लढवत आहेत.

 मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये होणाऱ्या महायुतीच्या प्रचारापासून प्रकाश सुर्वे दूर असल्यानं त्यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. या विभागातील उमेदवारांनी त्याबाबत अधिकृतपणे शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते.

दरम्यान, एकीकडे प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला तिकीट नाकारतानाच मुंबईत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या प्रभादेवीत मुलाला आणि मुलीलाही तिकीट देण्यात आले आहे. कुर्ल्यात आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मुलाला देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागा लढवित असून त्यापैकी ६ जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *