आनंदवाडी येथे संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
कल्याण: कल्याण पूर्व आनंदवाडी येते संत शिरोमणी रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४९ वी जयंती मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने रविवारी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्याहस्ते मोठ्या भक्तिभावात पार पडला.
या जयंती उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक केडीएमसी दवाखाना, गणपती मंदिर, कोळसेवाडी, उतेकर बिल्डिंग, दुर्गामाता मंदिर, डबल टॉवर मार्गे आनंदवाडी येथील नव्या समाज मंदिरापर्यंत नेण्यात आली असून मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंत्रोच्चार व विधीपूर्वक संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूजन करण्यात आले.
यावेळी सुरेश पवार, सोनी क्षिरसागर, संदीप क्षीरसागर, भैरवनाथ वाघमारे, प्रकाश लांडगे, सोमनाथ राऊत, कविता रुपवते, मंगल गायकवाड, ललीता साबळे, वंदना नायडू, रेखा चंद्रे, रेश्मा शिरकर, रेखा साळे, अस्मिता गायकवाड, मंगल बनसोडे, कलावती शेवाळे, विठाबाई धनशेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
