इथे मृत्यू ओशाळला…

इस्त्रालयने इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १५३ विद्यार्थिनींच्या अंत्ययात्रेत हजारोंनी सहभाग घेतला.

तेहरान : इराणमधील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब प्रायमरी स्कूलवर शनिवारी अमेरिका-इस्रायली हवाई व क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १५३ शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्या होता. आज या मुलींना एकत्रित रित्या दफन करण्यात आले. त्यांच्या अंतयात्रेला हजारो इराणी नागरिकांनी सहभाग घेत आपल्य सहवेदना व्यक्त केल्या. १५३ निरपराध मुलींच्या मृत्यबद्दल जगभरातून रोष व्यक्त करण्यात आला असून युनोनेही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे.

 ‘युनेस्को’ने या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणासाठी समर्पित ठिकाणांवर हल्ले करणे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत युनेस्कोने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसला पाठवलेल्या अधिकृत पत्रात या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या हितांचे रक्षण करणे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सागरी व्यापाराचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करणे आणि प्रादेशिक मित्र राष्ट्रांच्या सामूहिक स्वसंरक्षणासाठी हे हल्ले करण्यात आले.

ट्रम्प यांनी पत्रात स्पष्ट केले की, अमेरिकन सैन्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळे, सागरी खाण क्षमता, हवाई संरक्षण प्रणाली आणि कमांड-अँड-कंट्रोल केंद्रांवर अचूक हल्ले केले. हे हल्ले अमेरिकेच्या सैन्याचे संरक्षण, राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण आणि इस्रायलसह प्रादेशिक मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *