रहिम खान – काजल कुमारी अंतिम जेते
राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम…
Mumbai news
राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम…
द.आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई : दक्षिण अफ्रिकेतील 86.6 किलोमीटर अंतराच्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी होत निर्धारित वेळेच्या आधीच ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात अंतर पूर्ण करून नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात उंचावला आहे. कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल 86.6 किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर मेहनत घेत असतात. यावर्षी 9 जून रोजी ही 97 वी मॅरेथॉन डर्बन येथून सुरू होऊन पीटरमार्टिझबर्ग शहरात संपन्न झाली. यावर्षीची मॅरेथॉन अपरन अर्थात चढणीची होती. एक वर्ष डाऊन रन आणि एक वर्ष अपरन अशी कॉम्रेड मॅरेथॉन असते. यावर्षी 5923 फूट उंचीचे 86.6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 74 हून अधिक देशातील 22 हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये 366 भारतीय स्पर्धकांचा समावेश होता. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर असलेल्या हे अंतर पार करताना 20 ते 25 टेकड्या चढाव्या लागतात. ही स्पर्धा 12 तासांच्या आत पूर्ण करावी लागते. डॉ. कैलास शिंदे यांनी 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात हे अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता सिध्द केलेली आहे. त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून डॉ. कैलास शिंदे कसून सराव करत होते. प्रामुख्याने सुट्टीच्या दिवशी त्यांनी रात्री व पहाटे सराव करून मॅरेथॉनच्या अंतराचे व वेळेचे व्यवस्थित नियोजन केले. आफ्रिकेसारख्या देशात धावायचे असल्याने तेथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करून त्यांनी तशा प्रकारे सरावावर भर दिला. महत्त्वाचे म्हणजे आपल्या सरावाचा कोणताही परिणाम त्यांनी दैनंदिन कामकाजावर होऊ दिला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज त्यांनी आयुक्त म्हणून संपूर्ण क्षमतेने पाहिलेच शिवाय लोकसभा निवडणुकीची निरीक्षक म्हणून बिहारमध्ये जबाबदारी पार पाडत असतानासुद्धा धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर समजल्या जाणा-या या जागतिक मॅरेथॉ़नमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले असून गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. आधी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक व त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. ध्येय पार करण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या बळावर त्यांनी हे यश मिळविेले असून या जागतिक पातळीवरील कॉम्रेड मॅरेथॉनमधील यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व प्रशंसा करण्यात येत आहे.
मुंबई, ता. ११: गर्भधारणेनंतर क्षयरोगाची लागण झालेल्या २५ वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन २.२ किलो इतके असून प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. सलोनी मुरूडकर असे या महिलेचे नाव असून गर्भधारणेच्या ३४ आठवड्यांनंतर त्यांना श्वास लागणे, तीव्र खोकला आणि थकवा जाणवू लागला होता. वैद्यकीय चाचणीदरम्यान महिलेला क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले. अशा स्थितीत प्रसूती करणे खूप अवघड असते. क्षयरोग हा पसरणारा आजार असल्याने आईच्या गर्भातील बाळालाही क्षयाची लागण होऊ शकते, मात्र डॉक्टरांच्या यशानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला क्षयरोगाचा संसर्ग झालेला नाही. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लालगुडी म्हणाल्या की, गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. छातीचा एक्सरे केल्यानंतर महिलेला क्षयरोग असल्याचे निदान झाले. गरोदर महिलांना क्षयरोग होण्याचे प्रमाण भारतात २१ टक्के आहे. क्षयरोगाचे अंदाजे प्रमाण १००० गर्भवती महिलांमध्ये २.३ आहे. गर्भधारणेदरम्यान क्षयरोगामुळे महिलेला अशक्तपणा, वेळेआधीच प्रसूती, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, प्रसूतीपूर्व मृत्यू होण्याचा धोका असतो. छातीचा एक्स-रे अहवाल आल्यानंतर लगेचच क्षयरोगविरोधी औषधोपचार सुरू करण्यात आले. या महिलेची मुदतपूर्व प्रसूती झाली, असे त्यांनी सांगितले. सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रिया साधारणतः १८ तास चालली. रुग्णाने २.२ किलो वजनाच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर उच्च-रिझोल्यूशन कंप्युटेड टोमोग्राफी चाचणी केली गेली. या चाचणीत आईमधील क्षयरोगाची लक्षणे नियंत्रणात आली होती.
राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्या होत्या. त्यात निकालानंतर ठाण्यात २ लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे. या भेटीबाबत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज राज साहेबांची भेट घेतली. सोबत माझे सगळे कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा होते. साहेबांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे अशी दरारायुक्त सूचना केली. त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. राज साहेब मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विमोचन मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक संकल्पपत्राचे विमोचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्या बुधवारी दिनांक १२ जून २०२४ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम मातोश्री येथे उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. याद्वारे परब हे त्यांच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. या संकल्पपत्राच्या माध्यमातून माझा आजपर्यंतचा राजकीय प्रवास, केलेली विविध विकास कामे, सामाजिक कार्यातील सहभाग यासह पदवीधर मतदारांसाठीचे संकल्प यामध्ये मांडले आहेत. येणाऱ्या काळात पदवीधर युवकांच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठविणार आहे आणि पदवीधर युवकांचा बुलंद आवाज बनून काम करणार असल्याचे परब यांनी याप्रसंगी सांगितले. गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परब यांनी ३ जून रोजी शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. परब यांनी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास यापूर्वी व्यक्त केला आहे. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली आहे. तसेच, मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई : अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या विठ्ठल मंदिरात १५ जून २०२४ पासून बाल संस्कार वर्ग आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी काढण्याचे आयोजन आहे. या वर्गात राशीचक्रकार शरद उपाध्ये हे मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. अधिक माहितीसाठी संपर्क ९२२३५३६८८८, ९८२०१०४७७६.
अशोक गायकवाड मुंबई : ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीआहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही पावसाचाजोर पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवसमुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा जोर असाच कायमराहणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे. येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानंचांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्येयेत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरातमान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांतसाधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरातगडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांतजोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासहदक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेचमराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसहपाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार तेअति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणिसोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.
मुंबई : “सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेतमोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्षस्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्रत्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. सर्वांनीप्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. 33 टक्केजागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचानिर्णय घेतला. डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णयआपण घेतला होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवारम्हणाले. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अजितपवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याचकाम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्हीएकत्र जेवण केलं. काहीही वाद नव्हता. तरीही चुकीच्याबातम्या लावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एकमंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. राज्यसभा देऊनस्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदारआहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हालामी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयातठराविक लोक बसली पाहिजेत. बाकी इतर लोकांनी सातदिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. मंत्र्यांनाही याचसूचना आहेत. आपण जरी महायुतीत असलो तरी आपणफुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. जोपर्यंत चंद्रसुर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानकोणीच मायचा लाल बदलू शकत नाही. नरेटीव्ह सेटकरण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. हे अधिवेशनझाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्षसाजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयशमिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकरच्या झटक्याने काल न्यूयॉर्क, अमेरिका येथे निधन झालं. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधीकाऱ्यांसाह न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान…