# https://bittambatami.com ## Posts - [18 April Bitambatmi All pages](https://bittambatami.com/2026/04/17/18-april-bitambatmi-all-pages-3/): [dflip id=”37895″ type=”thumb”][/dflip] - [बोस्टनमध्ये शेफ विष्णू मनोहर यांचा डंका](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%ab-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%82-%e0%a4%ae/): बोस्टनमध्ये शेफ विष्णू मनोहर यांचा डंका राजेंद्र हुंजे बोस्टन: भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आयुर्वेद आणि सात्विक आहार होय. आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि आरोग्यावर होतो. म्हणूनच, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानून त्याचा औषधाप्रमाणे वापर केल्यास आपण व्याधीमुक्त जीवन जगू शकतो,’ असे प्रतिपादन विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केले. अमेरिकेच्या बोस्टन शहरातील ‘अपर्णा जोशी यांच्या संकल्पनेवर आधारित केलेल्या टेस्ट ऑफ आयुर्वेद’ महोत्सवात ते बोलत होते. ओमग्राम आयुर्वेद आयोजित या सोहळ्यात विष्णू मनोहर यांनी पाश्चात्य जगाला भारतीय मसाल्यांमधील विज्ञान आणि सात्विक जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत खऱ्या अर्थाने ‘आहार क्रांती’चा शंखनाद केला. विष्णू मनोहर यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना […] - [सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन प्रभारी डीन चे अनेक घोटाळे उघड...!](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%9a/): सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन प्रभारी डीन चे अनेक घोटाळे उघड…! राजन चव्हाण सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्रभारी डीन डॉ. मनोज जोशी यांच्या कार्यकाळातील अनेक घोटाळे  समोर आले असून राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आता याप्रकारणी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.                 या तत्कालीन प्रभारी डीन च्या मनमानी व बेताल कारभाराबाबत सर्व अधिकारी कर्मचारी आणि डॉक्टरांसोबत असभ्य, अपमानास्पद व दहशतीची वर्तणूक करण्याबाबतचे चार पानी  सविस्तर निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले होते.                   या निवेदनावर कॉलेजचे अधिकारी,कर्मचारी,डॉक्टर्स अशा तब्बल ४५ जणांच्या  सह्या आहेत. या निवेदनात डॉ. जोशी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून शासन  स्तरावर याची दखल घेण्यात आली आहे. […] - [लोकसभेत घटना दुरुस्ती नामंजूर ५४ मतांमुळे ‘नारीवंदन’ला नकार](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be/): लोकसभेत घटना दुरुस्ती नामंजूर ५४ मतांमुळे ‘नारीवंदन’ला नकार नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्वकांक्षी १३१ वी दुरुस्ती नारीवंदन विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, आणि सीमांकन विधेयक, लोकसभेत सादर केली होती. या घटनादुरुस्तीला ५४ मते कमी पडल्यामुळे एतिहासिक नारीवंदन विधेयक फेटाळले गेले. त्यामुळे पुढील दोन्ही विधेयक सरकारने मांडली नाहीत. हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं मंजूर करण्यासाठी लोकसभेतील उपस्थित सदस्यांच्या दोन तृतियांश मते आवश्यक असतात. लोकसभेत या घटनादुरुस्ती  विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आलं. घटनादुरुस्तीच्या बाजूनं पहिल्या फेरीत एकूण ५२८ खासदारांनी मतदानं केलं. घटना दुरुस्तासाठी दोन तृतीयांश म्हणजे ३५२ मते आवश्यक होती पण सरकारच्या या विधेयकाच्या बाजूने २९८ मतदान झालं, तर घटनादुरुस्ती विधेयकाच्या विरोधात २३० मतं नोंदवली गेली आहेत. आता राज्यसभेत उद्या मतदान होणार आहे. २०२९ च्या निवडणुकीत […] - [ईडी चौकशीच्या तिसऱ्यादिवशी भोंदुबाबा खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%88%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5/): ईडी चौकशीच्या तिसऱ्यादिवशी भोंदुबाबा खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे (Ashok kharat) निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांची तीन दिवसापुर्वीच ईडीकडून चौकशी करण्यात आली होती आणि आज त्यांचे अपघाती मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा घात होता की अपघात असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला. शेळकेंच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात  झाला. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे अशोक खरात प्रकरणावरुन एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष […] - [](https://bittambatami.com/2026/04/17/37881/): ही तर भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा– राज ठाकरे मुंबई : भारतीय जनता पक्ष हा गेली १० वर्षे पक्ष फोडत होता, आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता यांची मजल देशात दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्यांनी हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्याराज्यांत स्वायत्ततेची मागणी सुरु होईल. एव्हढच नव्हे तर याचे परिणाम आपल्या संरक्षण आणि गृह विभागात देखील दिसून येतील ही तर भाजपाची राक्षसी महत्वकांक्षा आहे अशी टिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे पालिका […] - [“थँक यू” म्हणत ट्रम्पने मानले इराणचे आभार](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%a5%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%a4-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87/): “थँक यू” म्हणत ट्रम्पने मानले इराणचे आभार नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यांपासून बंद असणारी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय इराणने घेताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनेही थँक्यू इराण असे म्हणत त्याला प्रसिसाद दिला आहे. या घटनेमुळे जगाने निश्वास टाकला आहे.  “युद्धविरामाच्या उर्वरीत काळात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असेल”, अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी केली आहे. सर्व व्यावसायिक जहाजांसाठी सामुद्रधुनी खुली असेल, असे मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले आहे. - [सरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7/): मुंबई / रमेश औताडे १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गेल्या १५ महिन्यांच्या सांप्रत शासनाच्या कारभाराला कंटाळले आहेत. गत युती शासनाच्या कालखंडात अनेक प्रलंबित मागण्यांबाबत जी आश्वासने दिली होती त्याचा विसर त्यांना पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र च्या वतीने सरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समन्वय समिती, महाराष्ट्र  चे निमंत्रक व मध्यवती संघटना, महाराष्ट्र चे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.  सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०:२०:३० वर्षानंतरच्या लाभापासून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहेत. निवृत्तीचे वय ६० करा ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. देशातील २६ राज्यात निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात आले आहे. मग पुरोगामी महाराष्ट्र भागे का ? रिक्त पदे भरण्याचा वेग अती मंद आहे. सध्या मंजूर पदाच्या ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचान्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडतो व पदोन्नतीबाबत अनेक विभागात अवरोध निर्माण केले जात आहेत. यावेळी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. चतुर्थश्रेणी व वाहनचालकांच्या पद भरतीस १०० टक्के बंदी लादण्यात आली आहे. या अव्यवहार्य निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक आहे. कर्मचारी-शिक्षकांना एक व्यापक कॅशलेस विमा योजना लागू करणे आवश्यक आहे. केरळ राज्यात ५ लाख रुपयांचा कॅशलेस लाभ देणारी योजना अस्तित्वात आहे. कर्मचाऱ्याच्या आरोग्य संपदेसाठी अशा आरोग्य विमा योजनेची आवश्यकता आहे. - [सायकलपट्टूंना केंद्रस्थानी ठेवल्यास भारताला अधिक पदकं](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d/): मुंबई / रमेश औताडे सायकलपट्टू केंद्रस्थानी ठेवला तरच सायकल खेळ जागतिक पातळीवर भारताला जास्तीत जास्त मेडल मिळतील असे मत भारतीय सायकल महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी महासंघाचे महासचिव महेंद्र पाल सिंग उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, सायकल महासंघाच्या नवीन जबाबदारीच्या अनुषंगाने मी भारताला जास्तीत जास्त मेडल सायकल खेळात कशी मिळतील याचा आराखडा आखला आहे. १ एप्रिल २०२६ पासून महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. यावेळी बोलताना महेंद्र पाल सिंग म्हणाले, पाटील हे एक अत्यंत यशस्वी धोरणात्मक नेते असून, त्यांना कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार, शिक्षण, सल्लागार आणि उद्योजकता या क्षेत्रांतील उच्च नेतृत्व पदांवर तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. ते पुणे येथील ‘एलिव्हेट एज कन्सल्टिंग ग्रुप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुणे येथील स्टार्कन बाईक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (२०१३-२०१९); नवी दिल्ली येथील हिरो सायकल्सचे अध्यक्ष (बिझनेस हेड) (२०१२-२०१३) म्हणून काम केले आहे; तसेच भारत सरकारमध्ये युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासह विविध विभागांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आणि प्रभारी खाजगी सचिव म्हणून वरिष्ठ पदांवर काम केले आहे. याशिवाय, टाटा, रिलायन्स, आदित्य बिर्ला ग्रुप आणि सिटीबँक यांसारख्या मोठ्या उद्योगसमूहांमध्येही त्यांनी उच्च नेतृत्व पदे भूषवली आहेत. पाटील हे भारतातील सायकलिंगच्या विकासातील एक अग्रणी शक्ती राहिले आहेत. त्यांनी अनेक वर्षे भारतीय सायकलिंग महासंघासोबत (CFI) जवळून काम केले असून, CFI व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन (CAM) यांच्या सहकार्याने पुण्यात सलग पाच वर्षे एमटीबी राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. त्यांनी पनवेल येथे रोड सायकलिंग चॅम्पियनशिप, अनेक राज्यस्तरीय चॅम्पियनशिप आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या सायकलिंग स्पर्धांचेही आयोजन केले आहे, ज्यात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्था (PCRA) आणि इतर संस्थांच्या भागीदारीत, सायकलिंगला एक शाश्वत आणि आरोग्यदायी वाहतुकीचे साधन म्हणून प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे देशातील व्यावसायिक आणि मनोरंजक सायकलिंग संस्कृतीच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यांना भारतातील प्रीमियम सायकल सेगमेंटचे जनक मानले जाते, कारण त्यांनी स्टार्कन बाईक्सला (जायंटच्या भागीदारीत) अपवादात्मक वाढीच्या दरासह प्रीमियम बाईकिंग सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचवले. 00000000 Unti-१0 आरोग्य विभागात वादग्रस्त नियुक्तीवरून मनसे संतप्त रमेश औताडे मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी  पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेश म्हात्रे यांना देण्याच्या निर्णयावरून शहरात तीव्र वाद निर्माण झाला असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनसेच्या वतीने नवी मुंबई शहर अध्यक्ष  गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना हे पत्र सादर करत प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवेदना यामध्ये एका कंत्राटदार संस्थेला ब्लॅकलिस्ट करून काही महिन्यांतच ती कारवाई मागे घेण्याचा संशयास्पद निर्णय, प्रशासनिक पारदर्शकतेचा अभाव, तसेच सत्तेचा मनमानी वापर केल्याचे आरोप समाविष्ट आहेत. या प्रकारातून संभाव्य फसवणूक, विश्वासघात आणि संगनमताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, एका महिला रुग्णाने माध्यमांवर केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. संबंधित रुग्णाने उपचारादरम्यान निष्काळजीपणा, चूक लपवण्याचा प्रयत्न, मानसिक छळ आणि अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप केला आहे.  प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून, व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. - [खाडीच्या पाण्यात सापडला अर्धवट सडलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%b2/): उल्हासनगर  दि.१७ ( सुनिल इंगळे ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पोलीस सूत्राने दिले माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅजेस्टेका सोसायटी, कासाबेला, डोंबिवली पुर्व येथील खाडीच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तानाजी राठोड यांना मिळाली होती. खाडीच्या पाण्यातून तो मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो मृतदेह एका बेवारस अनोळखी हिंदू जातीच्या इसमाचा आहे. साधारण तो मयत इसम ३५ ते ४० वयोगटातील असून याचा चेहरा सडलेल्या व त्यावर किडे पडलेले, उघडा, डाव्या हातावर टॅटू व लाल रंगाचा धागा, ऊजव्या हाताच्या मनगटाला काळया रंगाचा कडदोरा (धागा) तसेच R.D. Deepak असे इंग्रजी भाषेत व त्रिशुळ गोंधलेले, Dollar कंपनीची काळया रंगाची अंडरवेअर, पाठीमागील बाजूस मानेच्या मागे खुप किडे लागलेले, पाठीमागील बाजुस गुप्त भागामध्ये किडे पडलेले, संपुर्ण शरीर हे लाल व काळे पडलेले अंगाने मध्यम, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच अशा वर्णनाचा आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तानाजी राठोड यांनी दिलेल्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अद्याप त्या अनोळखी इस्माच्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस त्या मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. कोणाला त्या अनोळखी इसमा बाबत माहिती असल्यास मानपाडा पोलीस ठाणे संपर्क क्रमांक ०२५१-२९५१९७४ वर संपर्क साधावा असे आवाहन तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर यांनी केले आहे. - [शिवीगाळीच्या व्हिडिओवरून भाजपा-शिवसेना आमने सामने](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82/): अरविंद जोशी मिरा -भाईंदर : शिंदे गटातील शिवसेनेच्या एका अधिकाऱ्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर असभ्य टिप्पणी करत आणि त्यांना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओवरून सर्व भाजप नगरसेवक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवघर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता तसेच मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी स्वतः आमदार नरेंद्र मेहता यांनी पोलीस स्थानकात उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी अर्वांच्य भाषेत बोलताना पत्रकारांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. पत्रकारांशी बोलताना आमदार नरेंद्र मेहता मंत्री सरनाईकांना उद्देशून म्हणाले की, मी सर्वस्व गमावले आहे, पण कल्पना करा, जर मी तुम्हाला उघड केले तर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे काय होईल. मंत्री प्रताप सरनाईक निवडणुकीतील पराभवामुळे निराश झाले आहेत, त्यामुळे ते दररोज निराधार आरोप करत आहेत. मंत्री प्रताप सरनाईक हे सर्वात मोठे भ्रष्ट व्यक्ती आहेत आणि भविष्यात मी त्यांचा सर्व भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करेन. एका ऑस्ट्रेलियन महिलेने सरनाईक यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. असे वेगवेगळे आरोप त्यांनी केले. यासंदर्भात पोलिसांनी व्हिडिओ वायरल केलेल्या लिंकवरून पवार या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. जर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन नेत्यांना वेळेत स्समाजावले नाही, तर मिरा- भाईंदर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनू शकते. मिरा- भाईंदर शहरातील राजकारण अत्यंत घृणास्पद पातळीवर पोहोचले आहे हे नक्की. - [ठाण्याच्या झैद - समृद्धी यांना विजेतेपद  ](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a5%88%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80/):  ६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी आयोजित ६० वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नुकतीच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिशनच्या सिल्वर ज्युबिली बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ठाण्याचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा रंगतदार लढतीत १९-२३, २५-१० व २५-६ असा पराभव करून जेतेपद मिळवले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जळगावच्या संदीप दिवेने मुंबईच्या सौरभ मतेवर २३-१, २५-९ असा विजय मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याची समृद्धी घाडीगावकर सरस ठरली. […] - [ ओम् वर्तकनगर, अश्वमेघ स्पोर्टस् ,श्रीराम,जय बजरंग चौथ्या फेरीत](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%93%e0%a4%ae%e0%a5%8d-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%98-%e0%a4%b8/):  श्री मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे :- श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” ओम् वर्तकनगरने महिला विभागात  चौथी फेरी गाठली.तर  पुरुष गटात  शिवमुद्रा प्रतिष्ठान, श्रीराम विश्वस्त, जय बजरंग-वाशिंद, मिड लाईन यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. अश्वमेघ संघाला मात्र चौथी फेरी गाठण्यासाठी ५-५ चढाईच्या डावापर्यंत लढत द्यावी लागली.ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या मैदानावर  सुरु असलेल्या तिसऱ्या दिवशी पुरुष गटात ठाण्याच्या अश्वमेघ संघाने ५-५ चढायात बाळ गोपाळ मंडळाचा प्रतिकार ३३-३२(७-६) असा मोडून काढत आगेकूच केली. पूर्वार्धात १३-१५ अशा पिछाडीवर पडलेल्या अश्वमेघने पूर्ण डावात २६-२६ अशी बरोबरी साधली. नंतर ५-५ चढायात ७-६ अशी बाजी मारली. अश्वमेघच्या आदित्य पांडेने ५-५ चढयातील आपल्या २ऱ्या चढाईत ३ गडी टिपत संघाचा विजय निश्चित केला. त्याला गणेश रणनवरे, हर्षल शिंदे, शुभम पांडे यांची उत्तम साथ लाभली. बाळ गोपाळच्या पंकज फाटक, अमित शहा, दिपू तिवारी यांचा जोश ५-५ चढाईत किंचितसा कमी पडला. शिवमुद्रा प्रतिष्ठानने मध्यंतरातील १६-१७ अशा पिछाडीवरुन गुड मॉर्निग स्पोर्टस् चा संघर्ष ३७-२७ असा संपविला. विशाल लाड, राकेश घाडी, अनिकेत सोनुले यांच्या चढाई पकडीच्या खेळाने शिवमुद्राने हा विजय साकारला. सुरज दळवी, आयुष पवार यांचा खेळ उत्तरार्धात ढेपळला. श्रीराम विश्वस्त संघाने पहिल्या डावातील १६-२३ अशा ७ गुणांच्या पिछाडीवरुन श्री विठ्ठल मंडळाचे आवाहान ४१-३८ असे  संपुष्टात आणले . अक्षय मकवाना, चिन्मय गुरव, सिद्धेश पाणीचाळ यांच्या चतुरस्त्र खेळाने पहिल्या डावात श्री विठ्ठल संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना टिकविता आली नाही. श्रीरामच्या तुषार शिंदे, हर्ष काळे, आदित्य पात यांनी टॉप गिअर टाकत विरुद्ध संघावर २ लोण देत ३गुणांनी बाजी पालटविली. जय बजरंग- वाशिंद संघाने वीर परशुराम संघावर २८-२१ अशी मात केली. विराज शिंदे, आशिष पाटील यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महिलांत ओम् वर्तकनगरने अमर हिंद मंडळाला ४२-२४ अशी मात करीत चौथी फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २ लोण देत २४-०७ अशी आघाडी घेणाऱ्या वर्तकनगरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओम् वर्तकनगरच्या वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव, पूर्वा इंगवले यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमर हिंदची साईशा पेडणेकर चमकली. या अगोदर दुसऱ्या फेरीच्या झालेल्या सामन्यात जय भारत स्पोर्टस् ने स्फूर्ती सेवाला ३८-३४ असे चकवीत तिसरी फेरी गाठली. जय भारतच्या श्रेया गावंड, समृद्धी महागडे, परी घडशी यांच्या उत्कृष्ट खेळाने विजयी किमया साधली. स्फूर्तीच्या दीपाली बागडे, नूतन चव्हाण, शामली यांनी कडवी लढत दिली. यासिका पुजारी, मनीषा चौगुले, प्रतिक्षा तांडेल यांच्या नेत्रदीपक खेळाच्या जोरावर स्वराज्य स्पोर्टस् ने रा. फ. नाईक संघावर ३३-१५ अशी मात केली. रा. फ. ची रेखा चिकणे एकाकी लढली. मिडलाईन अकादमीने संघर्ष संस्थेला ३१-१८ असे सहज नमवून आपली घोडदौड सुरूच ठेवली. मोक्ष पुजारी, श्रावणी हांडे, सिद्धी बलकवडे मिडलाईन कडून तर प्रतिक्षा मारका, भूमिका भारती संघर्ष कडून उत्तम खेळल्या. - [ विक्रोळीत चढाई-पकडीचा संग्राम आजपासून](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%9a%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8/): सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरस्कारांचा वर्षाव राज्यातील १६ दिग्गज व्यावसायिक संघ  भिडणार मुंबई, दि. १७ (क्री.प्र.)- क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेवर छप्पर फाडके पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. राज्यातील तगड्या १६ व्यावसायिक पुरुष संघांचा आणि १५ महिला संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धांत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसांची उधळण केली जाणार आहे. येत्या १८ ते २१ एप्रिलदरम्यान विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हा कबड्डीतील चढाई-पकडींचा थरार रंगणार आहे. एकीकडे आयपीएलची फटकेबाजी सुरु असताना आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानाच्या संयोजनाखाली राज्यातील व्यावसायिक कबड्डी संघांची ताकद दाखवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  होणार्‍या कबड्डीच्या पकडापकडींच्या संघर्षासाठी आंबडेकर उद्यानातील क्रीडानगरीला ‘कबड्डी पंढरी’ चे रुप दिले आहे. राज्यातील पुरुष आणि महिलांचे अव्वल आणि बलवान संघ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे कबड्डीप्रेमींना प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेत सहभागी संघ आणि खेळाडूंनाही लखपती करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्वाधिक रोख रकमेची स्पर्धा असलेल्या या कबड्डी थरारात व्यावसायिक स्पर्धेतील विजेत्यांना दोन लाखांचे  पारितोषिक दिले जाणार आहे तर उपविजेता संघ दीड लाखांचा मानकरी ठरेल. उपांत्य फेरी पराभूत संघही पाऊण लाखांचे बक्षीस मिळवतील. महिलांच्या स्पर्धेतील विजेता संघ एक लाखांचा पुरस्कार जिंकेल तर उपविजेता पाऊण लाखाचे इनाम मिळवेल. इथेही उपांत्य परभाूत संघ ३५ हजार रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. सर्वात विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना मोटर बाईक आणि स्कूटी दिली जाणार असल्यामुळे हे जिंकण्यासाठी खेळाडू पहिल्या लढतीपासूनच आपला जोरदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजवर अनेक कबड्डी स्पर्धांचे दिमाखदार ेआयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार राऊत यांनी व्यावसायिक कबड्डी संघांच्या जोरदार आणि रोमहर्षक खेळाची मेजवानी सादर करण्यासाठी  मुंबई शहरच्या तगड्या ८ संघांसह उपनगर, पुणे, ठाणे, नंदुरबार, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यातील बलाढ्य संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ टागोर नगरात उभारलेल्या क्रीडानगरीतील दोन मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक आणि आमदार सुनील राऊत यांनी दिली. प्रो कबड्डीच्या सुपरस्टार्सचीही चढाई या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल ३० सुपरस्टार  विक्रोळी पूर्वेला असलेल्या स्पर्धेत आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, -संकेत सावंत, अस्लम इनामदार, साहिल राणे, सुशांत साईल, अजिंक्य कापरे सारखे अनेक तूफानी खेळाडू आपला झंझावात दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील संघ व्यावसायिक पुरुष संघ-युवा पलटण, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, सीजीएसटी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्टल, युनियन बँक (सर्व मुंबई शहर), लिब्रा अ‍ॅग्रो (उपनगर), ठाणे महानगरपालिका (ठाणे), रुपाली ज्वेलर्स (नंदुरबार), संत सोपानकाका सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार, आयकर (सर्व पुणे), मिडलाइन फाऊंडेशन (रायगड), डीवाय पाटील (नवी मुंबई). स्थानिक महिला संघ – स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, महात्मा गांधी अकादमी (सर्व उपनगर),शिवशक्ती महिला संघ, डॉ, शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, विवेक संघ (सर्व मुंबई), कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी (रायगड), कुलाई क्रीडा मंडळ (पालघर), राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स क्लब , तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लब, पतंगराव कदम (सर्व पुणे), अनिकेत स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी), शिवाजी उदय स्पोर्ट्स क्लब (सातारा), होतकरु मित्र मंडळ (ठाणे). 0000000000 जान्हवी मोरे स्मृती चषक मुला-मुलींची कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील‌ मुला -मुलींच्या राज्य स्तरीय   कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल,दत्तनगर,डोंबिवली,पूर्व  येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये १०० असुन २० एप्रिल पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.प्रवेशासाठी दिलीप कर्वे, मो.९१६७७४४०४९.  संजय ठाकुरदेसाई मो.   ९८६७५८५२७१. अथवा पर्णाद जोशी मो.  ८४५०९५४५८४ यांच्याशी संपर्क साधावा. - [ राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या आज कौतुक सोहळा](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/):  कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिमचा पुढाकार मुंबई- राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि नव्या पिढीला प्रेरणेची ठिणगी मिळावी, या उद्देशाने कुणाल केरकर यांच्या संकल्पनेतून आयर्न पॅराडाईज जिमतर्फे शनिवारी १८ एप्रिलला भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या या दमदार यशाची दखल घेत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज जिममध्ये आयोजित या सोहळ्यात केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा दिमाखदार गौरव केला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात भक्कम कामगिरी करणारे कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. याच मंचावर राष्ट्रीय पदक विजेत्यांसह आयर्न पॅराडाईजसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : हरमीत सिंग (किताब विजेता), उमेश गुप्ता (उपविजेता), रेखा शिंदे (महिला शरीरसौष्ठव), राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव)  नीलेश गुरव (मेन्स फिजिक) रौप्य पदक विजेते : गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) कांस्य पदक विजेता निलेश रेमजे विशेष गौरव प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य). - [पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा महापौरांचा इशारा](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3/): मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांची सरप्राईज व्हिजिट – कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती कल्याण : पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा केडीएमसी महापौरांनी दिला असून केडीएमसीच्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांनी सरप्राईज व्हिजिट करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच, महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी  ‘अ’ प्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली. कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली. महापौरांनी जेव्हा पंप हाऊसमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. मात्र, तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला.पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली: यावेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही: कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबर कोणत्या प्रभागात किती पाणी जाते आणि कुठे कमतरता आहे, याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका  अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. ंनागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासन ढिम्म राहू शकत नाही. मोहिली पंप हाऊस हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे हृदय आहे, तिथेच जर कामात दिरंगाई होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जनतेला पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सागितले. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या भेटीनंतर तरी कल्याण-डोंबिवलीतील नळांना पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. - [ नवी मुंबई महानगरपालिकेची २०२६-२७ च्या मालमत्ता कराची ई-बिले आता ऑनलाइन उपलब्ध](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87-5/):  महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले तयार करण्यात आली असून, नागरिकांना आपले मालमत्ता कराचे बिल व्हाट्सअॅप चॅटबॉट तसेच महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांत पाहता येईल, डाऊनलोड करता येईल आणि त्यासोबतच बिलाचा भरणा करता येणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने ही डिजीटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाईन पद्धतीने देखील घरपोच बिल वाटप करण्यात येणार आहेत. मात्र ई-बिलमुळे नागरिकांना आता ऑफलाइन बिलाची प्रतीक्षा करण्याची गरज नसून, घरबसल्या कोणत्याही वेळी आपले बिल मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत तसेच पहिल्या व तिस-या शनिवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यरत आहे. व्हाट्स अॅप चॅटबॉट द्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया: नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमधून ८२९१९२०५०४ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवावा. त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून आपल्या पसंतीची भाषा निवडावी. पुढे “Pay Your Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक (Property ID) प्रविष्ट करावा. मालमत्ता क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित मालमत्तेची सविस्तर माहिती जसे की मालकाचे नाव, मालमत्तेचा पत्ता इत्यादी तपशील स्क्रीनवर दिसेल. तसेच संबंधित आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे मालमत्ता कराचे बिल PDF स्वरूपात उपलब्ध होईल. या PDF वर क्लिक करून बिल पाहता आणि डाऊनलोड करता येईल. “Pay Now” पर्याय निवडून त्वरित भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. अधिकृत संकेतस्थळाद्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया: नागरिकांनी आपल्या ब्राऊझरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट द्यावी. संकेतस्थळावरील “Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर नागरिकांनी आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करावा. यानंतर संबंधित मालमत्तेची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. पुढे “Bill” या पर्यायावर क्लिक करून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलाची प्रत ऑनलाइन स्वरूपात पाहता तसेच डाऊनलोड करता येईल. “Pay Now” या पर्यायावर क्लिक करून थेट भरणा करता येईल. मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधा: नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करता येणार असून त्यामध्ये पुढील पर्यायांचा समावेश आहे: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, QR कोड अवघ्या काही मिनिटात मिलणार बिल नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी सातत्याने डिजिटल माध्यमांचा वापर वाढवत आहे. मालमत्ता कराची ई-बिले व्हाट्सअॅप चॅटबॉट आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना केवळ काही मिनिटांत आपले बिल प्राप्त करून त्याचा भरणा करता येणार आहे. या सुविधेमुळे वेळेची बचत होणार असून, नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक वापर करून निर्धारित कालावधीत मालमत्ता कर भरावा आणि शहराच्या विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. - [प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a5%87/):   २,५०० नागरिकांनी घेतला विविध शासकीय सेवांचा लाभ कल्याण : जीवनदीप महाविद्यालय, गोवेली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने व सुलभ पद्धतीने मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २,५०० नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले, “शासकीय योजना व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नयेत; त्यांना तात्काळ आणि सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे.” या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर दाखला, रेशन कार्डवरील नाव बदल व इतर दुरुस्त्या (पुरवठा विभाग), सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज व मंजुरी, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजनासेवा प्रभावीपणे पुरविण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सहायक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल, वन व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. - [ सलमान खान, आमिर खान यांच्या चित्रपटांऐवजी रणवीर सिंग, विकी कौशल यांचे चित्रपट पहा!](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/): मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान हरिभाऊ लाखे नाशिक –महाराष्ट्रातील भाजपमधील हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे हे कायमच वादग्रस्त ठरत आले आहेत. हिंदू राष्ट्र म्हणून एक होण्याचे आवाहन करतानाच ते कायमच मुस्लिमांना लक्ष्य करतात. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित विराट हिंदू मेळाव्यातही त्यांनी आपली ही परंपरा कायम राखली. यावेळी हिंदू एकजुटीचे गुणगान गाताना नितेश राणे यांनी लव्ह जिहादसारख्या प्रकरणांसाठी बाॅलीवूडमधील खान मंडळींना जबाबदार धरले. मंत्री नितेश राणे यांनी विराट हिंदू मेळाव्यात मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली. हिंदूराष्ट्र म्हणून आपण जागृत झालो नाही, संघटित झालो नाहीत, तर आजूबाजूच्या वातावरणाचा फटका बसू शकतो. हिरव्या सापांना वेळीच ठेचले नाही तर ते आपल्या घरापर्यंत येऊन पोहचतील. तेव्हां आपण काहीच करु शकणार नाहीत. आमच्या या हिंदूराष्ट्रात सर्वधर्मसमभावाची कोणतीही टेप लावायची नाही. हिंदूराष्ट्रात सर्वप्रथम हिंदुंचे हित पाहिले जाईल. भाईचारा वगैरे आम्हाला शिकविणाऱ्या लोकांनी गप्प बसावे. हिंदूराष्ट्रात हिंदू म्हणून संघटित न झाल्यास आजूबाजूला काय चाललंय ते बघा, असे म्हणत राणे यांनी नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतरणासाठी येणारा दबाव, याचे उदाहरण दिले. हिंदू भगिनींना धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडणे, त्यांना दुसऱ्या धर्माची प्रार्थना म्हणावयास लावणे, त्यांना हिजाब घालायला लावणे, हे करण्यासाठी त्यांना नोकऱ्या दिल्या का, या विषयावर आम्ही बोलायचे नाही काय, असे प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केले. हिंदू भगिनींचे शोषण करणारे कोणीही असो, त्यांना शिक्षा करा. शेकडो हिंदू भगिनींचे शोषण करणाऱ्या खरातलाही जाहीररित्या फाशी द्या, खरातचे कोणीही समर्थन करणार नाही. कोणत्याही हिंदुंनी खरातचे समर्थन केलेले नाही. परंतु, टीसीएस कंपनीतील संशयितांना कोर्टात नेले असता, कोर्टाबाहेर सहाशे मुस्लिम त्यांच्या समर्थनार्थ जमले होते, असा दावा राणे यांनी केला. याचा सर्व हिंदुंनी विचार करायला पाहिजे. बॉलिवूडमधील खान मंडळींच्या चित्रपटांनी लव्ह जिहाद पसरविला, असे म्हणत नितेश राणे यांनी सलमान खान, आमिर खान यांचे नाव घेतले. हिंदुंना कसे टार्गेट करायचे, हे या खान मंडळींनी चित्रपटांमधून दाखविले. आता मात्र बदल होत आहे. आमचे धुरंदर, छावा त्यांच्यावर भारी पडत आहेत. आपण सर्वांनीही चित्रपट पाहणार तर हिंदुंचेच पाहणार, बाकीच्यांना घरी बसविणार, ही भूमिका घ्यावी. रणवीरसिंग, विकी कौशल यांचे चित्रपट पाहण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे नाव कोणी खराब करीत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या मेळाव्यातप्रसंगी राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार दिलीप बनकर यांनी मंत्री राणे यांचा सत्कार केला. - [विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत आमदार निरंजन डावखरे यांचा वाढदिवस साजरा](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa/): अनिल ठाणेकर ठाणे-विर्थ्यांसोबतचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो आणि समाजाला काहीतरी परत देण्याची हीच खरी संधी असते. अशा भावना व्यक्त करत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी कर्णबधीर विशेष विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणाऱ्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक हे कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्मयोगी वृत्तीने कार्य करत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्या शाळा आणि शिक्षकांकडे नक्कीच वळून पाहावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे पूर्व कोपरी येथे विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मोफत वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच आदर्श परंपरा जपली.भारतीय स्त्री जीवन विकास परिषद संचालित कमलिनी कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. ठाणे पूर्व येथील सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे यांनी, “समाजाने आपल्याला दिलेले देणे आपण समाजाला परत दिले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नवी दिशा मिळते. या संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांसाठी पालकांपेक्षाही अधिक मेहनत घेतात, असे नमूद करत त्यांनी त्यांच्या कमलिनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांपैकी भविष्यात अनेकजण मोठं यश संपादन करतील. मात्र, आयुष्यात पुढे गेल्यानंतर एकदा तरी आपल्या शाळेकडे आणि शिक्षकांकडे वळून पाहा. त्यांनी दिलेल्या संस्कारांची जाणीव ठेवा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. तसेच वाढदिवस केवळ औपचारिक साजरे न करता विद्यार्थ्याना मदत करण्याची परंपरा जोपासणाऱ्या कृष्णा भुजबळ यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक आ. डावखरे यांनी केले. या प्रसंगी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे, अमरीश ठाणेकर, विनोद टिकमाणी, सिद्धेश पिंगुळकर, सचिन कुटे, रोहित कवे, शेखर निकम, मनोज तिवारी, कमलाकर कुरतडकर, प्रफुल्ल नाखवा, नितीन पाटील आदीसह भाजप कोपरी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच भारतीय स्त्री जीवन परिषदेच्या पद्मजाताई काळे, मानसीताई सहस्त्रबुद्धे आणि कमलिनी विद्यालयाचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा भुजबळ दरवर्षी राबवित असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळते, अशा भावना व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन आणि संस्थेच्या मान्यवरांनी शाळेप्रती असाच स्नेह कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. - [](https://bittambatami.com/2026/04/17/37837/): बृहन्मुंबई गुजराती समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि ज्यांच्यावर कादंबरी, डॉक्युमेंटरी व नाट्यकृती निर्माण झाली आहे असे विक्रमादित्य डॉ. हेमराज शाह यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात ‘हेमूदादा’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेच्या संगणक प्रशिक्षण प्रमुख रिंकू भावेश दवे आणि ज्योती अमिश त्रिवेदी यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. (छाया : पराग अरुण कुलकर्णी) - [](https://bittambatami.com/2026/04/17/37832/): मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे.  या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने झालेल्या नुकसानीत हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपये नुकसान भरपाई मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजारांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. यामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाई बाबत राज्य सरकारने आज अखेर कोणतेही पंचनामे अथवा प्रशासकीय आदेश दिलेले नाहीत. एकीकडे २५ हजार कोटींचा कुंभमेळा ३५ हजार कोटी व ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ १ लाख कोटींपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली जात आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना राज्य सरकार आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मा. खासदार राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या सर्वांनी या मोर्चात सहभागी होवून लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रत्नागिरीचे आमदार बाळा माने , सुशांत नाईक, गणेश गायकर , किरण टेंभुलकर ,अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. - [राज्यातील सोनार समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक-पंकज भोयर](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a/): मुंबई / रमेश औताडे राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरुखकर, सल्लागार भरत ओसवाल, पद्मिनी ताई शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते. - [आनंद नगर मधील बुद्धविहाराचा कायापालट होणार](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be/): ठाणे :  गेलीं अनेक वर्षें मोडकळीस आलेल्या आनंद नगर मधील बुद्धविहार आता नव्या रूपात साकारले जाणार आहे. १९ एप्रिलपासून या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरवात होणार आहे. पूर्व ठाण्यातील आनंद नगर विभागात असलेल्या बुद्धविहाराची अवस्था खराब झाली होती. त्यातच गेली अनेक वर्षे पुनर्बांधणीचे काम या ना त्या कारणाने रखडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीच पुढाकार घेऊन निधी गोळा करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १९ एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात होत आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, निरंजन डावखरे,माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी  आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बनकर, उपाध्यक्ष आनंद कांबळे, राहुल लोंढे, वृक्षाली जाधव – दळवी, सचिव प्रविण गायकवाड, खजिनदार संजय बुकाणे, सहसचिव हिरा वानखेडे, सहखजीनदार राजू साबळे, अमोल जोशी, दिलीप जाधव, नितीन दुधसागर, सुनील सौंदाणे, भरत उबाळे, सुनील कदम प्रवीण झेंडे आणि इतर  मेहनत घेत आहेत. - [विलेपार्ल्याला साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेती प्रकल्प](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8b/): मुंबई: महापौर आणि उपमहापौर आयुक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई  विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती  स्थानिक नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी दिली आहे. एरवी उड्डाणपुला खालील जागावर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत असते.   त्यामुळे विलेपार्ले पूर्व येथील विमानतळाच्या बाहेरील पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुला खालील जागेचा सदुपयोग व्हावा या हेतूने “विलेपार्ले कल्चरल सेंटर” तर्फे शहरी शेती प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव “के-दक्षिण विभागा”कडून मान्य करवून घेतला  अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली. संबंधित प्रकल्पात प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने वाफे तयार करण्यात आले असून त्यावर विविध फळ भाज्या लावण्यात येणार आहेत. तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणेने शहरी शेती अभ्यास वर्ग चालवण्यात येणार असून या मध्ये अनुभवी व प्रशिक्षित मान्यवर प्रत्यक्ष शेतकामा विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच सोबत, वनस्पती वैविध्य दालन (plant diversity gallery) आणि वनस्पती सांभाळ केंद्र (plant care center) सुद्धा चालवण्यात येणार आहेत. तर फुलपाखरू उद्यान,पक्षांना आकर्षित कसे करावे, माळी  काम कसे करावे इत्यादी विषयात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. सादर केलेल्या बाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास, मुंबई विमानतळ T१ मेट्रो स्थानका समोरील या प्रकल्पास रविवारी, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.30 वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे. - [‘पळसाची पाने’ मुंबईत विक्रीसाठी](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf/):  शहापूरच्या गरीब आदिवासींना मिळतेय रोजी रोटी अविनाश उबाळे ठाणे : जंगलात रानावनात डोंगर कपारीत राहणार्‍या आदिवासी समाजाने आपल्या दोन वेळच्या घासासाठी जंगलात भटकंती करताना रोजगाराच्या वाटा या स्वतः शोधल्या आहेत.कशासाठी तर वितभर पोटासाठी सरकारी मदतीची वाट न पाहता जगण्यासाठीचा हा संघर्ष आदिवासींचा कायम दिसतो आहे. कशासाठी तर वितभर पोटासाठी प्रत्येक मोसमात त्याने वेगवेगळे व्यवसाय करून काबाडकष्ट करून दोन पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहेत.शहापूर तालुक्यातील वाशिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा ,तानशेत, उंबरमाळी, आघई ,तानसा, दहागाव पिवळी, माहुली, या ग्रामीण भागातील आदिवासी बहुल वस्त्यावरील आदिवासी हे दरवर्षी पळसाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात.जवळपास या व्यवसायातून आदिवासी समाजाची बहुतांश कुटुंब आपली रोजीरोटी चालवितात. दाट जंगलात, डोंगर कपारीत भटकंती करून आदिवासी पुरुष,महिला ही पळसाची पाने मोठ्या मेहनतीने खुडून आणतात.नंतर या पानांचे गठ्ठे बांधून ते जंगलातून पायपीट करत डोक्यावर वाहून मध्य रेल्वेच्या कसारा खर्डी, आटगाव, आसनगाव, वासिंद,या रेल्वे स्थानकात आणून रेल्वेने पुढे मुंबई, दादर, ठाणे, डोंबिवली,कल्याण या शहरातील फुलमंडईत विक्रीसाठी नेतात. फुले बांधण्यासाठी पळसाच्या पानांना फुल मंडईत मोठी मागणी असते.पळसाच्या पानाच्या विक्रीतून त्यांना रोज ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते.असे या व्यवसायातील सुकरी निरगुुडा या आदिवासी महिलेने माहिती देताना सांगितले.काही आदिवासी हे पळसाची पानं ही उत्तर भारतीय लोकांना रेल्वे स्थानकातच अगदी अल्प दरात विक्री करतात.यातून स्थानिक आदिवासींना दोन पैसे मिळतात.पळसाच्या पानांच्या विक्रीचा हा शहापूरातील आदिवासींचा पिढीजात व्यवसाय आहे.या व्यवस्यातून आदिवासी कुटुंबे आपली रोजीरोटी भागवतात पळसाच्या पानांच्या व्यवसायासोबत आदिवासी मोठ्या कौशल्याने बांबूपासून टोपल्या,सूप, इरणा,चाप,कनगा आदी वस्तू बनवितात.या सर्व वस्तू साधारण पावसाळा मोसमाच्या नंतर हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या मोसमात शहरांतील आठवडी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.यातून त्यांना दररोज ३००ते ४०० रुपयांची कमाई होते. त्यांच्या बांबू हस्तकलेच्या व्यवसायाने देखील देखील आदिवासींना रोजगार प्राप्त करून दिला आहे. - [ महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा](https://bittambatami.com/2026/04/17/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87/):  महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून शाबासकी अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी भरभरुन शाबासकी दिली. विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य ‘केसरीच्या बालमा’ या गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई नृत्य लोकगीतासह सादर केले. भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता. भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा विकसित भारत या संकल्पने मागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्य, इतिहास, वारसा, स्वातंत्र्यलढा, संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी ‘म्हारो राजस्थान’ हे राजस्थानचे व ‘बंदे उत्कल जननी’ हे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकर, समितीचे सदस्य, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले. - [17 April Bitambatmi All pages](https://bittambatami.com/2026/04/16/17-april-bitambatmi-all-pages-2/): [dflip id=”37810″ type=”thumb”][/dflip] - [ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत दिग्गज संघांची धडक](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%93%e0%a4%ae-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3-%e0%a4%95/): युवा पलटन, भारत पेट्रोलियम, मुंबई पोस्टलसह ११ संघांची पुढील फेरीत मजल मुंबई :प्रभादेवी येथे आयोजित ‘ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६’ स्पर्धेत दिग्गज संघांनी दमदार कामगिरी करत बाद फेरी गाठली आहे. युवा पलटन, मुंबई पोस्टल, भारत पेट्रोलियम, सी.जी.एस.टी., मुंबई बंदर, डी.पी.यू. पुणे, मिड लाईन, मध्य रेल्वे, एच.ए.एल. नाशिक, मीरा भाईंदर महानगर पालिका, युनियन बँक आणि ठाणे महानगर पालिका या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला. आदर्श नगर, वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या साखळी सामन्यांमध्ये फ गटात रायगडच्या मिड लाईन अकादमीने मध्य रेल्वेवर ४९-२० अशी एकतर्फी मात केली. धीरज बैलमारेच्या झंझावाती चढाया आणि आदर्श कुमारच्या पकडीमुळे मिड लाईनने तब्बल २९ गुणांनी विजय मिळवला. मात्र उपविजेते म्हणून मध्य रेल्वेनेही बाद फेरी गाठली. […] - [न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पूल प्रकल्पातील बाधित नागरिकांना मिळाला दिलासा](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%85/): ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे, खेवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बुधवारी आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के व महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर व स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मालती पाटील, नम्रता पमनानी,  नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला. या नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करुन द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करुन प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरे उपलब्ध केली. बुधवारी टेंभीनाका आनंदाश्रम येथे खासदारनरेश म्हस्के यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात 10 बाधित रहिवाशांना घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेव‍िका मालती पाटील  यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.  या रहिवाशांना पर्यायी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी रोहित पिंपळोलकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. - [ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जोरदार आंदोलन](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c/): ठाणे : प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले. प्रांताध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, शिक्षक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शिक्षण विभागाच्या विसंगत धोरणांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनात शिक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा मुद्दा प्रखरपणे मांडण्यात आला. एप्रिल महिना अर्धा संपत आला असतानाही मार्च महिन्याचे वेतन न मिळाल्याने शिक्षकांना कर्जाचे हप्ते आणि आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.  ‘दर महिन्याच्या १ तारखेला पगार’ ही परंपरा कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांचे समायोजन करून त्यांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, आणि तर्कहीन निकष लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांना निवडणूक कामात (BLO) सक्तीने जुंपले जात असल्याचा आरोप करत, शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची मागणी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी केली. परीक्षा व निकालाच्या धामधुमीत १० वी, ११ वी व १२ वीच्या काळात ‘पटपडताळणी’ प्रक्रिया राबवू नये, ती सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली. “प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास १६ एप्रिलचे आंदोलन ही केवळ सुरुवात असेल,” असा इशारा भगवान गावडे यांनी दिला. या आंदोलनावेळी शहाजी खुस्पे (नगरसेवक, ठाणे महापालिका), मारुती पडळकर (सहसचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना), जगदीश भगत (कोकण विभाग अध्यक्ष), नरेंद्र शिंदे (संपर्कप्रमुख, ठाणे जिल्हा), कुलदीप पाटील (अध्यक्ष, ग्रामीण), संतोष गायकवाड (अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय), प्रमोद पाटोळे (प्राथमिक अध्यक्ष), उदय कदम (सरचिटणीस), दिलीप चौधरी (सचिव), प्रशांत सातपुते (विभागप्रमुख), स्मिता पाटील (सचिव, महिला आघाडी), भांगरे सर (प्रसिद्धी प्रमुख), महेश दहिभाते (अध्यक्ष, कोपरी-पाचपाखाडी), विजय भांगरे (समन्वयक) यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. - [विश्व् विजेत्या प्रशांतची हार तर सौरभ मते पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8d-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82/):  राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन वाशी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६० व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या सौरभ मतेने तीन पर्यंत रंगलेल्या लढतीत पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अनिल मुंढेंवर १९-२१, २५-१५ व २२-१७ असा चुरशीचा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला सेट सौरभने केवळ दोन गुणांच्या फरकाने गमावला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याने बरोबरी साधली. आणि तिसरा सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर १७-१७ अशी समान गुणसंख्या असताना शेवटच्या बोर्डात असलेल्या ब्रेकचा फायदा उठवत पाच गुण प्राप्त करून […] - [ होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ, स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती संघांची आगेकुच](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8/):  श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा ठाणे :- होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुषांत, तर स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिलात श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” आपली आगेकूच सुरु ठेवली. पुरुष गटात डॉन बास्कोचा जीत सिंग, तर महिला गटात एस. आय. ई. एस. ची आस्था सिंग दुसऱ्या दिवसांतील उत्कृष्ट खेळाडू ठरले. ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या मैदानावर  सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुरुष गटात ठाण्याच्या होतकरू मंडळाने उपनगरच्या केदारनाथ मंडळावर २८-१९ अशी  मात केली. पूर्वार्धात ०९-१० अशा पिछाडीवर पडलेल्या होतकारूने उत्तरार्धात आपला खेळ गतिमान केला आणि लोण देत सामना आपल्या बाजूने झुकविला. मितेश चव्हाण याच्या चढाया, तर तुषार यादव, देवेन पाटील यांचा भक्कम बचावला विजयाचे  श्रेय जाते. केदारनाथच्या ओमकार कदम, ओम् कदम यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला. मिडलाईन स्पोर्टस् ने अभिषेक भोईर, धीरज बैलमारे, अजित चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळाने अष्टविनायक संघाला  आरामात पराभुत केले.  अष्टविनायकचे स्वयंम गोंधळे, सागर भोईर चमकले. जय भवानी तरुण मंडळाने चिंतामणी स्पोर्टस् ला ३४-२५ असे पराभूत केले ते तुळशीदास शिर्के, कुणाल शिंदे, ऋषिकेश पवार यांच्या चढाई ,पकडीच्या शानदार खेळामुळे. . चिंतामणीचे हर्षल शहा, विशाल सणस उत्तम खेळले. बालगोपाळ मित्र मंडळाने ओवळी मंडळावर रंगतदार लढतीत  ३४-३१ असा विजय मिळविला. पहिल्या डावात चूरशीची लढत झाल्यामुळे मध्यंतरला गुणफलक १४-१४ अशा बरोबरीत होता. मध्यंतर नंतर बाळ गोपाळच्या फाजल नाडर, राज चौधरी, अतिश जीत यांनी आपला खेळ उंचावत संघाला निसटता विजय मिळवून दिला. ओवळीच्या महेश कदम, प्रिन्स यादव, चिराग सिंग यांची लढत‌ एकाकी ठरली. महिला गटात उपनगरच्या स्नेहविकास मंडळाने ठाण्याच्या अश्वमेघ स्पोर्टस् ला २६-२५ असे चकविले. विश्रांतीला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेणाऱ्या स्नेहविकासला नंतर मात्र अस्वमेघ संघाने कडवी लढत दिली. प्राची तावडे, रिया तावडे, प्रांजल जाधव स्नेहविकास कडून, तर वैष्णवी चव्हाण अश्वमेघ संघाडून उत्कृष्ट खेळल्या.. ओम् वर्तकनगर संघाने वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव, पूर्वा इंगवले यांच्या तुफानी खेळाने उपनगरच्या सत्यम सेवा संघाला सहज‌  नमविले. मुंबई शहरच्या अमरहिंदने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी मंडळावर दणदणीत  विजय मिळवला.  छत्रपतीच्या तारा देसाई, रेखा गुप्ता चमकल्या. इतर  निकाल : पुरुष : १)सत्यम सेवा वि. वि. स्व. रतन पाटील मंडळ ४१-१७, २)श्री समर्थ- कलवार वि. वि. श्री स्वामी समर्थ ३६-१७, ३)विवेक स्मृती वि. वि. विजय क्रीडा ३३-१६, ४)गावादेवी-जाभूळ वि. वि. सन्मित्र उपनगर ४६-१०. महिला : १) नवशक्ती स्पोर्टस् वि. वि. किल्ले माऊली ३४-१७, २) विवेक स्पोर्टस् वि. वि. डॉ. शिरोडकर मुंबई ५२-१८. 000000 - [अपयश ही यशाची पहिली पायरी असते - वेंगसरकर](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%b6-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af/): मुंबई, 16 एप्रिल :  अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी नवीन पनवेल येथील त्यांच्या अकादमीच्या मैदानावर झालेल्या एच. डी.एफ.सी. कप साठी खेळविण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले.  पनवेल आणि आसपासच्या परिसरात क्रिकेटची गुणवत्ता ठासून भरलेली असून ती  शोधून  काढण्याची  आणि ती विकसित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.  दरम्यान करण क्रिकेट अकादमी संघाने ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघावर ९ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करणारा ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघ २०.१ षटकांत ७६ धावांत गुंडाळला गेला. आयुष जाधव  (४३) आणि अभय कन्नुजिया (१०) यांनी सातव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केल्याने त्यांना  एवढी मजल मारता आली.    आदर्श जैस्वाल  (२ धावांत २ बळी), राजवीर पाटील (२० धावांत २ बळी), श्लोक कवडे (१७ धावांत २ बळी) आणि लीला संघवी (९ धावांत २ बळी)  यांनी टिच्चून गोलंदाजी करत ही करामत केली.  या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ बिस्वास (१०) आणि पियुष दांडे (नाबाद ४१) यांनी २५ धावांची सलामी दिली तर नंतर दांडे आणि लीला संघवी (नाबाद १८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची अभेद्य भागीदारी करून आपल्या संघाच्या विजेतेपदावर शिक्का मोर्तब केले.  स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू  आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आदर्श जैस्वाल याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून रिषभ बिस्वास आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून मनसवा नांदोस्कर यांची निवड करण्यात आली.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सुमीत झुंजारराव यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक :-  ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघ २०.१ षटकांत  सर्वबाद ७६ (आयुष् जाधव  ४३, अभय कन्नुजिया १० ; आदर्श जैस्वाल २ धावांत 2 बळी , राजवीर पाटील २० धावांत २ बळी, श्लोक कवडे १७ धावांत २ बळी, लीला संघवी ९ धावांत २ बळी) पराभूत वि. करण क्रिकेट अकादमी १६.२ षटकांत  १ बाद ७८ (रिषभ बिस्वास १०, पियुष दांडे नाबाद ४१, लीला संघवी नाबाद १८). - [ महिला शक्तीचा दमदार ‘स्मॅश’](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae/): ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांची सुवर्णमयी कामगिरी! मुंबई व भुवनेश्वर येथे पार पडलेल्या विविध प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ठाण्याच्या क्रीडा विश्वात अभिमानाची नोंद केली आहे. अनुभवी खेळाडू अजिता रवींद्रन आणि उदयोन्मुख तारा समृद्धी सिंह यांनी आपल्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाने “महिला शक्ती”ची ताकद पुन्हा अधोरेखित केली. मुंबई येथे झालेल्या ३२व्या जी. डी. बिर्ला मेमोरियल ओपन व्हेटरन मास्टर्स इंटर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ४५ वर्षांवरील महिला एकेरी गटात अजिता रवींद्रन हिने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत तिने सोनल बट्टड हिच्यावर १५–१०, १५–७, १५–१३ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत नामिता मेहता-विजयकर यांच्याविरुद्ध २१–१४, १५–२१, २१–११ अशी चुरशीची लढत जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अव्वल मानांकित पूजा झलानी हिच्याविरुद्ध २४–२६, २१–१९, २१–१८ असा थरारक विजय मिळवत अजिताने आपले अनुभव, संयम आणि जिद्द सिद्ध करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, भुवनेश्वर येथे ७ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची समृद्धी सिंह हिने दुहेरी यश मिळवत आपली चमकदार कामगिरी नोंदवली. तिने सी.ए.जी. संघाचे नेतृत्व करत संघ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तसेच वैयक्तिक प्रकारात महिला दुहेरी गटात रौप्यपदक जिंकत “डबल बोनान्झा” साध्य केला. तिच्या खेळातील आत्मविश्वास, कोर्टवरील हालचाल आणि निर्णायक क्षणांतील स्थैर्य विशेष उठून दिसले. या यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खांडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सुरू असलेल्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील प्रशिक्षण व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले तसेच प्रशिक्षक टीमच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर यश मिळत आहे. या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपआयुक्त मीनल पलांडे यांनी अभिनंदन करताना सांगितले, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील महिला खेळाडू सातत्याने उच्च पातळीवर कामगिरी करत आहेत. अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांचे यश हे ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिबिंब आहे आणि भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली असून, महिला खेळाडूंच्या या यशामुळे ठाण्यातील क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. - [राज्यातील कामगारांच्या न्यायासाठी भारतीय मजदूर संघाचा मोर्चा](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): रमेश औताडे मुंबई : सरकारने कामगारांसाठी कामगार धोरण फक्त कागदावरच ठेवले आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगार आज हलाखीचे जीवन जगत आहे.  हाच राग घेऊन भर उन्हात महाराष्ट्रातील सर्व वर्गातील कामगार भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली गुरुवारी आक्रोश मोर्च्यात सामील झाले होते. मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर  सुमारे पाच हजार पेक्षा जास्त कामगार या मोर्च्यात सहभागी झाले. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल डुमणे व महामंत्री किरण मिलगिर यांनी शिष्टमंडळासह कामगार आयुक्त व कामगार मंत्री यांची भेट घेतली. राज्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी धोरणे असली तरी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण नाही, राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरोघरी काम करणारे कामगार, आशा व अंगणवाडी सेविका, फेरीवाले, बीडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, पेन्शनधारक तसेच विविध उद्योगांतील कामगार यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. राज्यासाठी स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे, शासनातील कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू करणे, बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचार थांबवणे, वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवणे, तसेच विविध उद्योगांतील कायम व कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी कामगार आयुक्त व कामगार मंत्री यांच्याकडे केली. - [चेकु आणि एयू स्मॉल फाईनान्स बँकेकडून भारतातील पहिले एलइडी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%81-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%8f%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%89%e0%a4%b2-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8%e0%a4%be/): टॅप-टू-पे दरम्यान उजळणाऱ्या LED तंत्रज्ञानासह आधुनिक पेमेंट अनुभव; स्मार्ट रिवॉर्ड्स वर भर मुंबई, १५ एप्रिल २०२६ : भारताची आघाडीची क्रेडिट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म चेकु ने एयू स्मॉल फाईनान्स बँक यांच्या भागीदारीत देशातील पहिले को-ब्रँडेड LED क्रेडिट कार्ड ‘चेकु एयू क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. या अभिनव कार्डद्वारे पेमेंट अनुभव अधिक सुलभ, आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्याचा उद्देश आहे. हे कार्ड टॅप-टू-पे व्यवहाराच्या वेळी इन-बिल्ट LED लाईटमुळे उजळते, ज्यामुळे व्यवहार यशस्वी झाल्याची त्वरित दृश्य पुष्टी मिळते. विशेष म्हणजे ही LED लाईट POS टर्मिनलमधील NFC फील्डमधूनच ऊर्जा घेते, त्यामुळे वेगळ्या बॅटरीची गरज भासत नाही. नव्या युगातील डिजिटल ग्राहकांना लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या या कार्डमध्ये सुलभ ऑनबोर्डिंग, सहज पेमेंट अनुभव आणि एकसंध रिवॉर्ड्स इकोसिस्टम देण्यात आली आहे. १५ दशलक्षांहून अधिक क्रेडिट कार्ड्स आणि ४ दशलक्ष वापरकर्त्यांच्या अभ्यासावर आधारित […] - [ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना पुरेसा निधी द्यावा](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87/): काँग्रेस नगरसेवक, गटनेते अश्रफ आजमी यांची मागणी केतन खेडेकर मुंबई : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाज- ‘अ’ आणि ‘ब’ २०२६-२७ हयांस स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे. सदर अर्थसंकल्पात इतर पक्षांच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना जास्त निधी देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या नगरसेवकांना फक्त २५ लाख निधी दिला असून  इतर पक्षांचे नगरसेवकांना २ कोटी पेक्षा जास्त आणि इतर पक्षाच्या गटनेत्यांना २० ते ३० कोटीची निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांमध्ये भेदभाव केला गेला आहे. त्यामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये नागरिकांकरिता सार्वजनिक कामे आणि प्रभागाचा करणे शक्य होणार नाहीत.  भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षांच्या नगरसेवकांना सदर निधी अत्यंत अपुरा आणि प्रभागच्या नागरिकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तरी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना कोणताही भेदभाव न  करता सदर निधी वाढवून देण्यात यावा. अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी महापौरांना पत्र देऊन केली. 0000000000 - [काळू व शाई धरणासाठी मंत्रालयात संयुक्त बैठक होणार](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%82-%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4/):  वन मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर  काळू व शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे वन मंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी आज येथे दिले. गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू व शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच त्यांचे ठाणे शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावे, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या बैठकीला स्थानिक आमदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे २००२ पासून सुरू आहे. मात्र, काळू व शाई ही दोन्ही विविध मुद्द्यांवरून रखडली. दोन्ही धरणांचे भूसंपादन पूर्ण झाले नसून, ग्रामस्थांकडून विरोधही केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रश्नावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका व तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असे पॅकेज देण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू व शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात ४०० ते ५०० चौरस फूटांची सदनिका किंवा एकरकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 000000 - [कल्याणमध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाचे जल्लोषात स्वागत](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80/): कल्याण :  कल्याण  येथे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या स्वागतार्थ भाजप महिला आघाडीने रॅली काढत जल्लोष साजरा केला. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्या वतीने भव्य रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभेत नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले यानिमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका रेखा चौधरी, सरचिटणीस प्रीती दीक्षित, नगरसेविका मनीषा गायकवाड, स्नेहल मोरे, डॉ. पूजा गायकवाड, भाजपा पदाधिकारी वंदना मोरे आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणपती मंदिर येथून या रॅलीला सुरवात करून सिद्धार्थ नगर, म्हसोबा चौक, तिसगाव नाका मार्गे तिसाई हाऊस येथे रॅलीची सांगता करण्यात आली. - [नारी शक्ती वंदन’ हे विधेयक देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल - नरेश म्हस्के](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7/):  ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा नवी दिल्ली : ज्या हातांनी पाळणा हलवला, तेच हात आज देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहेत आणि तेच हात आज सर्वोच्च सभागृहात कायद्याची निर्मिती करणार आहेत. ‘नारी शक्ती वंदन’ हे विधेयक त्या अदृश्य हातांना दृश्य ताकद देण्याचे कार्य करुन देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल, अशी भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत मांडत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा व्यक्त केला. ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकावर शिवसेना पक्षाची भूमिका मांडली. खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ज्ञानाची देवी सरस्वती आहे तर शौर्याचे प्रतिक माँ दुर्गा आहे. अहिल्याबाई होळकरांनी एक उत्तम शासक म्हणून राज्य कारभार चालविला. आज महिला ग्रामसेविकेपासून सरपंच पदापर्यंत आपल्या गावचा कारभार हाकात असून पूर्ण गावाचा कायापालट त्यांनी केला आहे. आज देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान असून ती अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचा फक्त नारा नसून एक ध्येय्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. महाराष्ट्रात तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहिण योजना सुरु झाली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने ते क्रांतिकारी पाऊल होते. ती केवळ आर्थिक मदत नसून माता-भगिनींच्या स्वाभिमानाचा सन्मान होता. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्धर करुन मुख्य प्रवाहात आणले गेले. आज या विधेयकामुळे महिलांचा संसदेत आज गुंजणार असून देशाची प्रगतीकडे वाटचाल अजून मजबूत होईल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या ऐतिहासिक विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना आवाहन करत हे विधेयक एका पक्षाचे नसून या देशाच्या ‘मातृशक्तीचे’ प्रतिक आहे. आपल्या समर्थनामुळे जगाला हा संदेश जाईल की, भारत आपल्या मुलींच्या पंखांना आकाश देण्यास सज्ज आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले. - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणी सेनेचे आरक्षण पत्र](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab/): मुंबई / रमेश औताडे ज्या धर्मात जाती व्यवस्था नाही त्यांना हिंदू जातीचे आरक्षण का देता ? ते तात्काळ थाबवा व हिंदूच्या आरक्षित जातीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी एका पुस्तकाचा दाखला देत एका पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. संविधान सभा सदस्य शिवा राव यांच्या “फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन” या पुस्तकातील संदर्भ असे सूचित करतो की अस्पृश्यतेच्या प्रथेला इतर कोणत्याही धर्माने मान्यता दिली नव्हती, म्हणून अनुसूचित जाती हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माशी संलग्न असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अनुसूचीत जात करणाबाबत मूलभूत निकष अस्पृश्यता आहे जी हिंदू धर्मात एक प्रमुख सामाजिक दुष्कृत्य होती. जी फक्त हिंदू धर्मातच आहे. त्यामुळे अनुसूचित जातींच्या बाबतीत धर्म दुर्लक्षित करता येणार नाही. ‘ अनुसूचित जाती’ म्हणजे काय हे स्पष्ट करताना केवळ गरिबी किंवा मागासलेपणा हा एकमेव निकष असू शकत नाही. अस्पृश्यतेमुळे अपंगत्व या वर्गाला अनुसूचित जाती म्हणून गटबद्ध करण्याचा निकष आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या २८ नोव्हेंबर २००२ रोजी च्या निकालपत्रात संविधान सभेने मान्यता दिली की अनुसूचित जाती हिंदू समुदायाचा एक मागासवर्गीय घटक होता. संविधानातील कलम ३४१ आणि ३४२ च्या कलम (२) मध्ये तरतूद केल्याशिवाय राष्ट्रपतींच्या आदेशात सुधारणा करण्याचा कोणताही प्रयत्न किंवा कोणतेही परिपत्रक अथवा राजपत्रक काढता येत नाही असे सेंगर यांनी संदर्भ देत सांगितले. 000000000 - [वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b8-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af/): – दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश कळवा: निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’तर्फे आयोजित ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ या विशेष व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मनीषा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात हा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी साळवी व पाटील यांच्या अभ्यासपूर्ण वन्यजीव आणि वनस्पती छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमण यांनी पक्ष्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. “धारदार मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात. आकाश जसं आपलं आहे, तसंच ते पक्ष्यांचंही आहे,” असे सांगत त्यांनी पर्यावरणाबद्दल संवेदनशीलतेची गरज व्यक्त केली. “आकाश हे उघडं पुस्तक आहे; जसं जंगल वाचायला शिकायला हवं, तसंच आकाशही वाचता आलं पाहिजे,” असे सांगत त्यांनी खगोल आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ घातला. तसेच लोणार अशनी विवर आणि भास्कराचार्यांचे जन्मस्थान पाटण (चाळीसगावजवळ) या स्थळांना भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहापूर येथील ठाकूर बंधूंनी उभारलेले तारांगण व वेधशाळा पाहण्याचा आग्रह त्यांनी यावेळी धरला. कार्यक्रमात वन्यजीव प्रेमी साधना वझे यांनी ‘अर्जुन’ या बिबट्याचे दत्तकत्व घेतल्याचा अनुभव सांगितला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दत्तक योजनेद्वारे त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. वन्यजीव अभ्यासक शैलेंद्र पाटील यांनी ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर मार्गदर्शन करताना “जंगल रीडिंग”चे महत्त्व अधोरेखित केले. प्राण्यांच्या पाऊलखुणा, कॉल्स आणि वॉर्निंग सिग्नल्स ओळखणे ही जंगल अनुभवण्याची खरी किल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. “वाघाच्या मागे धावण्यापेक्षा जंगल अनुभवणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या सादरीकरणातील स्लाईड शोने उपस्थितांना जंगलातील थरारक अनुभव दिला. यावेळी प्रदीप साळवी यांनी वनसंवर्धनावर भाष्य करत “झाडे टिकली तरच जंगल टिकेल” हा संदेश दिला, स्वतः.पक्षी अभयारण्य तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला . कार्यक्रमात भटकंती छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह टॉक शो आणि साहसी मोहिमांचा स्लाईड शो यामुळे हा उपक्रम केवळ व्याख्यान न राहता एक समृद्ध ‘अनुभवयात्रा’ ठरला. हिमांशु प्रदीप साळवी यांनी विचार संवादाची संकल्पना मांडली तर प्राचार्य डॉ.धनंजय पष्टे यांनी प्रास्ताविक केले. उपवनसंरक्षक ठाणे यांचे विशेष सहकार्य  लाभले. वन्य अधिकारी नरेंद्र मुठे (RFO) व अनेक वन सहाय्यक अधिकारी यांच्यासह वाइल्ड लाइफ वेलफेर असोसिएशन तसेच  प्रा. मेधा सोमण, नगरसेविका अपर्णा साळवी, शोभा वेलफेअर असोसिएशन डॉ.. किरण पष्टे, सौ. लता साळवी अनेक मान्यवर उपस्थित होते. - [दिव्यांग मुलांची विशेष सहल!](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b7/): मती मंद मुलांच्यात कार्य करणाऱ्या विश्वास संस्थेच्या मुलांची सहल, नेरळ येथील बेंद्रे वेद ऍग्रो फार्म मध्ये १४ एप्रिलला संपन्न झाली आहे.  या सहलीचे नियोजन आणि आयोजन अशी संपूर्ण जबाबदारी ‘जिज्ञासा’ संस्थेने घेतली होती. ‘बेंद्रे फॉर्म’ मधील निसर्ग रम्य वातावरणात मुलानी भरपूर खेळ आणि मस्ती मजा केली. येथील गोशाळा हे मुलांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. गोशाळेचे प्रमुख, योगेश राजपूत यांनी अगदी सोप्या भाषेत गोमातेचे महत्व समजावून सांगितले.गाई पासून मिळणारे, दूध, दही, ताक लोणी आणि तूप यांची  चविष्ट ओळख मुलांना मिळाली. शेणाच्या गोवऱ्या, खत गोमूत्र या गोधनाचे महत्व मुलांना सांगितले. तेथे विविध जातीच्या गाईंची, बैलांची ओळख  त्यांनी मुलांना करून दिली. मुलानी तेथील वासरांना जवळ घेऊन त्यांच्या वर माया केली. ‘जिज्ञासा’च्या सुमिता दिघे यांनी फॉर्म हाउस मधील विविध प्रकारची झाडे ,फूले, फळे यांची ओळख मुलांना करून दिली. दिवस भर मुलांबरोबर सुरेंद्र दिघे ,विश्वास संस्थेच्या मुख्याध्यापिक मीना क्षीरसागर, शिक्षक आणि स्वयंसेवक  वसुधा मोंडकर , मंगल शिंदे , कार्यकर्त्या शिल्पा कर्णिक व पालक सहभागी झाले होते. या उपक्रमास, बेंद्रे ऍग्रो फार्मचे मालक श्याम बेंद्रे यांचे  सुनियोजित सक्रिय सहकार्य लाभले होते. 00000000 - [ नगरसेवकांचा संताप, ‘एस’ विभागात कामांचा बोजवारा](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa-%e0%a4%8f%e0%a4%b8/):  पालिका प्रशासनावर ताशेरे मुंबई–डुप परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पालिकेच्या ‘एस’ विभागातील नगरसेवकांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. रखडलेली कामे, गॅस जोडणीचा ठप्प कारभार आणि पावसाळ्यापूर्वीची अपुरी तयारी यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका दिपमाला बढे, राजोल संजय पाटील, ज्योती राजभोज, सुरेश शिंदे तसेच संबंधित अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. मात्र बैठकीत प्रशासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त होण्याऐवजी तीव्र नाराजीचाच सूर उमटला. भांडुप परिसरातील नव्याने उभारलेल्या अनेक इमारतींना अद्याप महानगर गॅस पाईपलाईनची जोडणी मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणा ढिम्म असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे नगरसेवकांनी स्पष्टपणे सांगितले. नालेसफाई,गटारे दुरुस्ती आणि इतर अत्यावश्यक कामे अद्याप सुरूही झाली नसल्याने येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत असून त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. भांडुपमध्ये मोठ्या प्रमाणावर उंच इमारती उभ्या राहत असताना शिवरेज लाईनच उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली केवळ इमारती उभारल्या जात आहेत, मात्र मूलभूत सुविधा देण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. महानगर गॅस जोडणीचे काम संथ गतीने सुरू असून प्रशासन आणि संबंधित कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसत असल्याची टीका करण्यात आली. नागरिकांना सुविधा देण्याऐवजी त्यांना त्रास सहन करायला लावणारे हे धोरण असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. बैठकी दरम्यान सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि गॅस जोडणी प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अशा आश्वासनांचा पाऊस दरवेळी पडतो, पण प्रत्यक्षात कामे होत नाहीत, असा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला इशाराही दिला. - [वृक्षतोडी विरोधात हरकतींचा पाऊस](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%80/): – पंचवटीतील प्रस्तावित वृक्षतोडीवर शंभरहून अधिक हरकती हरिभाऊ लाखे नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंचवटी परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. रस्ते रुंदीकरणासाठी तब्बल ५८४ वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर शंभरहून अधिक हरकती प्राप्त झाल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. वृत्तपत्र सदस्यता तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच महापालिकेने नव्याने पंचवटीतील नांदूर गाव ते नांदूर नाका आणि नांदूर नाका ते जत्रा चौक या मार्गावर १९७ वृक्ष, पेठ रोड ते आरटीओ कॉर्नर, आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी स्कूल आणि नीलगिरीबाग या मार्गावर ३८७अशा प्रकारे एकूण ५८४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, संबंधित वृक्षांवर लाल खुणा करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्राथमिक खोदकामालाही सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेले आहेत. विशेषतः करंज, कडुनिंब, आंबा, जांभूळ, गुलमोहर, सोनमोहर, बकुळ, बेल यांसारख्या वृक्षांच्या तोडीला विरोध होत आहे. काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला, तरी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड पर्यावरणासाठी घातक ठरेल, अशी भूमिका हरकतदारांनी घेतली आहे. यापूर्वी तपोवन येथे साधुग्रामसाठी प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी १८२५ वृक्ष तोडीचा मुद्दा गाजला होता. तो सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच आता पंचवटीतील नव्या वृक्षतोडीच्या प्रस्तावामुळे पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी लवकरच होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते. नागरिकांच्या आक्षेपांना कितपत न्याय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. - [मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एसटी महामंडळाचा कर्मचारी गंभीर जखमी](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d/): उल्हासनगर ( सुनिल इंगळे ): उल्हासनगर शहरात मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरील या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नुकताच उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील साईनाथ नगर यादव चाळ या ठिकाणी रस्त्यावरील मोकाट कुत्र्याने एका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याच्या पायाचा लचका तोडून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. त्याच परिसरात यापूर्वी देखील मोकाट कुत्र्यांनी काही जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली होती. या मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रस्त्यावरील मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव मनोज भाऊसाहेब मालुंजकर (४० ) असे आहे. मनोज हे उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ रिसरातील कुर्ला कॅम्प हनुमान मंदिराजवळ आपल्या कुटुंबास राहतात. ते मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळामध्ये काम करतात. ते नेहमी सकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास जिमला जात असतात. काल सकाळी सहाच्या सुमारास ते जिम वरून घरी परत येत असताना साईनाथ नगर यादव चाळ येथील रोडवरील ५ ते ६ मोकाट कुत्र्यांची टोळी बसली होती. त्या टोळीतील एका काळ्या कुत्र्याने मनोज यांच्यावर अचानक हल्ला केला. त्या कुत्र्याने मनोज यांच्या उजव्या पायाला जबरी चावा घेऊन त्यांच्या पायाचा लचका तोडला. रक्तरंजित झालेल्या अवस्थेत मनोज यांनी त्या मोकाट कुत्र्याचा प्रतिकार केल्यामुळे त्या कुत्र्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. मनोज यांनी त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतले आहेत. याआधी देखील हनुमान नगर मंदिर परिसर, साईनाथ नगर व यादव चाळ या ठिकाणी रस्त्यावरील मोकाट व चावक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे पहाटेच्या सुमारास व रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून जाणे देखील मुश्किल झाले आहे. याशिवाय हे मोकाट कुत्री लहान मुलांना देखील चावा घेण्यासाठी पाठलाग करीत असतात. मनोज मालुंजकर यांनी या मोकाट कुत्र्या संदर्भात काहीतरी उपयोजना करण्यासाठी स्थानिक नगरसेविका अंजली साळवे व सुरेखा सुरेश सोनावणे यांच्याकडे विनंती केली आहे. - [- उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती पदासाठी नामनिर्देशक पत्र दाखल](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d/):  सर्वांचीच बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती”पदासाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी उल्हासनगर महापालिका सचिव अनंत जावद्वार यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे.  स्थायी समिती सभापती पदासाठी सहोता कलवंत सिंग यांनी अर्ज दाखल केला तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी दुधानी दिप्ती नवीन नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी मिनाकौर अजितसिंग लबाना, पाणी पुरवठा व जलः निसारण समिती सभापती पदासाठी दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परिक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती सभापती पदासाठी  सविता प्रवीण तोरणे, माध्यमिक शिक्षण व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी साक्षी संदिप सुर्वे, गलिच्छ वस्ती व निर्मुलन समिती सभापती पदासाठी विपुल दत्ताराम मयेकर, क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी प्रीती विनोद मखिजा, महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी मिना दिपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी प्रेरणा अजित माखिजानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे. त्यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम, उपमापोर अमर लुंड, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश वधारीया, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना गटनेते अरुण आशान, मनोज लासी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यावेळी गोपाळ लांडगे म्हाणाले महापालिकेच्या नियमाप्रमाणे महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती आणि ९ इतर विशेष समित्या यांच्या सभापतीची आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती, सर्वांनी वेळेमध्ये फॉर्म दाखल केले आहेत, शिवसेनेला ५ विशेष समित्या आणि भाजपाला ४ समित्या मिळाल्या आहेत .याप्रमाणे फॉर्म भरण्यात आले आहेत. निश्चितपणे ५ वर्षांमध्ये सर्वांना संधी मिळेल त्यामुळे पहिल्याच वर्षी सगळ्यांना अपेक्षाप्रमाणे संधी मिळालेली नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरी सर्वांनाच ज्या कमिटी आहेत त्याप्रमाणे सर्वांना संधी मिळणार आहे आणि या महापालिकेचे कामकाज समितीच्या माध्यमातून यापुढे अधिक गतीने निश्चित होईल असे सांगितले. - [ लग्नाच्या आश्वासनांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80/): ‘लुटेरी दुल्हन’सह दोन जणांना अटक मिरा -भाईंदर : लग्नाची आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी खोट्या लग्नाच्या नावाखाली नवऱ्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. सेवकुमार बंगपांडी (५३), यांना आरोपींनी लग्नासाठी उपलब्ध असलेली एक महिला शोधून देण्याचे आश्वासन देऊन फसवले. आरोपींनी त्या महिलेचे फोटो पाठवले, तिच्याशी संवाद साधला आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली, आरोपींनी पीडिताला विविध बँक खात्यांमध्ये अंदाजे ₹४४,६५० जमा करण्यास फसवले. त्यानंतर आरोपी महिलेने (बनावट वधू) त्यांचा विश्वास संपादन केला आणि पीडिताच्या घरातून अंदाजे ₹४७६,००० किमतीचे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून पसार झाली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी नेहा उर्फ जया (वय ३२) आणि नाशिक येथील रहिवासी केसरीमल लक्ष्मीलाल रांका (वय ४५) यांचा समावेश आहे. दोघांना १३ एप्रिल २०२५ रोजी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, आरोपींनी अहमदनगर, मुंबई (जोगेश्वरी, बोरिवली) आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुकी केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलीस इतर संभाव्य पीडित आणि टोळीच्या उर्वरित सदस्यांचा शोध घेत आहेत. - [सासऱ्यांनी दिलं आयुष्याचं अनमोल गिफ्ट](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af/): दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट, जावयाला मिळालं नवजीवन मिरा – भाईंदर : नात्यांची खरी ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका सासऱ्यांनी आपल्या जावयाला नवजीवन मिळावे म्हणून स्वतःची किडनी दान केली. माणुसकी आणि नात्यांच्या भावनेचा हा सुंदर संगम मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे पाहायला मिळाला, जिथे डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ३९ वर्षीय रुग्ण, जो मधुमेहाने त्रस्त होता आणि शारीरिकदृष्ट्याही खूप अशक्त झाला होता, तो बराच काळ किडनी फेल्युअरशी झुंज देत होता. कुटुंबात योग्य डोनर मिळत नव्हता. अशा वेळी ५५ वर्षीय सासऱ्यांनी पुढाकार घेत आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला—जरी त्यांचा ब्लड ग्रुप वेगळा होता (एबी पॉझिटिव्ह डोनर ते बी पॉझिटिव्ह रुग्ण). या प्रकरणाबद्दल बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. पुनीत भुवानिया यांनी सांगितले की, हा केस वैद्यकीय आणि मानवी अशा दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत विशेष आहे. इतक्या उच्च अँटीबॉडीज असताना एबीओ इनकम्पॅटिबल ट्रान्सप्लांट करणे खूप आव्हानात्मक असते, पण सासऱ्यांच्या निःस्वार्थ निर्णयामुळे हे शक्य झाले. ते पुढे म्हणाले की, हा “एबीओ इनकम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट” होता, जो सामान्य ट्रान्सप्लांटपेक्षा अधिक धोकादायक असतो. शरीरातील अँटीबॉडीज नव्या किडनीला नाकारू शकतात, ज्यामुळे इन्फेक्शन आणि गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी आधी विशेष “डिसेन्सिटायझेशन” प्रक्रिया करून अँटीबॉडीजची पातळी कमी केली आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली। ऑपरेशननंतर अवघ्या एका महिन्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले—रुग्ण आता डायलिसिसमुक्त झाला आहे, त्याचे वजन वाढत आहे आणि तो हळूहळू सामान्य आयुष्याकडे परतत आहे. विशेष म्हणजे किडनी दान करणारे सासरेही पूर्णपणे निरोगी आहेत. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारतीय कुटुंबांची मुळे अजूनही घट्ट आहेत। सासरा आणि जावई हे नातं अनेकदा औपचारिक मानलं जातं, पण इथे ते वडील-मुलाच्या नात्यात बदलले.  ही घटना आपल्याला एकच संदेश देते—जीवन कितीही आधुनिक झालं तरी नात्यांची ऊब, त्याग आणि प्रेम हेच आपल्या संस्कृतीचं खरं बळ आहे. 00000000000 - [अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवणारे विधान करणारे संजय शिरसाट यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध !](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6/): अनिल ठाणेकर ठाणे : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. आम्ही आवाहन करीत आहोत की महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित  सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून  दाखवू.छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे. मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि अफवांच्या प्रभावाखाली अनेक गोष्टींची कल्पना करतो. अंधार, एकटेपणा, मानसिक ताण किंवा पूर्वग्रह यांच्या परिणामामुळे लोकांना “काहीतरी आहे” असे वाटू शकते. पण त्या अनुभवांचा अर्थ अलौकिक शक्ती असा होत नाही.महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की—कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे,भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तव नाहीत,समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने २०१३ ला मंजूर झाला असून त्या कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा ,मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.त्याचा मंत्रालयाचा मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात,याचा आम्ही निषेध करतो,मंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा.अशा अवैज्ञानिक,अतार्किक विधाने करणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्र मागे खेचत आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा भीती पसरवणाऱ्या कल्पनांपासून दूर राहूया, आणि विवेक, विज्ञान व सत्याच्या बाजूने ठाम उभे राहूया.विवेकी समाज बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी विधाने समाजाला घातक ठरतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. - [महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहीम](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%8b%e0%a4%b2-3/): ठाणे :  ठाणे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग ४ परिसरात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत  आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली सर्कल, मानपाडा सिग्नल तसेच टिकूजीनी वाडी रोड व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन रस्ते पाण्याने साफ करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, सिद्धार्थ पांडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर तायडे, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागात व्यापक स्वरूपात राबविली जात आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुमारे १५० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी दोन जेटिंग मशीन, शौचालय स्वच्छता गाड्या, C&D, JCB, डंपर तसेच लहान-मोठ्या मिळून १० घंटागाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मोहिमेदरम्यान एकूण १० टन कचरा व माती उचलण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत गार्डन विभाग, अतिक्रमण विभाग, फायलेरिया विभाग तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, हेमंत चौधरी,  बांधकाम विभागाचे अभियंता रणधीर तसेच इतर स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी सर्वंकष स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागात  नियमित राबविण्यात येणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. - [माजी खासदार-आमदारांची पेन्शन बंद करा](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa/): मनसे नेते राजू पाटील यांची मागणी कल्याण : देशभरात खासदार-आमदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी धाडसी वक्तव्य केलं आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या मागणीत त्यांनी स्वतःचाही समावेश केला आहे. राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून (ट्विट) या विषयावर भूमिका मांडली आहे. त्यांच्या मागणीमागील प्रमुख कारण म्हणजे, आगामी काळात देशात होणारी जनगणना आणि त्यानंतर होणारी पुनर्रचना यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. प्रतिनिधींची संख्या वाढली की, पर्यायाने माजी खासदार आणि आमदारांच्या पेन्शन आणि सुविधांचा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर, म्हणजेच पर्यायाने जनतेवर वाढत जाणार आहे. सामान्य नागरिक आणि करदात्यांच्या पैशाचा असा वापर होणे चुकीचे आहे. ही नासाडी आताच थांबवणे गरजेचे आहे,” असे राजू पाटील यांनी नमूद केले. राजू पाटील यांनी म्हटले की, माजी आमदार म्हणून मी सुद्धा या पेन्शन योजनेत येतो, पण मलाही ही सवलत नको आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केवळ राजकीय मुद्द्यांऐवजी लोकप्रतिनिधींच्या पेन्शनसारख्या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होऊन ऐतिहासिक निर्णय घेतला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. वाढत्या महागाईच्या काळात सामान्य जनतेला सुविधा देताना हात आखडता घेणाऱ्या सरकारने लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत, ही यामागची मूळ भावना आहे. - [लोकदरबारात प्रताप सरनाईक यांनी ७०% तक्रारींचे केले ऑन दि स्पॉट निराकरण](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be/): मीरा-भाईंदर: कधी सुस्त प्रशासन, तर कधी फाईलींच्या जंजाळात अडकलेला सामान्य माणूस… पण आज मीरा-भाईंदरमध्ये चित्र काहीसं वेगळं होतं. जनतेचा थेट संवाद आणि प्रश्नांचा जागच्या जागी निपटारा करण्यासाठी आज मीरा भाईंदर शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि मीरा-भाईंदर शहराचे लाडके लोकप्रतिनिधी प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले असून खऱ्या अर्थाने लोकांना येथे न्याय मिळायचे दिसले. केवळ आश्वासनं नाही, तर थेट कृतीचा अनुभव आज मीरा-भाईंदरकरांनी घेतला. लोकशाहीत जनता हीच राजा असते, हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून आयोजित या लोकदरबारात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, परिवहन आणि वाहतूक विभागाचे अधिकारी एकाच व्यासपीठावर हजर होते. सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकणे आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ मार्गी लावणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी बोलावलेल्या या दरबारात काही अधिकाऱ्यांनी दांडी मारणे मंत्री सरनाईक यांना मुळीच रुचले नाही. अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांची त्यांनी जाहीर कानउघाडणी करत, “जनतेची कामे टाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा दिला. लोक दरबारातील मंत्री सरनाईक यांचा हा रुद्रावतार पाहून उपस्थित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या पहिल्याच लोकदरबारात एकूण २७३ नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. यात सर्वाधिक तक्रारी महापालिकेच्या कारभाराशी संबंधित होत्या. सरनाईक यांनी कोणताही विलंब न लावता, उपस्थित असलेल्या आयुक्तांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रश्नांची सरबत्ती करून अनेक प्रकरणांत जागच्या जागी निर्णय घेण्याचे आदेश दिले.या लोकदरबारात केवळ महापालिकेच्या तक्रारींचाच पाऊस पडला नाही, तर ७/११ कंपनीच्या विरोधात नागरिकांनी संतापाची लाट उसळली होती. ७/११ कंपनीकडून सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे त्रस्त झालेल्या शेकडो नागरिकांनी पुराव्यांसह आपल्या कैफियती मांडल्या. या कंपनीच्या मनमानी कारभाराची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली. “जनतेची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मीरा-भाईंदरकरांना दिलासा देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली. “हा केवळ एकदाच होणारा कार्यक्रम नाही. इथून पुढे दर महिन्याला असाच लोकदरबार मीरा -भाईंदर शहरात भरवला जाईल,” असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. यामुळे प्रशासकीय विलंबाचा फटका बसणाऱ्या सामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणतात की, “जनतेचा वेळ आणि पैसा दोन्ही महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांनी खुर्चीवरून उठून लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. हा लोकदरबार म्हणजे सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे व्यासपीठ आहे. महापालिकेच्या रखडलेल्या कामांपासून ते ७/११ कंपनीच्या जाचापर्यंत प्रत्येक विषयावर सरनाईक यांनी जनतेला आश्वस्त केले. “मीरा-भाईंदरचा नागरिक हा या शहराचा मालक आहे, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही,” असा शब्द देत त्यांनी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईला चाप लावणारा हा ‘लोकदरबार’ शहरात सध्या चर्चेचा विषय ठरला असून, मंत्री सरनाईक यांच्या या धाडसी पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.आजचा हा लोकदरबार केवळ एक कार्यक्रम नसून, मीरा-भाईंदरच्या सामान्य जनतेच्या प्रश्नांना मिळालेली ‘मंत्रालयीन ताकद’ आहे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. - [कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन](https://bittambatami.com/2026/04/16/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95-%e0%a4%aa/): अनिल ठाणेकर   ठाणे : महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधकी वारसा माणूसपण राखणारा, चिकित्सा करणारा आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पर्यायी समाज व्यवस्था फुले यांनी उभी केली. अंधश्रद्धा, बुवाबाजीमुक्त समाज करण्याचे काम अंनिस करीत आहे. अंनिसने दोन हजार हून अधिक सत्यशोधक विवाह लावले आहेत जात,धर्म,लिंग भेदाला विरोध करण्याचा विचार जोतीराव यांनी दिला.सत्यशोधक परिषदेचा उद्देश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले वैचारिक मूल्यांचा वारसा पुढे शाहू महाराजांनी तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर हल्लीच्या काळात दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे नेला त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की तो वैचारिक वारसा पुढे न्यायचा. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊन ते कार्य पुढे न्यावे. असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले. महात्मा जोतिबा फुले जन्मद्विशताब्दी वर्षाचा आरंभ,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाचे शंभरावे वर्ष आणि लोकनेते दि बा पाटील यांची जन्मशताब्दीचे वर्ष या प्रसंगांचे औचित्य साधून  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय सत्याशोधक परिषदेचे आयोजन १२ एप्रिल रोजी के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लौकीकाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तुकाराम महाराज यांच्या गाथेच्या आणि  महात्मा जोतिबा फुले  यांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती एकेका प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एकावर एक रचून आणि त्यावर हाताचे मॉडेल आणि त्यावर सत्यशोधन करणाऱ्या मेंदूची प्रतिकृती असा तुकारामांच्या गाथेवर उभारलेला एक छोटासा अर्थपूर्ण मनोरा तयार करण्यात आला. मुंबई नवी मुंबई ठाणे व रत्नागिरी सह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास २५० कार्यकर्त्यांनी आणि विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या उद्घाटनाचे कौतुक केले. याप्रसंगी उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार  सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे उपस्थित होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी याही आवर्जून उपस्थित होत्या. या सत्राचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड हे होते. खासदार सुरेश म्हात्रे  यांनी या उपक्रमाचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे कौतुक केले. श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषण अजिबात असू नये असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीमागे आपण उभे असून समितीच्या कार्यासाठी  सर्व प्रकारे मदत करण्याचे तसेच गरज असेल तेव्हा संसदेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतले. सुरेखा दळवी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील यांच्या कार्याविषयी विवेचन केले. सध्याच्या परिस्थितीत समाज कुंठित अवस्थेत गेलेला असून आता काय करावे असा प्रश्न पडला आहे अशी  चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच हल्ली समाजाला प्रतिकांमध्ये अडकवून सांस्कृतिक विषमता आणण्याचे काम सुरू आहे असा इशारा त्यांनी दिला. सगळीकडे अंधार दाटलेला असल्यामुळे, पणती जपून ठेवा अंधार फार झाला… ही कवितेची ओळ लक्षात ठेवून अंधार वाढू देऊ नका असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. “सत्यशोधक विचार व अंनिस” या चर्चासत्रात सुशीला मुंडे यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या अखंडांचा दाखला देऊन फुले यांचे विचार संविधानात आल्याचे आणि अंनिस त्यानुसारच कसे कार्य करते याचे तपशीलवार विवेचन केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम जोगदंड यांनी महात्मा फुले यांचे हे वेगवेगळे अखंड उद्धृत करून महात्मा फुले यांनी त्यांच्या काळातील अफवांचे आणि त्यातून होणार्‍या अन्याय अत्याचारांचे  फॅक्ट चेक करून या व्यवस्थेचा  भांडाफोड केल्याचे सांगितले. तसेच महात्मा फुले यांनी  त्याची संपूर्ण कारण मिमांसा करून दलितांना आणि बहुजनांना शिक्षणाचा मार्ग कसा दाखवला याबाबत विवेचन केले. तसेच त्यांनी  सुरेखा दळवी यांच्या भाषणाचा आढावा घेतला. “जोतिबा ते दि बा-  वारसा सत्यशोधनाचा” हा दुसऱ्या सत्राचा विषय होता. प्रमुख वक्त्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर तसेच शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड रोशन पाटील. या सत्राचे अध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे.  या परिसंवादात ॲड. रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान, यांनी शिवरायांची उपेक्षित ठेवली गेलेली समाधी महात्मा फुले यांनी  शोधून काढली असल्याचे सांगून त्यांनी शिवराय हे रयतेचे राजे कसे होते, त्यांचा वैचारिक वारसा महात्मा फुले यांनी आणि नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे कसा चालवला, त्यांना या त्यांच्या कार्यात कसे अडथळे आणले गेले याची माहिती दिली.  रेखा ठाकूर यांनी महात्मा फुले यांच्या अखंडांचा उल्लेख करून त्याचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना शिक्षणावर भर देणे किती गरजेचे आहे या बाबत आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे यांनी परिसंवादात ज्यांनी विचार व्यक्त केले त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वर्तमान परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करणे किती आवश्यक आहे यावर विवेचन केले. 0000 - [16 April Bitambatmi All pages](https://bittambatami.com/2026/04/15/16-april-bitambatmi-all-pages-2/): [dflip id=”37722″ type=”thumb”][/dflip] - [15 April Bitambatmi All page](https://bittambatami.com/2026/04/15/15-april-bitambatmi-all-page/): [dflip id=”37717″ type=”thumb”][/dflip] - [कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87/): कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली अशोक गायकवाड रायगड-कर्जत :महाराष्ट्र शासनाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत कृतज्ञता म्हणून १४ एप्रिल या त्यांच्या जन्मदिनी  शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. यावेळी जनमानसात वैचारिक प्रबोधन व्हावे,त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक इच्छा होती आणि ती त्यांनी दि.३ एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करून आदेशही निर्गमित केले होते. तरीही कृषी संशोधन केंद्रातील काही जातीयवादी अधिकारी व कर्मचारी  बाबासाहेबांप्रती घृणा, तिरस्कार, अनास्था व कमालीचा हलगर्जीपणा बाळगून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात  यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.डी. वाघमोडे आणि कार्यालय अधीक्षक न. ल.निरडे यांनी जयंती साजरी करण्याबाबत कसलेच पाऊल उचलले नव्हते, असे लक्षात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रस्तुत प्रतिनिधीने शासकीय आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणकोणत्या कार्यालयात झाली, याचा वृत्तांत घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दिल्या. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात भेट दिली असता, सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे बाहेरगावी गेल्याचे कळले. कार्यालयाचे अधीक्षक न. ल. निरडे यांची भेट घेऊन त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल विचारणा करून  कार्यक्रमाचे फोटो देण्यास सांगितले असता त्यांनी सुरुवातीला डॉ.वाघमोडे हे बाहेरगावी गेले होते, असे सांगितले.नंतर बोलता बोलता डॉ.वाघमोडे १४ एप्रिल रोजी रात्री बाहेरगावी गेल्याचे सांगितले. “जयंती झाली, फोटो पी. आर.ओ. डॉ. मर्दाने कडून घ्या “, असेही बिनधास्त सांगितले. निरडे यांच्या बोलताना आडखडण्यावरून आणि देहबोलीवरून ते प्रस्तुत पत्रकाराची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. वास्तविक संशोधन केंद्रात पी. आर .ओ. चे पद नाही.डॉ मर्दाने हे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ आहेत. वरिष्ठ पातळीवरून जेव्हा डॉ. मर्दाने यांना जयंती साजरी केल्याचे फोटो द्या, असे सांगण्यात आले, तेव्हा डॉ. मर्दाने हतबल झाल्याचे दिसून आले. डॉ. मर्दाने हे प्रस्तुत प्रतिनिधीला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या त्यांच्या कक्षात घेऊन गेले.त्यांच्या कक्षातील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार होता व पेढा ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या फोटोमध्ये ते स्वतः व खांडस येथील शेतकरी बळीराम ऐनकर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना दिसत आहेत.पण त्या दोघांव्यतिरिक्त तेथे कृषी संशोधन केंद्राचा एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता, हे स्पष्ट झाले. तरीही आम्ही जयंती साजरी केली, असे चक्क खोटे विधान मग्रूरीत अधीक्षक निरडे करीत होते. जगातील विविध देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार ,जिल्हा परिषदे,पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिरीरीने साजरी करत होते मात्र संशोधन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगण्यात व्यस्त होते. या संशोधन केंद्रात मागील वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जाणीवपूर्वक साजरी करण्यात आली नव्हती. वास्तविक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे.पण बऱ्याच कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही.ज्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी घोषित केली आहे, त्या दिवशी कृतज्ञता म्हणून प्रबोधनात्मक  किंवा त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, असे कार्यक्रम आयोजित करून जनजागरण करणे शासनाला अपेक्षित आहे.पण काही जात्यंध अधिकारी असे कार्यक्रम घेणे टाळतात व तो दिवशी पर्यटन, खरेदी, मनोरंजन करण्यात घालवतात. परिणामतः शासन बदनाम होते. असे कृतघ्न अधिकारी, कर्मचारी देशासाठी कलंक असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली मग त्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्रात सदर जयंती का साजरी झाली नाही? येथील अधिकारी राज्यपाल, मुख्यमंत्री ,कुलगुरू यांच्यापेक्षा मोठे आहेत का? शासकीय आदेशाला फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती येथील अधिकाऱ्यांमध्ये का बळावत आहे ? कुलगुरूंचा धाक उरला नाही का ? असे प्रश्न चर्चिले जात आहेत. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी काही डॉ. आंबेडकरप्रेमी संघटनांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमाणणाऱ्या, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कार्यालयातील संबंधित बेजबाबदार व जात्यंध अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मत विविध डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरप्रेमी संघटनांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. - [मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ae%e0%a5%89%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b6-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7/): मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कल्याण: कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर संचलित मॉडेल इंग्लिश हायस्कूल आणि मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने संपूर्ण परिसर भीममय झाला होता. जयंती उत्सवाची सुरुवात माता रमाबाई चौक, सिद्धार्थ नगर ते कोळसेवाडी येथील मॉडेल शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मुख्य आकर्षण शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह हे होते. रॅली शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. मंचावरील मान्यवर आणि शिक्षकांनी आपल्या भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली आणि उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवत विविध भीमगीते सादर केली. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः भीमगीतांवर आधारित नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली, ज्याला पालकांनी भरभरून दाद दिली. शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, केवळ शालेय शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ महोत्सव, विज्ञान प्रदर्शने, विविध सण उत्सवासह सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. यात पालक आणि शिक्षकही तितक्याच आनंदाने सहभागी होतात. पुढील वर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव असल्याने आणखीन जोरदार कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही तांबोळी म्हणाले. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी भगवान भोईर, बी.जी. उन्नीथन, के.व्ही. सुर्वे, नरेंद्र सूर्यवंशी, आनंद नायर, दत्ता गायकवाड तसेच मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, शिरीन गोंसालवेझ, ममता भट्टाचार्य, कल्याणी अधारी, संगीता तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. - [वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य - संदीप गोवळकर](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf/): वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर ठाणे : आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिप्रादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांनी केले. क्राऊड बुद्धिस्ट कम्युनिटी, लोढा माजिवडा,ठाणे यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड, उपाध्यक्ष प्रतीक पवार, सुभाष आचालखांब, सचिव निलेश गरुड, सहसचिव प्रवीण धुतराज, खजिनदार दीपक जाधव, सहखजिनदार निलेश निरभवणे, सल्लागार रवींद्र जाधव, महेंद्र नाकते, सदस्य सुनील माने, भत्ते लघु पवार सोसायटी नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे संदीप गोवळकर म्‍हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची जबाबदारी देते. पण प्रत्यक्षात समाजात याच्या अगदी उलट चित्र दिसते. अंधश्रद्धा, चमत्कारांचे दावे आणि अवैज्ञानिक समजुती आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही घटनेमागील कारण शोधण्याची वृत्ती. जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास  ही त्याची भूमिका. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनीच सत्य समजून घेता येते. कोणी मोठी व्यक्ती सांगते म्हणून ते सत्य मानणे, किंवा एखाद्या ग्रंथात लिहिले आहे म्हणून त्याची चिकित्सा न करणे ही गुलाम मानसिकता आहे.चमत्कार हे वास्तव नसतात; ते हातचलाखी किंवा अज्ञानाचा फायदा घेणारी फसवणूक असते. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ‘चमत्कार’ हा शब्दच माणसाला विचार करणे थांबवायला भाग पाडतो. मानवाची आजवरची सर्व प्रगती ही विज्ञानामुळेच झाली आहे. विज्ञान नम्र आहे, बदल स्वीकारते आणि स्वतःची चूकही मान्य करते. पण धर्म अंतिम सत्याचा दावा करतो  हीच मोठी समस्या आहे.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी बालपणापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवले. जातीय भेदभाव, सामाजिक अन्याय आणि उपेक्षा यांना न जुमानता त्यांनी ज्ञान, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर इतिहास घडवला.बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी होता. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या संघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रतीक पवार यांनी केले. - [ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a5%a8/): ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत अनिल ठाणेकर ठाणे,शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.  ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत ठाणे  जिल्ह्यातील २५१४ रुग्णांना सुमारे २१  कोटी ७४ लाख ५० हजार  रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. - [दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा?](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be/): दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा? श्रद्धा गॅस एजन्सीवर फसवणुकीचे आरोप आरती परब दिवा : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असताना, दिवा शहरात मात्र कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजाराचा संशय व्यक्त केला जात आहे. एचपी गॅसचा पुरवठा करणाऱ्या श्रद्धा गॅस एजन्सीविरोधात नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. दिव्यातील अनेक ग्राहकांनी सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करूनही त्यांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी झाल्याचे ओटीपी प्राप्त होऊन २५ ते ३० दिवस उलटूनही प्रत्यक्षात सिलेंडर मिळालेले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. तक्रारींबाबत एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, श्रद्धा गॅस एजन्सीने दिवा व डोंबिवली येथील आपली कार्यालये बंद ठेवली असून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच एचपी गॅस कंपनीच्या सेल्स ऑफिसर चित्रा नायर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, Essential Commodities Act अंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासाठी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. - [नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a5%a8/): नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. २०२६-२०२७ या वर्षी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विविध धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नियमित बससेवेव्यतिरिक्त दोन हजार ५०० पेक्षा अधिक बससेवेचे नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. कुंभपर्वात पर्वणींना अधिक महत्व असते. भाविकांची संख्या प्रत्येक पर्वणीला २० लाखांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येणारे भाविक खासगी वाहनाने, रेल्वे तसेच बसने येतील. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाहेर गावहून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या ताफ्यात या काळात जिल्ह्यातील विविध आगारासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दोन हजार ५०० जादा बस मागविण्यात येणार आहेत. या बस चालविण्यासाठी २० हजारांहून अधिक कर्मचारी सेवा बजावणार आहेत. नाशिक तसेच त्र्यंबकमध्ये पर्यटक तसेच भाविक खासगी वाहनांनी दाखल झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाहेरगावाहून येणारी खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बस या थेट त्र्यंबक तसेच नाशिकमध्ये दाखल न होऊ देता ती बाहेर कुठे थांबविता यावीत, यासाठी वाहनतळाचे नियोजन सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळ, नाशिक महानगरपालिका, पोलीस विभाग, त्र्यंबक नगर परिषद, नाशिक प्राधिकरण, कुंभमेळा आयुक्त यांच्या वतीने सध्या नाशिक तसेच त्र्यंबक या ठिकाणी खासगी वाहने कुठे उभी करता येतील, यासंदर्भात तसेच वाहनातून उतरलेल्या पर्यटकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून अमृत स्नानासाठी घाट परिसरात ने-आण करण्याची व्यवस्था याचे नियोजन सुरू आहे. या वाहनांमुळे शहर परिसरासह त्र्यंबक नगरीत वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता नियोजनावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, महामंडळाच्या वतीने २० हजार कर्मचाऱ्यांसाठी वेगववेगळ्या मंगल कार्यालय, लॉन्स यासह अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभ पर्वणीसाठी येणाऱ्या बसेस, खाजगी वाहने पहिने नजीक थांबवल्या जात होत्या. तेथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बस या काही विशिष्ट अंतरावर भाविकांना सोडत. एक किलोमीटर अंतर पायी चालावे लागत हाेते. नाशिक मध्येही याच धर्तीवर नियोजन होते. यंदा भाविकांची तसेच पर्यटकांची पायपीट थांबवण्यासाठी प्रशासन काय करत या कडे सर्वांचे लक्ष आहे. - [उन्हाळी गर्दीला दिलासा; कोकणासाठी मध्य रेल्वेच्या ४ वातानुकूलित विशेष गाड्या](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%89%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%95/): राजेंद्र साळसकर मुंबई :प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) ते मडगाव दरम्यान धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०११२९ (सीएसएमटी – मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल व १४ एप्रिलला सीएसएमटी येथून पहाटे २ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०११३० (मडगाव – सीएसएमटी वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल २०२६ व १४ एप्रिल २०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता सीएसएमटी येथे […] - [५० वर्षांनी उपसणार खाडीतील गाळ काढून सुशोभिकरण होणार-संजय केळकर](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a5%ab%e0%a5%a6-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80/): ठाणे, गेली पाच दशके सिडको ते कळवा पूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या खाडीतील गाळ काढून खाडी लगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण आदी कामे करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. येथील भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले होते. गेल्या काही दशकांत या खाडीचा गाळ उपसण्यात आलेला नसल्याने खाडीची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यात तसेच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. या पार्श्वभूमीवर श्री.केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, अरीफ बडगुजर आदी उपस्थित होते. या खाडीलगत मुख्य ठाणे वसले असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली. - [बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2/): डॉ डी एल कराड यांची मागणी अनिल ठाणेकर नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे.  बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे  स्वागतार्ह आहे.  तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड.तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते. - [शेतकऱ्यांचे भर उन्हात न्यायासाठी आमरण उपोषण](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8/): मुंबई: वारंवार निवेदन देऊनही तसेच मंत्री स्तरावर आदेश होऊनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले. भाऊसाहेब नळकांडे, अविनाश नळकांडे, रेखा नळकांडे, लीलाबाई नळकांडे, विठ्ठल नळकांडे, बापूसाहेब नळकांडे, सविता वाळके, विद्या टेमगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय, उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ०४/०९/२०२५ व ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौकशी करून नियमानुसार मुदतीत उचित कार्यवाही करावी असे लेखी निर्देश दिले होते.सदर प्रकरणी बोगस धरणग्रस्तांना जमीन वाटप केलेली आहे. उपअधिक्षक,भूमी-अभिलेख शिरूर यांनी सदर गटातील मोजणी प्रक्रीया होण्यासाठी दिलेल्या हरकत अर्जाची सुनावणी घेऊन आदेशावर २८/११/२०२५ ही तारीख असताना  जाणूनबुजून ०८/०४/२०२६ ला निकालाची समज उशिरा दिली व तातडीने १०/०४/२०२६ ला प्रतिवादी यांच्याशी संगनमत करून मोजणी करण्याचा खटाटोप केला असा आरोप भाऊसाहेब नळकांडे यांनी केला आहे. 00000000 - [ वेंगुर्ला शहरात होणार  ‘नमो उद्यान’](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0/): नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन  वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. शासनाच्या  योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो उद्यान’ साकारुन प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन जिल्ह्याचे  पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील भटवाडी येथे या ‘नमो उद्यान’चा भूमिपूजन समारंभ राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘नमो उद्यान’ विकसित करा. या आराखड्यात पर्यावरणपूरक नियोजन, नागरिकांसाठी विरंगुळ्याची आधुनिक साधने तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा यांचा समावेश या उद्यानात करण्यात येणार असून, हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह नगरसेवक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.  नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत केले. सुहास गवंडळकर, गौरी मराठे व स्थानिक नागरिकांच्या वतीने राणे यांचा सन्मान करण्यात आला. - [चर्नीरोड स्थानकावर भीम जयंतीचा जल्लोष](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a1-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%9c/): रेल्वे कर्मचारी, अधिकारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन मुंबई :महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चर्नीरोड (प. रेल्वे) स्थानकावर भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. चर्नीरोड स्थानकावरील पश्चिम रेल्वे तिकीट घर ब्रिजवर वाणिज्य अधीक्षक जितेंद्र गजभिये यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. मंगेश कुपवडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर अनिता सातपुते (वाणिज्य अधीक्षक, ग्रॅन्ट रोड) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदय राणे (स्टेशन अधीक्षक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख […] - [‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्थेने साकारला काळाराम मंदिराचा देखावा](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8/): कल्याण : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे यावर्षी नाशिक येथील काळाराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. काळाराम मंदिराचा लढा हा केवळ मूर्तीच्या दर्शनासाठी नव्हता, तर तो माणसाला माणूस म्हणून मिळणाऱ्या अधिकाराचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहातून जगाला दाखवून दिले की, ‘गुलामगिरीची जाणीव झाली की गुलाम बंड करून उठतो’. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मृतीस आणि बाबासाहेबांच्या त्या अदम्य जिद्दीस या देखाव्यातून अभिवादन केले असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितिन निकम यांनी दिली. - [रक्तदानातून बाबासाहेबांना आदरांजली](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be/): कल्याण : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित रिजन्सी सर्वम क्लब हाऊस,टिटवाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित एक सामाजिक बांधिलकी जपत व त्यांच्या विचारांना कृतीत आणण्यासाठी रक्तदान हेच जीवनदान या उक्तीनुसार रक्तदान शिबिराचे रिजन्सी सर्वम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित अभिवादन केले. रक्तदान शिबीरास मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर ३ व रेड स्वस्तिक सोसायटी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व रेड स्वस्तिक सोसायटी चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. 0000000 - [महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेतर्फे अभिवादन](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82/): ठाणे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी उज्वला सपकाळे तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला. - [मीरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचा “लोकदरबार”](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/): मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या समस्यांना मिळणार आता हक्काचं व्यासपीठ. प्रशासकीय कामांतील अडथळे असोत किंवा नागरी समस्या, आता प्रत्येक प्रश्नावर थेट चर्चा आणि तात्काळ निवारण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मीरा-भाईंदरचे लाडके लोकप्रतिनिधी प्रताप सरनाईक यांच्या वतीने मीरा-भाईंदर शहरात गुरुवार, १६ एप्रिल रोजी भव्य “लोकदरबार” चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे कलादालन, भाईंदर पूर्व येथे सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत हा लोकदरबार संपन्न होणार आहे. - [-शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध ठाणे जिल्हा परिषदेवर रणशिंग](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8/):  आज ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’चे विराट आंदोलन! अनिल ठाणेकर ठाणे, राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’ने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी, १६ एप्रिल रोजी, जिल्हा परिषद ( बी. जे) . हायस्कूल  जांभळी नाका ठाणे या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने  दिला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना निवेदन धाडण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून, वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन तर्कहीन निकषांमुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या २ ते ६ वर्षांपासून शिक्षकांची हक्काची देयके थकली आहेत. निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत (Lapse) झाला असून, १५ एप्रिलपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून क्षकांना सक्तीने निवडणुकीच्या कामात (BLO) जुंपले जात आहे. हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवण्याची मागणी पत्रात केली आहे. एप्रिल महिना अर्धा संपला तरी मार्चचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकले असून त्यांना नाहक दंड सोसावा लागत आहे. ‘१ तारखेला पगार’ ही परंपरा कायम राखण्याची आठवण संघटनेने करून दिली १० वी, ११ वी आणि १२ वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत ‘पटपडताळणी’चा घाट घातला जात आहे, जो शिक्षकांना नाहक त्रास देणारा आहे. हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी केली आहे.”प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत, तर १६ एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत.” - [देखाव्यातून उलगडला मूकनायकचा प्रवास](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%95/): कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले होते. मात्र पत्रीपूल येथे स्नेह वर्धक नगरच्या वतीने साकारण्यात आलेला देखावा आंबेडकरी जनतेच्या चर्चेचा विषय ठरला होता. ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०६ वर्षांपूर्वी ‘मूकनायक’ हे वर्तमानपत्र सुरू केले. मूक समाजाचा आवाज बनलेल्या या क्रांतीला या देखाव्यातून मानाचा मुजरा करण्यात आला आहे. मुकनायक म्हणजे केवळ एक वर्तमानपत्र नव्हे, तर तो गुलामीच्या अंधाराविरुद्ध पुकारलेला पहिला मोठा लढा होता. हा देखावा याठिकाणी पत्रकार अशोक कांबळे  यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून याची सजावट कैलास कांबळे, नदीम अन्सारी, स्नेह वर्धक मित्र मंडळाने केली आहे. ००००००० - [कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2/): कल्याण : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी इको गाडीचा अपघात होऊन ११ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर आरटीओ आणि वाहतूक पोलीस खडबडून जागे झाले असून आज दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक पोलिसांनी प्रवासी वाहनांची कडक तपासणी करत  कारवाई केली. बुधवारी सकाळ पासून कल्याण वाहतूक शाखे मार्फत  वाहनावर  कारवाईचा बडगा उगरला असून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली. आज हॉटेल महालक्ष्मी कल्याण स्टेशन परिसर येथे मुरबाड येथील अपघाताच्या अनुषंगाने परमिटचे उल्लंघन करुन अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये दोन काळी पिवळी टँक्सीवर ६६/ १९२ अ-अन्वये कारवाईचा बडगा उगरित १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे कल्याण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी संपर्क साधला असता सांगितले, तसेच कारवाईचा बडगा असाच  सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. - [उल्हासनगरात ‘चार साहिबजादे’ एमआरआय-सिटी स्कॅन केंद्राचे उद्घाटन, स्वस्त दरात आधुनिक आरोग्यसेवा](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%9c%e0%a4%be/): आमदार कुमार आयलानी यांच्या उपक्रमाचे शहरात स्वागत; गरजूंना मोठा दिलासा सुनील इंगळे उल्हासनगर :उल्हासनगरात धीरज कुमार आयलानी यांच्या स्मरणार्थ ‘चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्रा’चे भव्य उद्घाटन मंगळवारी सेंट्रल हॉस्पिटलजवळील अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल) येथे करण्यात आले. गरीब व गरजू नागरिकांना परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. कुमार आयलानी यांच्या लोककल्याणकारी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, आरजू धीरज आयलानी आणि बिंदिया आयलानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पूज्य मधुसूदनजी महाराज यांच्या हस्ते रिबन कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत एमआरआय […] - [ उल्हासनगरातील सुभाष टेकडीत मोफत पाणीपुरी वाटप](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7-%e0%a4%9f%e0%a5%87-2/): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  उल्हासनगर: उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथे भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हंसराज जामणीक व सुरेश तायडे यांच्या वतीने भीम अनुयायी यांना मोफत पाणीपुरी वाटप ठेवण्यात आले होते. उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या ठिकाणी मोफत पाणीपुरी वाटप हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंसराज जामणी व सुरेश तायडे या दोघांनी मिळून जयंतीनिमित्त सुमारे ५००० पाणीपुरी भीम अनुयायी यांना वाटप केली. पाणीपुरी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सुरेश तायडे यांची सुभाष टेकडीत पाणीपुरीची गाडी आहे. त्या ठिकाणी ते गेले अनेक वर्षापासून पाणीपुरीचा व्यवसाय करीत असतात. पण दरवर्षी जयंती निमित्त मात्र भीम अनुयायींसाठी ते मोफत पाणीपुरीचा कार्यक्रम ठेवत असतात. यावेळी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ०००००००० - [ ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे कल्याणमध्ये आयोजन](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%8b%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae/): शिस्त, सलोखा आणि क्रीडाभावनेचा अद्वितीय संगम कल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली २५ व्या ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई झोन अंतर्गत राजीव गांधी स्टेडियम, बेलापूर येथे १७, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुंबईतील सेवादल क्षेत्र I ते VII, डोंबिवली, वसई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, खरसई (रायगड), नागपूर, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, चिपळूण आणि गोवा येथील एकूण २१ निवडक संघ सहभागी होत आहे. उल्लेखनीय म्हणजे निरंकारी सेवादल आणि श्रद्धाळू भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतनेसह मानवी मूल्यांचा व क्रीडाभावनेचा विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे आयोजन केवळ स्पर्धात्मकतेपुरते मर्यादित न राहता, खेळाच्या माध्यमातून शिस्त, एकता आणि सलोखापूर्ण वातावरणाची निर्मिती व्हावी, या दिव्य हेतूने सन २००० मध्ये बाबा हरदेव सिंहजी यांनी मुंबई येथे या क्रिकेट स्पर्धेची पायाभरणी केली. सुरुवातीला सन २०११ पर्यंत ही स्पर्धा केवळ मुंबई परिक्षेत्रापुरती मर्यादित होती; परंतु सन २०१२ पासून या स्पर्धेचे महाराष्ट्रातील विविध झोनमध्ये आयोजन केले जाऊ लागले, ज्यामुळे अधिकाधिक सेवादल सदस्य आणि श्रद्धाळू भक्त या उपक्रमाशी जोडले गेले. मंडळाच्या नेरुळ सेक्टरचे संयोजक वसंत गोड यांनी माहिती देताना सांगितले, की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा, मेंबर इंचार्ज (वित्त व लेखा) जोगिंदर मनचंदा तसेच मेंबर इंचार्ज (प्रचार-प्रसार) मनमोहन छाबडा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. याशिवाय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची उपस्थितीही या सोहळ्याला अधिक विशेष बनवेल. निरंकारी स्पोर्ट्स कमिटी (महाराष्ट्र) तर्फे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक आणि सुनियोजित तयारी करण्यात येत आहे. हि स्पर्धा युवकांमध्ये आत्मिक जागरूकतेसोबतच मानवी मूल्यांचे संवर्धन तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार करणारे प्रभावी माध्यम ठरेल. या माध्यमातून सहभागी युवावर्ग दिव्य गुण आत्मसात करून केवळ संतुलित, सुंदर आणि यथार्थ जीवनच जगणार नाहीत, तर त्याचबरोबर आपल्या जीवनाचे वास्तविक मुख्य ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करतील. - [राज्य अजिंक्य कॅरम स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0/): नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे सुरु असलेल्या ६० व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या संघाने ठाण्याच्या संघाचा २-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. पुण्याच्या अनिल मुंढे व रहीम खान जोडीने ठाण्याच्या पंकज पवार व समीर अंसारीला २५-१३, १६-१३ असे सरळ दोन सेटमध्ये हरवून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर पहिला सेट ९-२५ असा गमावूनही पुढील दोन सेट २५-१२, २३-१० असे जिंकून सामन्यात बरोबरी केली व सामना सामना १-१- असा झाला. मात्र माजी विश्व् विजेत्या पुण्याच्या योगेश परदेशीने आपल्या अनुभवाच्या जोरावर नवोदित कुणाल राऊतला तीन सेटनंतर ८-२५, […] - [श्री मावळी मंडळ आयोजित ७३ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4/): ठाणे – श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने १०१ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३ व्या राज्यस्तरीय  पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संस्थेच्या क्रीडानगरीत पार पडले. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस  चिंतामणी पाटील, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त  केशव मुकणे, विश्वस्त रवींद्र आंग्रे हे उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिला आणि पुरुष गटातील सामने अत्यंत चुरशीचे व रंगतदार झाले. महिला गटात जय भारत स्पोर्ट्स क्लब खारेगाव (ठाणे), ज्ञानशक्ती युवा संस्था (ठाणे), टागोर नगर मित्र मंडळ (मुंबई उपनगर), रा फ नाईक नवी मुंबई (ठाणे), विवेक स्पोर्ट्स क्लब वसई (ठाणे) ह्या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे),नंदकुमार क्रीडा मंडळ बदलापूर (ठाणे), भाऊ स्पोर्ट्स डुंगे (ठाणे), श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ (मुंबई शहर), श्री हनुमान सेवा क्रीडा मंडळ कल्याण (ठाणे), शूर जवान क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), उत्कर्ष क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या  संघानी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटातील अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात नवी मुंबईच्या रा फ नाईक मुंबई शहरच्या शताब्दी स्पोर्ट्स क्लब संघाचा ३४-३० असा ४ गुणांनी मात करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच  रा फ नाईक संघाच्या रेखा […] - [ भाईंदर पश्चिमेत अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे लोकार्पण](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7/): तरुण खेळाडूंना आधुनिक सुविधांचा लाभ मिरा भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील भाईंदर ( प )येथील प.पु.ग. जैनाचार्य श्री विजय अभयदेव सूरिश्वरजी म.सा. महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नरेंद्र मेहता यांच्या शुभहस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. वास्तूमुळे भाईंदर पश्चिमेकेतील क्रीडाप्रेमींना नक्कीच फायदा होईल. या वास्तूची जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे असे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केले. मिरा भाईंदर शहरात या अगोदर शहरातील क्रीडा प्रेमी खेळाडू यांच्या करता फक्त एकच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होते. मात्र शहरातील क्रीडा प्रेमी यांना प्रोत्साहन देण्याकरता पालिकेच्या मार्फत भाईंदर पश्चिम येथे एक क्रीडा संकुल इमारत बांधण्याचा निर्णय २०१८ साली घेण्यात आला. २०१९ साली प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर क्रीडा संकुल क्रीडाप्रेमींसाठी आजपासून सुरु झाले आहे. भाईंदर पश्चिम येथे तयार करण्यात आलेल्या प.पु.ग.जैनाचार्य विजय अभयदेव सुरीश्वरजी म.सा. क्रीडा संकुल वं सभागृह इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३४८२.५० चौ.मी.इतके आहे. मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील भाईंदर पश्चिमेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगत असलेल्या अग्निशमन केंद्र इमारतीच्या जागेत कम्युनिटी हॉल, क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. याचा अंदाजित खर्च ४२ कोटी १२ लाख २ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये स्टील पार्किंग सह चार मजल्याचे आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावर एक सभागृह, दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, कॅरम, टेबल टेनिस, जिम,स्टोररूम व तिसऱ्या मजल्यावर स्क्वॉश कोर्ट, तायक्वांदो कोर्ट तसेच बॉक्सिंग कोर्टाची सुविधा देण्यात आली असून, चौथ्या मजल्यावर आधुनिक क्रिकेट टर्फ विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीने इमारतीचे स्वरूप आहे. निमंत्रण पत्रिकेत राज शिष्टाचाराचा भंग या लोकार्पण सोहळ्याची महानगरपालिकेने निमंत्रण पत्रिका छापली होती. या पत्रिकेत परिवहन मंत्र्यांचे नाव आमदार आणि महापौर यांच्या खाली छापण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी या प्रकाराची तक्रार करणारी पत्र संबंधित यंत्रणाना पाठविली आहेत. - [- मार्श मॅकलेननला विजेतेपद](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%87/):  आंतरकार्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धा ठाणे : मार्श मॅकलेनन संघाने अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाचा ११० धावांनी दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी आंतर कार्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेतील क गटाचे विजेतेपद संपादन केले. विजयासाठी १९९ धावांचा पाठलाग करणाऱ्या अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाला ८९ धावांवर गुंडाळत मार्श मॅकलेनन संघाने विजय निश्चित केला. प्रदिप शर्मा, चिन्मय कदम आणि हर्ष मिश्राने बऱ्यापैकी फलंदाजी करत संघाला दिड शतकी धावसंख्या उभारुन दिली. प्रदिपने ३८, चिन्मयने नाबाद ३७ आणि हर्षने २२ धावा केल्या. या डावात पराभूत संघाच्या अजिंक्य पवारने तीन बळी मिळवले. तर सोनू जयस्वार, प्रतिक भोसले, देवकिरण चेट्टी, ओमकार सावंत आणि वैभव मुजगेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल मार्श मॅकलेनन संघाच्या नियंत्रित गोलंदाजी समोर अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यांच्या हृतिक परबने १९ आणि वैभव मुजगेने १५ धावा बनवल्या. संघाला विजयाची दिशा देताना शिवप्रकाश जैस्वालने तीन, आशुतोष घागरेने दोन आणि केतन खरात, चिन्मय कदम, श्रेयस केळकरने प्रत्येकी एक बळी मिळवला. - [अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेस खेळाडूंचा चांगला प्रतिसाद](https://bittambatami.com/2026/04/15/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a4%be/): मुंबई – येत्या १७ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित मुंबई विभागस्तरीय अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेत ४० संघातून ७०० हून जास्त खेळाडूंनी  नोंद केली आहे. बोरीवली पश्चिम स्थित सुविद्या प्रसारक संघ, स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर व मल्लखांब लव संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे. कर्ममूर्ती महादेव गोविंद रानडे सरांचे अमृतमहोत्सवी वर्ष देखील साजरे करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या  हस्ते होणार आहे त्याचबरोबर आमदार अतुल भातखळकर, नगरसेविका सीमा शिंदे,  श्वेता कोरगावकर, नगरसेवक तेजिंदर तिवाना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पारितोषिक वितरण रविवारी रात्री ८ वाजता माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अध्यक्ष सिद्धेश कदम, उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका संध्या दोशी, नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे.  ६/८/१०/१२/१४/१६/१८ या वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रत्येक वयोगटात सांघिक व वैयक्तिक विजेत अशी भरघोस पारितोषिकं देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धा १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा होणार आहेत. मुकबधीर, अंध, ऑटिस्टिक इ खेळाडू आपले मल्लखांब कौशल्य सादर करणार आहेत. या खेळाडूंना देखील  पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे स्पर्धाप्रमुख म्हणून आशिष देवल आणि स्पर्धा सचिव म्हणून संचिता देवल काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख आशिष देवल ९६६४००२०५१ यांच्याशी संपर्क साधावा. - [14 April Bitambatmi All pages](https://bittambatami.com/2026/04/13/14-april-bitambatmi-all-pages-2/): [dflip id=”37632″ type=”thumb”][/dflip] - [एक अजरामर “आशा”](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be/): एक अजरामर “आशा” राजेंद्र हुंजे आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे फक्त यशाची कहाणी नाही… तो संघर्षातून उभं राहण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि प्रत्येक वेदनेला सुरांत रूपांतरित करण्याचा प्रवास आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्यात त्यांचं आयुष्य दडलेलं आहे… प्रत्येक शब्दात एक अनुभव, प्रत्येक सुरात एक भावना… म्हणूनच, त्या केवळ गायिका नाहीत… त्या एक भावना आहेत… एक युग आहेत… एक “आशा” आहेत. मराठी आणि हिंदी संगीतविश्वात अनेक आवाज आले, अनेक गेले… पण काही स्वर असे असतात, जे काळाच्या पलीकडे जाऊन इतिहासात कोरले जातात. आशा भोसले हे नाव म्हणजे असा एक स्वर, जो केवळ गात नाही, तर आयुष्य जगतो, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद […] - [अलविदा आशाताई...सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8/): अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली स्वाती घोसाळकर मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी पहाटेच्या गीतातील ओळींना उजाळा देत सुरांचा ‘साज’ आशाताईंच्या रुपाने पंचतत्वात विलीन झाला. करोडो भारतीयांच्या हृदयात आपला स्वरांचे चांदणे शिंपून आशाताईंनी इहलोकीचा आज निरोप घेतला. संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. शासकीय इतमामात आशाताईंच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. राजकारणी, सिनेसृष्टी, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील तारकांनी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. आशाताईंना […] - [वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a/): वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी   मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसय यांनी वराह पालन योजनेला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत आता वराह पालनाचा समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार  वराह खरेदीसाठी शासन ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. तर, कुक्कुटपालन व मेंढी पालनाप्रमाणे वराह पालनासाठी ही ४ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. - [चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%9a%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8/): चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे. - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be-3/):   माथेरान :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काल येथील कम्युनिटी सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शुभम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नगरसेवक सचिन दाभेकर, वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कर्जत येथील नेत्रचिकित्सक उपस्थित होते. कुणाला मोतीबिंदू असल्यास त्यांना पनवेल येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत.दिवसभरात तीनशेहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला असून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता रांजाणे,रिझवाना शेख, सोनम दाभेकर,वर्षा शिंदे, उद्योजिका […] - [ ठाण्यात ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा उत्साहात संपन्न](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95/):   ठाणे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासना मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा येथे ‘ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. अशी समाज कल्याण आयुक्त ठाणे यांनी दिली. दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने […] - [गीत संगीत सादरीकरणाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचे आवाहन](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af/): कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या हिंदी चित्रपट गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद कराओके ॲण्ड लाईव्ह म्युझिक’ यांच्या माध्यमातून प्रमुख गायक निलेश निरगुडकर व मोना कामत-प्रभूगावकर यांच्यासह अन्य गायक गायिकांच्या गायनाच्या मेरी आवाजही पहचान है या गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी आयोजक शरद ननावरे यांनी आपल्या मुलाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेबाबतची गुंतागुंत याबाबतची माहिती देताना सर्वांना नेत्रदान, अवयवदानाचे महत्व विषद करुन सुंदर शरीराची राख करण्यापेक्षा कुणाच्या तरी आपले अवयव उपयोगी पडतील याकडे डोळसपणे पाहण्याचे आवाहन केले. प्रमुख गायक गायिका यांच्यासह अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील ३२ पुस्तकांचे लेखक असलेले पत्रकार राजेंद्र घरत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या उत्पन्नातून जमा झालेल्या निधीतील ५१ हजाराची रक्कम ननावरे यांनी धनादेश स्वरुपात अंधशाळेला देत  असल्याची घोषणा केली. यावेळी सत्यम शिवम सुंदरम, शोखियों में घोला जाए, अजहु ना आये बालमा, ए भाय जरा देख के चलो, दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए, परदा है परदा, आजा शाम होने आयी, आके तेरी बाहोमे हर शाम लगे सिंदूरी, राफ्ता राफ्ता  देखो, होठो पे ऐेसी बात अशी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील गाणी सादर करुन प्रेक्षकांना खुश करण्यात आले. प्रमुख गायकांसह स्वतः शरद ननावरे तसेच आशालता, डॉली, शैलजा, चेतना, मिहीर, नरेंद्र, अमर यांनीही चांगली गाणी गात रसिकांची वाहव्वा मिळवली. - [ काशिगाव मेट्रो स्थानकातील वाहतूक कोंडीवर एमएमआरडीएला २ महिन्यांचा ‘अल्टिमेटम’!](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be/): – प्रताप सरनाईक ‘ॲक्शन मोड’वर मीरा-भाईंदर, मीरा-भाईंदरच्या दळणवळणात क्रांती घडवणाऱ्या मेट्रो ९ च्या प्रवासाला गती मिळाली असली, तरी प्रवाशांना भेडसावणारी ‘कोंडी’ फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मैदानात उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या भीषण समस्येची दखल घेत सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानक परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ‘येत्या दोन महिन्यात प्रवाशांच्या अडचणी सुटल्याच पाहिजेत,’ असा सज्जड दम भरत एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला २ महिन्याचे अल्टीमेटम दिले आहे. पाहणी दरम्यान समोर आले की, तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित आहे. बिल्डर आणि ७/११ कंपनी मालकाच्या जागेच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे हे काम रखडल्याचे समोर येताच सरनाईक यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सोयीसाठी आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः ७/११ कंपनीच्या जागेबाबत त्यांनी मोठे विधान केले असून, केवळ १३३ मीटरच नव्हे तर संपूर्ण भूखंड एमएमआरडीएला देऊन तिथे भव्य *’पार्किंग प्लाझा’ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता, तो संपूर्ण भूखंडच ‘पार्किंग प्लाझा’साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे. जर ७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. “शहरातील जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, आता त्यांनी जनतेच्या सोयीसाठी ही जागा द्यावी,” असे आवाहन करत मंत्री सरनाईक यांनी चेंडू ७/११ कंपनीच्या कोर्टात टाकला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:ची गाडी पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा, अशी व्यवस्था पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात कि, “मेट्रो ही जनतेच्या सोयीसाठी आहे, त्रासासाठी नाही! काशिगाव स्थानकाबाहेर प्रवाशांना होणारा मनस्ताप मी सहन करणार नाही. जागा हस्तांतरण आणि तांत्रिक नावाखाली कामात दिरंगाई करणाऱ्यांना माझा स्पष्ट इशारा आहे—येत्या २ महिन्यांत एन्ट्री-एक्झिटचे दरवाजे उघडा आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा. ७/११ कंपनीच्या मालकाला माझी विनंती आहे की, ज्या जनतेने आपल्याला दोनदा निवडून दिले, त्या सामान्यांच्या सोयीसाठी आपला भूखंड एमएमआरडीएला द्यावा. रेडीरेकनर दराने मोबदला घ्या, पण तिथे भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा. यात कुचराई खपवून घेत - [महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/): कल्याण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन दोन वर्ष होत आले. त्याआधी सुमारे आठ वर्ष त्यांनी मुखमंत्री म्हणून काम केलेले आहे. या काळात वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांचे प्रश्न सुटलेले नाही. कामगार प्रश्नांना सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची देखील पूर्तता होत नाही. त्यामुळे राज्यातील कामगारांच्या मनात प्रचंड अस्वस्थता व संताप असून तो व्यक्त करण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश च्या नेतृत्वाखाली १६ एप्रिल रोजी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा पूर्व या ठिकाणी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून किमान पाच हजार कामगार सहभागी होतील आणि आपली नाराजी व्यक्त करणार आहे. महाराष्ट्र सरकारचे उद्योग, ऊर्जा, कृषी, पाणी, महिला, बाल, युवा, खेळाडू, शिक्षण, आरोग्य, सहकार आदी सर्व विषयांचे धोरण आहे. मात्र कामगार विषयक धोरण नाही. महाराष्ट्र सरकार एक ट्रीलीयान अर्थव्यवस्था निर्माण व्हावी हे लक्ष घेहून काम करत आहे. मात्र अशा प्रगत अर्थव्यवस्थेत कामगारांचे स्थान काय असणार हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. वर्षानुवर्ष कामगारांनी केवळ किमान वेतन आणि त्यापेक्षा कमी वेतनातच काम करावे असे सरकारला अपेक्षित आहे का? कामगारांना त्यांचे किमान वेतन, बोनस, उपदान, भविष्य निर्वाह निधी कामगार विमा कायदेशीर हक्क मिळणार का ? या बाबत राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरेलू, आशा, अंगणवाडी, फेरीवाले, बिडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, ईपीएस ९५ व अन्य पेन्शन धारक, वीज, नगर पालिका यासह विविध उद्योगातील कामगारांचे प्रश्न सरकारकडे प्रलंबित असून त्याबाबत सातत्याने पाठ पुरावा करूनही ते सोडवत नसल्याने याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चापूर्वी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना राज्यातील किमान २२ संघटनांच्या प्रलंबित प्रश्नांची निवेदन सादर केलेली आहेत. या सर्व प्रश्नांवर सरकारने प्रत्यक्ष चर्चा करावी आणि ते प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा आहे. - [ जिल्ह्यात ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत पाचपट वाढ](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3/): विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा हरिभाऊ लाखे नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानातंर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील महिन्यात (फेब्रुवारी ते मार्च) शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व ऐतिहासिक प्रगती नोंदविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘लक्षित उपचारात्मक अध्यापन’ आणि ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली असून ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत तब्बल पाचपट वाढ झाली आहे. जिल्हा मूल्यांकन अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील १,३९,७०१ विद्यार्थी ‘निपुण’ श्रेणीत पोहोचले असून, केवळ एका महिन्यात ५५,९९० नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. ही वाढ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक मानली जात आहे. आकडेवारीनुसार, ‘सुपर निपुण’ शाळांची संख्या २३३ वरून थेट १,११३ पर्यंत वाढली आहे, तर ‘निपुण’ शाळांची संख्या ३५३ वरून १,४७१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अत्यंत कमी कामगिरी असलेल्या १३१ पैकी ९७ शाळांनी (७४ टक्के) आपली गुणवत्ता सुधारून ‘निपुण’ श्रेणी प्राप्त केली आहे. हे यश जिल्हा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या यशामागे जिल्हा परिषदेने राबवलेली ‘पंचसूत्री’ रणनीती महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये उपचारात्मक स्तराधारित कृतीपुस्तिकांचे वितरण, वाचन संस्कृतीला चालना देणारी ‘१०० दिवस वाचन मोहीम’, प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चिती, विद्यार्थी व अधिकाऱ्यांमधील थेट संवाद आणि क्षेत्रीय पातळीवरील नियमित भेटी यांचा समावेश आहे. उपचारात्मक शिक्षण उपक्रमांतर्गत ५,६२५ विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ‘उपचारात्मक संच’ उपलब्ध करून देण्यात आले. भाषा आणि गणित विषयांसाठी दररोज एक तास स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांमध्ये सुधारणा दिसून आली. ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे दररोज दोन डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या विशेष बैठका घेऊन कामाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले. तसेच, आव्हानात्मक भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून शाळांना नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेण्यात आला. - [“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%95%e0%a4%be/): “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन जयंत चाचरकर यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुंषगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बऱ्याचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी - [कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0/): कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात इकोची सिमेंट मिक्सरला धडक, भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू कल्याण : कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली. प्रवाशांनी भरलेली इको कार मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 1२ प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. या मृतांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने, वय २1 वर्ष, देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे, वय ४९ वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी, वय ५० वर्ष, टेंभरे मुरबाड, अनंता पवार, साखरे मुरबाड, दीपक गवळी, राहणार कल्याण, गणपत जैनू मधे, वय ३२ वर्ष, देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे, वय अंदाजे २२ वर्ष, मानसी मोहपे, वय अंदाजे २० वर्ष, प्रथमेश मोहपे, वय अंदाजे 1७ वर्ष हे तिघेही एकाच कुटुंबातील  नारायणगाव मुरबाड येथील आहेत. तर अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर सकाळी रायते परिसरात झालेल्या अपघतात प्राथमिक माहिती नुसार नऊ प्रवासी मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातातील इको संर्वगातील वाहनाची सर्व कागदपत्रे वैध्य आहेत, आरटीओ इनस्पेक्टर यांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेऊन याबाबत सविस्तर अवहाल तयार करणार आहोत. अनधिकृत प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ बाबत आरोप असल्याच्या बाबत अवैध वाहतूक संदर्भात आरटीओकडून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया कल्याण उप प्रादेशिक अधिकारी अशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तर रायते येथील महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता संदर्भात, रायते येथील ग्रामस्थ संतोष सुरोशी यांनी प्रतिक्रिया दिली की, रायते, पिंपळोली ग्रामस्थांनी रस्त्या संदर्भात निवेदन देखील दिले होते. रस्त्याचे काम अर्धवट असून, दिशा दर्शक फलक लावले नाहीत, वाहतूक सुरु करू नका असे असून देखील मिक्सर अवजड वाहनांची होणारी वाहतूक पाहता आरटीओचे नियंत्रण नाही यामुळेच आजच्या या भीषण अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले असल्याचा आरोप करत  शासनाचा  धिक्कार करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष सुरोशी यांनी दिली. तर एनएच ६१ महामार्गावर रायते येथे इको आणि मिक्सर या वाहनांच्या अपघाततील इको मधील प्रवाशांचे मृतदेह गोवेली शासकीय रूग्णालयात आणले असून ११ मृतदेह असल्याची प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली. - [आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%88-%e0%a5%a8%e0%a5%ab-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf/): आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अंतर्गत आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात २५% जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी अॅलॉटमेंट लेटर, हमीपत्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शासनाने २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. ही पडताळणी कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधी चौक, बारदान गल्ली, कल्याण पश्चिम येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) करण्यात येणार आहे. ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रेच ग्राह्य शासनाच्या निर्देशानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेली मूळ कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचे दोन संच सोबत आणणे आवश्यक आहे. पालकांनी आरटीई पोर्टलवरून अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून निर्धारित कालावधीत पडताळणी पूर्ण करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे. - [बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9/): बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी डॉ डी एल कराड यांची मागणी अनिल ठाणेकर नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे स्वागतार्ह आहे.  तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १ पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड. तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते. - [“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ](https://bittambatami.com/2026/04/13/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%82/): “क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ ठाणे : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२७), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने साकार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता कविता पाठविण्याची अंतिम मुदत  २४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ## Pages - [सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे राष्ट्रवादीतच नाराजी](https://bittambatami.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d/): मुंबई: बारामतीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना आता राष्ट्रवादीच्या कोट्यातली राज्यसभा खासदारपदाची उमेदवारी आज जाहिर झाली आणि पक्षातील नाराजीनाट्य समोर आले.  बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार असलेल्या त्यांच्या स्वताच्या बारामती मतदार संघात प्रतिस्पर्धी सुप्रीया सुळे यंनी आघाडी घेतली होती. तरीही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या […] - [E-paper](https://bittambatami.com/e-paper-3/): http://[dflip id=”1184″ type=”thumb”][/dflip] - [संपादकीय](https://bittambatami.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/) - [E-paper](https://bittambatami.com/e-paper-2/): [dflip id=”848″ type=”thumb”][/dflip]   - [शिंदे गटाची रणरागिणी राष्ट्रवादीत दाखल, चळवळीतल्या नेत्या सुरेखा खेडकर यांची सुधाकर घारेंना साथ](https://bittambatami.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7/): अशोक गायकवाड कर्जत : शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी पुन्हा एकदा शेवटपर्यंत उत्सुकता ताणत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा पक्षप्रवेश कर्जतच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात पार पडला. काही दिवसांपुर्वी अमोल बांदल पाटील यांच्या प्रवेशानंतर सुरेखा खेडकर यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाने दुसरा झटका शिंदे गटाला बसला आहे.* एकीकडे लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना दुसरीकडे सुधाकर घारेंकडून विधानसभेची बांधणी जोरात सुरु असल्याचे दिसुन येत आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना अमोल पाटील यांनी खिशातून चॉकलेट, गाजर आणि कॅटबरी बाहेर काढली आणि राष्ट्रवादीत हे दिल जात नाही असे सांगितले. यानंतर सभागृहात एकच हषा पिकला. शिंदे गटातून आलेल्या सुरेखा खेडकर यांनी सुद्दा शिंदे गटावर चांगलीच तोफ डागली. यावेळी बोलताना […] - [E-](https://bittambatami.com/e/): [dflip id=”668″ type=”thumb”][/dflip]   - [E-papar](https://bittambatami.com/e-paper/e-papar/): [dflip id=”636″ type=”thumb”][/dflip] - [Epaper](https://bittambatami.com/e-paper/epaper-4/): [dflip id="524" type="thumb"][/dflip] - [E-paper](https://bittambatami.com/e-paper/): 16-March-2024 - [Epaper](https://bittambatami.com/epaper-3/) - [Epaper](https://bittambatami.com/epaper-2/): 14-March-2024 http://bittambatami.com/wp-content/uploads/2024/03/14-March-Bitambatmi_page-1-1.pdf - [](https://bittambatami.com/309-2/) - [Epaper](https://bittambatami.com/epaper/): http://14-March-2024 http://bittambatami.com/wp-content/uploads/2024/03/14-March-Bitambatmi_All-pages.pdf14-March-2024 http://bittambatami.com/wp-content/uploads/2024/03/14-March-Bitambatmi_All-pages.pdf     - [Mumbai](https://bittambatami.com/mumbai/) - [Contact](https://bittambatami.com/contact/): 14-March-2024 http://bittambatami.com/wp-content/uploads/2024/03/14-March-Bitambatmi_page-1-1.pdf   - [Home](https://bittambatami.com/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)