मुंबई – MPB द्वारे प्रायोजित जागतिक क्रीडा छायाचित्रण पुरस्कार 2023 च्या क्रिकेट श्रेणीमध्ये मिड डेचे छायाचित्रकार अतुल कांबळे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. वर्ल्ड स्पोर्ट्स फोटोग्राफी अवॉर्ड्सची ही चौथी आवृत्ती आहे. यावेळी जगभरातील 70 हून अधिक देशांमधून 700 छायाचित्रकारांनी प्रवेश केला होता. त्यात अतुल कांबळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
अतुल कांबळे यांच्या दोन छायाचित्रांसाठी (एक क्रिकेटमध्ये आणि दुसरा जिम्नॅस्टिकमध्ये) हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्यातील एक छायाचित्र 25 ऑगस्ट 2023 रोजी वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर झोपडपट्टीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जिम्नॅस्टिकचा सराव करणाऱ्या मुलांचे आहे तर दूसऱ्या फोटोत शिवाजी पार्क वर सेम बॅटिंग पोज देताना खेळाडूंचे नयनरम्य दृश्य दिसत आहे.