Category: देश

National-News

३ सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन 

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा नवी दिल्ली -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी…

ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत

ई20 पेट्रोलमध्ये आर्द्रता (Moisture) आणि क्लोराइडच्या उपस्थितीची तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तपासणी ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत नवी दिल्ली : अलीकडेच ईबीएमएस…

 भारताचा ३४ सदस्यीय संघ जाहीरv

 ३री आशियाई ज्युनियर पिकलबॉल स्पर्धा थायलंड येथे येत्या २८ ते ३१ जुलै ला ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (AIPA) ने आशिया फेडरेशन ऑफ पिकलबॉल (AFP) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या…

जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा वर्ल्ड कप-२०२६च्या अंतिम सामन्याचे साक्षीदार ठरलेले महेंद्रशेठ घरत. न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर पत्नी शुभांगीताई आणि पुत्र कुणाल यांच्यासह त्यांनी अर्जेंटिना–स्पेन लढतीचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

अंबरनाथ नगरपालिकेत ६ विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल सात महिन्यानंतर विषय समित्या आणि सभापती पदाची निवड अखेर बिनविरोध झाली. १७ सदस्यांच्या समितीत भाजपा गटबंधन ८ तर शिवसेना गटबंधन ९ अशा सदस्य…

नौपाड्यात स्पा व मसाज सेंटरवर कारवाई करावी – संजय वाघुले

अनिल ठाणेकर ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती. संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 00000000000

सहा वर्षे, हिमालयाएवढा लढा –  भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी

सहा वर्षे, हिमालयाएवढा लढा –  भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी बालताल (जम्मू-काश्मीर), ९ जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे, हिमस्खलन आणि गोठवणारी थंडी यांचा सामना करत अनेक वर्षे घालवणाऱ्या मेघा इंजिनीअऱींगच्या  शेकडो कामगार, अभियंते, यंत्रचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा एका अशा प्रवासाचा अंतीम टप्पा होता, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. १३.१५३ किमी लांबीचा झोझिला बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण होणे भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला आहे. तरीही, यामागे जगातील सर्वात बांधकाम करण्यास कठीण परिस्थितींपैकी एक  असलेल्या ठिकाणी दाखवलेल्या जिद्दीची आणि चिकाटीची मानवी कहाणी दडलेली आहे. जवळपास सहा वर्षे, मेघा इंजिनीअरीगंच्या बांधकाम पथकांनी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर काम केले आणि अनेकदा उणे ३० अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाचा सामना केला. हिवाळा केवळ थंडी घेऊन आला नाही, तर त्यासोबत हिमस्खलनाचे संकटही ओढवले. मेघा इजिनीअरींगच्या  प्रकल्पात १,२०० हून अधिक लोकांनी योगदान दिले, ज्यामध्ये जवळपास ८० टक्के लोक जम्मू-काश्मीरमधील स्थानिक समुदायांमधील होते. त्यांनी संपूर्ण भारतातील बोगदा-बांधणी तज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, सुरक्षा तज्ञ आणि यंत्रचालक यांच्यासोबत काम केले. कामकाज अविरत चालू ठेवण्यासाठी, पर्वतांमध्ये एक संपूर्ण यंत्रणा (इकोसिस्टिम) उभी करावी लागली. कामगार विशेषतः विकसित केलेल्या छावण्यांमध्ये राहत होते; या छावण्यांमध्ये वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वयंपाकघर आणि चोवीस तास काम सुरू ठेवण्यास सक्षम अशा निवासस्थानांची सोय होती. कारगिल आणि लडाखच्या रहिवाशांसाठी, हा प्रकल्प आरोग्यसेवा, शिक्षण आणि जीवनावश्यक वस्तूंचा अधिक विश्वसनीय पुरवठा करण्याचे काम करेल. व्यापाऱ्यांसाठी मालाचा पुरवठ्यातील अनिश्चितता कमी होईल. पर्यटकांसाठी, यामुळे वर्षभर प्रवास करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, अनेक स्थानिक कुटुंबांसाठी हा बोगदा  अधिक वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक आहे: ते म्हणजे हंगामी विलगीकरणाचा अंत. टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात जेव्हा कामगार बोगद्याच्या जोडणीच्या ठिकाणाहून बाहेर आले, तेव्हा हे यश केवळ अभियंते आणि यंत्रांचेच नव्हते, तर त्या हजारो लोकांचेही होते ज्यांनी हवामान, उंची किंवा भौगोलिक परिस्थितीला आपल्या मार्गातील अडथळा बनू दिले नाही. हिमालयाच्या कुशीत त्यांनी पर्वताला छेदून एक मार्ग तयार केला आहे — आणि कदाचित संपूर्ण प्रदेशाचे भविष्यच बदलून टाकले आहे.

लोकसभेत घटना दुरुस्ती नामंजूर ५४ मतांमुळे ‘नारीवंदन’ला नकार

लोकसभेत घटना दुरुस्ती नामंजूर ५४ मतांमुळे ‘नारीवंदन’ला नकार नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्वकांक्षी १३१ वी दुरुस्ती नारीवंदन विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, आणि सीमांकन विधेयक, लोकसभेत सादर केली होती. या घटनादुरुस्तीला ५४ मते कमी पडल्यामुळे एतिहासिक…

नारी शक्ती वंदन’ हे विधेयक देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल – नरेश म्हस्के

 ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा नवी दिल्ली : ज्या हातांनी पाळणा हलवला, तेच हात आज देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहेत आणि तेच हात आज सर्वोच्च सभागृहात कायद्याची निर्मिती करणार आहेत. ‘नारी शक्ती वंदन’ हे विधेयक त्या अदृश्य हातांना दृश्य ताकद देण्याचे कार्य करुन देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल, अशी भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत मांडत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा व्यक्त केला. ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकावर शिवसेना पक्षाची भूमिका मांडली. खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ज्ञानाची देवी सरस्वती आहे तर शौर्याचे प्रतिक माँ दुर्गा आहे. अहिल्याबाई होळकरांनी एक उत्तम शासक म्हणून राज्य कारभार चालविला. आज महिला ग्रामसेविकेपासून सरपंच पदापर्यंत आपल्या गावचा कारभार हाकात असून पूर्ण गावाचा कायापालट त्यांनी केला आहे. आज देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान असून ती अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचा फक्त नारा नसून एक ध्येय्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. महाराष्ट्रात तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहिण योजना सुरु झाली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने ते क्रांतिकारी पाऊल होते. ती केवळ आर्थिक मदत नसून माता-भगिनींच्या स्वाभिमानाचा सन्मान होता. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्धर करुन मुख्य प्रवाहात आणले गेले. आज या विधेयकामुळे महिलांचा संसदेत आज गुंजणार असून देशाची प्रगतीकडे वाटचाल अजून मजबूत होईल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या ऐतिहासिक विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना आवाहन करत हे विधेयक एका पक्षाचे नसून या देशाच्या ‘मातृशक्तीचे’ प्रतिक आहे. आपल्या समर्थनामुळे जगाला हा संदेश जाईल की, भारत आपल्या मुलींच्या पंखांना आकाश देण्यास सज्ज आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप

  माथेरान :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काल येथील कम्युनिटी सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला…