खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगरात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम उत्साहात संपन्न
सुनिल इंगळे उल्हासनगर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या १० लाख मोफत वही वाटप उपक्रमा अंतर्गत,नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा, शिवनेरी नगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई), उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद सालेकर, विभागप्रमुख प्रमोद पाण्डेय, विभाग संघटक आदेश पाटील, युवासेना उल्हासनगर संपर्क प्रमुख तुषार बांदल, विजय इंजे, प्रदीप आयरे, अनंत सावंत, अरुण कोळी तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व समस्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शिक्षण हीच खरी ताकद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध!” असलायचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी सांगितले. ०००००००
शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी १० ऑगस्टला देशव्यापी ‘जेल भरो’ आंदोलन
डॉ. अशोक ढवळे यांची घोषणा अनिल ठाणेकर ठाणे, शेतकरी, कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांवर १० ऑगस्ट रोजी देशभर प्रत्येक जिल्हा स्तरावर होत असलेले जेल भरो आंदोलन श्रमिकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संघर्ष ठरणार आहे. १० ऑगस्टच्या या लढ्यात संपूर्ण ताकदीने सामील होण्याचे आवाहन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्थीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी केले आहे. अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे २८ व २९ जून रोजी संपन्न झाली. सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात तीव्र झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची दोन दिवस सखोल चर्चा केल्यानंतर किसान सभेने हे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी शेतकऱ्यांचा देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक दिली आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, वाढता उत्पादन खर्च, पीक विमा, जमीन अधिग्रहण, खतांची कमतरता, फसव्या कर्जमाफी योजना, अन्न महामंडळाचे महत्व संपवण्याचे कारस्थान, ऊस दर, भारत अमेरिका, भारत युरोप, व भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे भारतीय शेतीवरील दुष्परिणाम इत्यादी प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या व श्रमिकांच्या इतर प्रश्नांवर देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक देण्यात आली. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर इतर शेतकरी संघटनांना एकत्र करत शेतकरी संघटनांची देशव्यापी एकजूट मजबूत करण्याची आवश्यकता आहे. २८ जुलै रोजी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व संघर्ष तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत घेण्यात येणार असून यात किसान सभा सहभागी होऊन आपले योगदान देईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शेतकरी एकजुटीला श्रमिक एकजुटीत परिवर्तित करून सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार संघटनांची २९ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवर होत असलेली संघर्ष परिषद यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. किसान सभेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची हाक यावेळी देण्यात आली.१५ नोव्हेंबर रोजी हुतात्मा बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभेचे ध्वजारोहण करून देशातील हजारो गावांत शेतकरी प्रश्नांवर सभा, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ नोव्हेंबर २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे होत असून याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकरी आंदोलनाला आणखी चालना मिळेल असा विश्वास देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. ००००००
एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर – डॉ..संजय मं.गो.
ठाणे- दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र – मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ…
केडीएमसी व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने किन्नर महोत्सव संपन्न
शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा – महापौर ॲड. हर्षाली चौधरी कल्याण : शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या किन्नर महोत्सव २०२६ या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त यांनी आपल्या भाषणात काढले. या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली.
साऊथ मुंबईतील कॅरमपटूंसाठी भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन
मुंबई : हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त खासदार आदरणीय अरविंदजी सावंत आणि जाणीव ट्रस्ट यांच्या पुढाकाराने तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशच्या सहकार्याने दक्षिण मुंबईतील कॅरम खेळाडूंकरिता रोख…
श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न
ठाणे : प्रती वर्षीप्रमाणे यंदाही श्री माँ विद्यालयाच्या वतीने आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही ‘योग’ स्पर्धा शनिवार २७ जूनला सकाळी ८.३० ते दुपारी १ या…
चालकाला थेट सव्वा कोटींचा बंगला भेट!
महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व! उलवे : सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, मानवी मूल्यांचे जतन करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे.…
सार्वजनिक बांधकाम विभागात मनमानी कारभार
जादा बिलाची चौकशीची मागणी रमेश औताडे मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथे सहा महीने उपोषण करून माहिती अधिकारात माहिती मिळवली असताना मंजुरीपेक्षा सव्वा कोटींचे जादा बिल दिले असल्याची माहिती उघड झाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील जबाबदार कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांचेवर कारवाई करावी अशी मागणी भाई आकाश निर्मल यांनी अप्पर मुख्य सचीव सार्वजनिक बांधकाम विभाग व मंत्रालय विभागात केली आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम ठाणे क्रमांक १ यांनी वाडा मनोर राज्य महामार्ग ३४ या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मे २०२२ रोजी २ कोटी ७६ लाख ३४ हजार ४०५ रुपयांचा कार्यारंभ आदेश गंधे यांच्या नावाने आदेश दिला असल्याची माहिती समोर आली आहे. हा आदेश २९ बिलो होता असताना मार्च २०२३ मध्ये याचे अंतीम देयक ३ कोटी ९३ लाख ८८ हजार ५१ रु मंजुर केले. म्हणजे तब्बल १ कोटी १७ लाख ५२ हजार ६४८ रुपये जादा काढले. असा आरोप भाई आकाश निर्मल यांनी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे घेतलेल्या माहितीतून उघड झाला आहे. हि जादा रक्कम काढताना क्लॉज ३८ नुसार मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांची परवानगी घेतली नसून संदर्भ एम बी नोंद नसल्याने कामाचे चाचणी अहवाल नाहीत. काम सुरु करताना आणि पूर्ण झाल्यावर लेवल रजिस्टर नसल्याची माहिती अधिकारात माहिती दिली आहे असे भाई आकाश निर्मल यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार रोईंग वर्ल्ड कप
अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धा आयोजनासाठी ₹१० कोटींच्या आर्थिक सहाय्याची मागणी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट सुवर्णपदक विजेत्या लक्ष्य आणि उज्वल कुमार…
