शक्तिपीठ, मायनिंग, अणु ऊर्जा प्रकल्पांमुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेला धोका!
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध जैव विविधता भविष्यात अबाधित राहणार काय असा सवाल करत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग,अवैध मायनिंग , येऊ घातलेले अणु ऊर्जा प्रकल्प या सारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत तज्ञांनी…
ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘शूटिंग रेंज’ इमारत
शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली! राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी – प्रताप सरनाईक ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले ‘ठाणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करताना केवळ पायाभूत सुविधांचा विस्तार पुरेसा नाही, तर युवकांना प्रशिक्षण, खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि नागरिकांना विविध उपक्रमांसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरानंदानी इस्टेट जवळील मौजे वाघबीळ येथे उभारण्यात येणारे हे सुविधा भवन त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल,’ प्रस्तावित प्रकल्पासाठी २०२०.४८ चौ.मी. क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड असून, सुमारे ४५२२.०५ चौ.मी. बांधकाम क्षेत्रात बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. बेसमेंटमध्ये ३० चारचाकी आणि ५० स्कूटरसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर ट्रेनिंग हॉल, कॅफे, किचन, प्रसाधनगृह, शस्त्र-साहित्य वाटप कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालय प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर १० मीटर शूटिंग रेंजची ११ लेन, ६५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, ट्रेनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल आणि प्लेअर लाऊंज असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर २५ मीटर शूटिंग रेंजच्या १० लेन, ५५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष, स्टोअर रूम आणि प्रसाधनगृह; तर तिसऱ्या मजल्यावर ५० मीटर शूटिंग रेंजच्या ८ लेन, ४० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘ठाण्यातील नेमबाजीपटूंना दर्जेदार सराव आणि प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यासाठी सक्षम पायाभूत व्यवस्था निर्माण व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. ठाण्याच्या क्रीडा विकासाला नवी ओळख देणारे केंद्र म्हणून हे सुविधा भवन विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जनसंपर्क विभाग
ऐरोलीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
000 नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी-विभाग, ऐरोली कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई करत बांधकामाचा काही भाग निष्कासित केला. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त व उपआयुक्त (अतिक्रमण)…
गुरुपौर्णिमेनिमित्त निलेश सांबरे यांना विद्यार्थी व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
झडपोली (विक्रमगड) | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेनिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांना हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. झडपोली येथील जिजाऊ नगरीमध्ये…
डोंबिवली एम्स कॉलेज ऑफ फार्मसीला ‘एमएसबीटीई’ संस्थेकडून ‘उत्कृष्ट’ श्रेणी
कल्याण : फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या जोरावर डोंबिवली मधील एम्स कॉलेज ऑफ फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) कडून शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापनात उत्कृष्ट श्रेणी प्रदान…
कल्याणच्या काळा तलावात तरुणीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कल्याण : कल्याण पश्चिमेतील काळा तलावात मंगळवारी एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्या केली की, तिला तलावात ढकलून हत्या केली हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे तलाव परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी महापौर हर्षाली चौधरी आणि मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संताप व्यक्त केला आहे. हि तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह काळा तलावात आढळून आला. तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला असून या तरुणीने तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात असला तरी तिला कोणी ढकलून दिले का त्यामुळे तिचा तलावात बुडून मृत्यू झाला या बाजूनेही बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. या तलावाच्या विकासासाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या तलाव परिसरात ३२ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सायंकाळी तरुणीचा मृतदेह तलावात मिळून आल्याने नक्की घटना कशी घडली हे सीसीटीव्हीत पाहता येईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. तेव्हा तलाव परिसरातील ३२ सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी मनसे नगरसेवक गणेश लांडगे आणि विभाग प्रमुख कपिल पवार यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेतली. यावेळी विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे याबाबत विचारणा करुन संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही लावले असले तरी त्यांची देखभाल दुरुस्तीच केली जात नसल्याची बाब याघटनेच्या निमित्ताने उघड झाली आहे. महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकार्यांसमवेत काळा तलाव येथे धाव घेऊन तलाव परिसराची पाहणी केली. तसेच तलावाच्या सुरक्षेसंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
हॉटेलमध्ये चोरी करत २८ हजारांची रोकड व ग्राहकाचा मोबाईल लंपास
कल्याण : कल्याण पूर्वेतील नेतिवली चौक परिसरातील कोकण किनारा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरफोडी करून २८ हजारांची रोकड आणि एका ग्राहकाचा मोबाईल फोन लंपास केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात…
– गुरुपौर्णिमेनिमित्त मलंगगडावर भारतीय जनता पार्टीचा भक्तिमय सोहळा
डोंबिवली, दि. २९ जुलै (आरती परब) : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख…
