डोंबिवली, दि. २९ जुलै (आरती परब) : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मलंगगडावर जाऊन बाबा मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले तसेच पूजा- अर्चना करण्यात आली. यावेळी “आई भवानी शक्ती दे… मलंगगडाला मुक्ती दे…” या जयघोषाने संपूर्ण मलंगगड परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी राज्याच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सुख- समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या आरोग्य, ऐक्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी आमदार महेश लांडगे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रसिद्धी प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे, गटनेते शशिकांत कांबळे, उपमहापौर राहुल दामले, नाना सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश चव्हाण, आशु सिंग, सुजल म्हात्रे, अभिषेक यादव, विपुल म्हात्रे तसेच मलंगगड परिसरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि हिंदू परंपरेप्रती असलेली अढळ श्रद्धा व्यक्त करण्यात आली. मलंगगडाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *