Category: क्रीडा

शिवनेरी कबड्डी महोत्सवात रिजनल स्पोर्ट्स बोर्डची दमदार कामगिरी

शिवनेरी कबड्डी स्पर्धा २०२६ शिवनेरी कबड्डी महोत्सवात रिजनल स्पोर्ट्स बोर्डची दमदार कामगिरी विवेक महिला संघाचाही मोठा विजय अमर क्रीडा क्लब, विजय क्लब, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि बीपीटीची प्रतिस्पर्ध्यांवर मात…

अमर हिंदच्या विजयात सेजलची चमक

शिवनेरी कबड्डी स्पर्धा २०२६ अमर हिंदच्या विजयात सेजलची चमक जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच मुंबई : शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात महिला गटात सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांच्या चमकदार…

रुपाली ज्वेलर्स, मुंबई पोलीसांचे व्यावसायिक गटात दणकेबाज विजय

शिवनेरी कबड्डी स्पर्धा रुपाली ज्वेलर्स, मुंबई पोलीसांचे व्यावसायिक गटात दणकेबाज विजय मुंबई : दिवसातील सर्वोत्तम पकडींचा नजराना पेश करणाऱ्या रुपाली ज्वेलर्सच्या खेळाडूंनी शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात…

उपवर्गीकरण परिषदेत नारायण बागडे उपस्थित राहणार

रमेश औताडे मुंबई : उपवर्गिकरण पोलखोल परिषदेचे आयोजन रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे यांनी नाशिक येथे केले असून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा नेते रविंद्र अहिरे यांनी दिली. अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण  अ.ब.क.ड. करून देऊ अशी बतावणी म्हणजे थोतांड आहे. तुम्ही फक्त निळ्या सावलीत आसरा घेवू नका. तसेच फुले शाहु आंबेडकरी विचारांपासून फारकत घ्या  यासाठी आहे असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृह गोल्ड क्लब येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीला बागडे सर संबोधित करणार आहेत . करिता कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र अहिरे यांनी केले आहे.

हर्षित माहीमकर उपांत्य फेरीत

मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा हर्षित माहीमकर उपांत्य फेरीत मुंबई, २९ मार्च: माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून; अव्वल १६ कार्पोरेट संघांचा सहभाग मुंबई, २९ मार्च: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२६ वार्षिक…

५२ वे वासंतिक प्रशिक्षण शिबीर दादरमध्ये भव्य दिमाखात होणार

समर्थमध्ये रंगणार क्रीडामहोत्सव! ५२ वे वासंतिक प्रशिक्षण शिबीर दादरमध्ये भव्य दिमाखात होणार तब्बल २००० शिबिरार्थी, २५० प्रशिक्षक आणि ४० मान्यवरांच्या उपस्थितीत ‘समर्थ’चा शताब्दीउत्तर जल्लोष मुंबई : दादरमधील क्रीडांगण पुन्हा एकदा…

जेजे वि. ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आज अंतिम झुंज

आत्माराम मोरे स्मृती चषक जेजे वि. ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आज अंतिम झुंज मुंबई : ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी धडाकेबाज फलंदाज नरेश…

जलतरणात महाराष्ट्राची पदक पंचमी

१ ली खेलो इंडिया ट्राइबल स्‍पर्धा, छत्तीसगड २०२६ जलतरणात महाराष्ट्राची पदक पंचमी तन्वीला सुवर्णासह १ रौप्‍य, पलाशला २ रौप्‍य, भक्तीशला १ कांस्य रायपुर ः  पहिल्‍या खेलो इंडिया ट्रायबल स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या…

अव्वल मानांकित पूर्वा, आर्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा अव्वल मानांकित पूर्वा, आर्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मुंबई : अव्वल मानांकित पूर्वा बर्वे आणि दुसऱ्या मानांकित आर्या कोरगावकरने माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पादूकोण अकादमीद्वारे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला एसव्हीसी सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. राऊंड ऑफ ३२ फेरीत पूर्वाने आक्रमक शैली आणि उत्तम डावपेचांच्या जोरावर अनन्या राणेवर १५-०, १५-८ असा विजय मिळवला. आर्याला टियान कॅस्टेलिनोकडून थोडा प्रतिकाराचा सामना करावा लागला. पण  तिने १५-५, १५-८ असा विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, शिवंजली कार्डिलेने टिया उग्रानकरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत १७-१९, १५-६, १५-१३ अशी बाजी मारताना अव्वल दोन मानांकित खेळाडूंसोबत पुढील फेरीत प्रवेश केला. तिसरी मानांकित श्रेया भोसले आणि चौथी मानांकित श्रेया शेलार यांनीही राऊंड ऑफ १६ फेरीत स्थान मिळवले. ज्युनियर गटांमध्ये, १५ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक अंबरकर आणि आदेश एकाडेने राऊंड ऑफ ३२ फेरीतील आपापले सामने जिंकले. श्लोकने पुनरागमन करत आराध्य पवारला १२-१५, २०-१८, १५-९ असे हरवले तर आदेशने आदित्य सरवदेवर ११-१५, १५-७, १५-१० अशी मात केली. निकाल – महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२ फेरी): १- पूर्वा बर्वे विजयी वि. अनन्या राणे १५-०, १५-८; २-आर्या कोरगावकर विजयी वि. टियान कॅस्टेलिनो १५-५, १५-८; शिवांजली कर्डिले विजयी वि. टिया उग्रंकर १७-१९, १५-६, १५-१३; ३-श्रेया भोसले विजयी वि. रुची राणे १५-५, १५-१; ४-श्रेया शेलार विजयी वि. ऋषिका पाल १५-४, १५-४. १५ वर्षांखालील मुली (राऊंड ऑफ ३२ फेरी): १-अन्विषा घोरपडे विजयी वि. पहल तन्ना १५-३, १५-४; मनस्वी राऊत विजयी वि. मीरा दीक्षित १५-८, १५-१३; अनुश्री मोडलिंबकर १५-५, १५-७; आराध्या शुक्ला विजयी मेहा शाह १५-७, १५-५;