Category: क्रीडा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा हॉस्पिटल अंतिम फेरीत मुंबई :   आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्धशतकवीर सुभाष शिवगण, सलामीवीर जगदीश वाघेला, अष्टपैलू प्रकाश सोळंकी यांच्या दमदार खेळामुळे जेजे हॉस्पिटलने बलाढ्य रहेजा हॉस्पिटलचा ९ विकेटने पराभव केला. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने अर्धशतक ठोकूनही रहेजा हॉस्पिटलला उपांत्य उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलामीवीर सुभाष शिवगण व सचिंद्र ठाकूर यांना सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊन मुंबई क्रिकेट संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले, प्रतिष्ठानचे सेक्रेटरी विराज मोरे व वैभव मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरु झालेल्या स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात जेजे हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून रहेजा हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर सचिंद्र ठाकूरने ४८ चेंडूत ५९ धावांची आक्रमक फलंदाजी केल्यामुळे रहेजा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १२९ धावांचा टप्पा गाठला. सलामीवीर जगदीश वाघेला (३३ चेंडूत ४२ धावा) व सुभाष शिवगण (४१ चेंडूत ५३ धावा) यांनी ११ व्या षटकाला पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केल्यामुळे जेजे हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १ बाद १३२ धावा साकारून सहज साध्य केले. शिवतीर्थावर विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रोहित शर्मा यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानाने घडवले. त्याच मैदानावर ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृतीप्रीत्यर्थ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी आंतर रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे सातत्य त्यांचे सुपुत्र अश्विनीकुमार मोरे यांनी कायम राखणे, भूषणावह असल्याचे मनोगत एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी निलेश भोसले यांनी व्यक्त केले.

‘अनधिकृत’ खो-खो स्पर्धांवर बंदी! सहभागी झाल्यास ‘आजीवन बंदी’

‘अनधिकृत’ खो-खो स्पर्धांवर बंदी! सहभागी झाल्यास ‘आजीवन बंदी’ भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचा कडक इशारा ‘खो-खो इंडिया’ व ‘खो-खो महाराष्ट्रा’च्या स्पर्धांपासून दूर राहा –प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव खेळाडूंच्या…

 लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाचा ७ विकेटने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लीलावती हॉस्पिटलचा राहुल जांभळे व केडीए हॉस्पिटलचा अॅलन गावद्या यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रीडाप्रेमी अरुण माने, रुग्णालयीन क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, श्रीकांत दुधवडकर, भरत पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, रुपेश कोंडाळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. शिवाजी पार्कमधील बीएमसी खेळपट्टीवर लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. अॅलन गावद्या (३६ चेंडूत ६२ धावा), अलकेत तांडेल (३२ चेंडूत ३३ धावा), सुरज जयस्वाल (२२ चेंडूत ३४ धावा) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५८ धावांचा टप्पा गाठला. स्वकीत पांचाळने २५ धावांत ३ बळी व जगदीश कोठारेने ३६ धावांत २ बळी घेतले. विजयी लक्ष्य गाठताना धावगती जलद करण्याच्या नादात दुसऱ्या षटकामध्ये भरवंशाचा सलामीवीर मनोहर पाटेकरला (१३ चेंडूत १३ धावा) केडीएच्या दक्ष क्षेत्ररक्षकांनी धावचीतद्वारे टिपले. परंतु त्यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल जांभळे (३९ चेंडूत ६४ धावा), संदीप कणसे (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा), संदेश पंधेरे (१३ चेंडूत नाबाद २२ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून लीलावती हॉस्पिटलचा विजय १८.१ षटकात ३ बाद १५९ धावा फटकावून साकारला. दुसऱ्या सामन्यात सोमैया हॉस्पिटलने सायन हॉस्पिटलला ३५ धावांनी पराभूत करतांना प्रकाश पुजारी (२९ चेंडूत ५७ धावा) व दर्शन गुरव (३९ चेंडूत ४९ धावा) यांची फलंदाजी विजयासाठी उपयुक्त ठरली. संभाजी थोरात (४० चेंडूत ४२ धावा) व निलेश चव्हाण (१२ चेंडूत नाबाद २० धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सायन हॉस्पिटलला १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती काका पवार यांच्‍या तालमीला ५० लाखांचे आर्थिक सहाय्य पुणेः खासदार व कुस्ती श्रेत्राचे आश्रयदाते  शरद पवार साहेब यांनी  डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती तर काका पवार यांच्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल,पुणे या संकुलसाठी ५० लाख रुपयेंचे बक्षिस दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्‍कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.  यावेळी उद्योजक श्री मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्‍पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्‍या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्‍लांनी पदकाची लयलुट केल्‍याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे. शरद पवार यांचे आभार र्‍व्यक्‍त करीत काका पवार म्‍हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्‍यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्‍या वेगाने पवार हेच कुस्‍तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, गुरूवर्य काका पवार यांच्‍या सल्‍ल्‍यानंतर मी पुन्‍हा महाराष्ट्र केसरीच्‍या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्‍पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्‍यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्‍साहन देणारी ठरली आहे. चौकट शासनाकडून नोकरीचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काक पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्‍यावेळी येत्‍या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्‍याचे काका पवार यांनी सांगितले आहे.

युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर

युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्या जाहीर मुंबई :: युनियन क्रिकेट अकॅडमीतर्फे मुलींसाठी ओपन एज निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक महिला क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि नॉकआउट स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या निवड चाचण्या २७ मार्चला सायं. ४ते  ६ वाजेपर्यंत, युनियन क्रिकेट अकॅडमी, कल्याण येथे पार पडतील. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आगामी नॉकआउट स्पर्धेत अकॅडमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. पात्रता: – सर्व वयोगटातील मुलींसाठी खुले क्रिकेटची आवड असणे आवश्यक, सोबत आणावयाच्या वस्तू,  संपूर्ण क्रिकेट किट, स्पोर्ट्स शूज, पाण्याची बाटली निवड निकष: – खेळातील कामगिरी- फिटनेस- शिस्त – खेळाची समज अकॅडमीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य संधी देणे हा आमचा उद्देश आहे. इच्छुक खेळाडूंनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.” अधिक माहितीसाठी ९९६८८५६७८८ या क्रमांकावर संपर्क साधा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा केडीए, रहेजा, केईएम हॉस्पिटल उपांत्यपूर्व फेरीत मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल-अंधेरी, रहेजा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. अर्धशतकवीर संकेत किणी ( ४३ चेंडूत ५४ धावा) व दिशांत म्हात्रे (२८ चेंडूत ३५ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने उभारलेले १५१ धावांचे आव्हान किम्स हॉस्पिटलला २३ धावांच्या फरकाने पेलवले नाही. सलामीवीर डॉ.रौठू राकेशकुमार (२० चेंडूत २३ धावा) व डॉ. परमेश्वर मुंडे (११ चेंडूत नाबाद १५ धावा) यांनी किम्स हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू डॉ. राकेशकुमार व संकेत किणी यांना पुरस्कार देऊन क्रिकेटपटू धनंजय केतकर, डॉ. विवेक पालकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले. शिवाजी पार्क येथील दुसऱ्या अतिशय चुरशीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सलामीवीर भूषण सावंत (२० चेंडूत २५ धावा) व विजय वैती (३३ चेंडूत ४६ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलने सर्वबाद १३१ धावसंख्या रचली. बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना १४ धावा कमी पडल्या. सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव (३१ चेंडूत ३५ धावा) व अष्टपैलू डॉ. मनोज यादव (९ धावांत ५ बळी) यांनी छान खेळ केला. केईएम हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १२१ धावांचा टप्पा गाठताना प्रीतेश सावंत (३९ चेंडूत ४३ धावा) व सागर सोळंकी (२८ चेंडूत ३१ धावा) यांनी चमकदार फलंदाजी केली. सलामीवीर कल्पेश भोसलेच्या (३३ चेंडूत ४७ धावा) धडाकेबाज फलंदाजीमुळे डावाच्या मध्यास ४ बाद ८१ धावांची सुस्थिती कस्तुरबा हॉस्पिटलकडे होती. परंतु जयदीप मेहेर (२७ धावांत ३ बळी) व प्रीतेश सावंत (१५ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून कस्तुरबा हॉस्पिटल संघाला १५.४ षटकात ९७ धावांत गुंडाळले आणि केईएम हॉस्पिटलने २४ धावांनी शानदार विजय संपादन केला.

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून मुंबई, २४ मार्च: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आणि नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पदुकोण अकादमीद्वारे आयोजित ‘योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती राज्यस्तरीय खुली बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ३६० हून अधिक प्रवेशिका आल्या असून ही स्पर्धा पुरुष आणि महिला एकेरी तसेच १५ आणि ११ वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटांमध्ये खेळवली जाईल. हे सामने नॉर्थ इंडियन असोसिएशन, एमआयजी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि माटुंगा जिमखाना येथील कोर्टवर खेळले जातील. पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी रोख ४१,००० रुपये तर उपविजेत्याला प्रत्येकी रोख ३१,००० रुपये बक्षीस मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१,००० आणि ११,००० रुपये मिळतील. १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्याला ८,५०० रुपये, उपविजेत्याला ५,५०० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३,५०० रुपये असे  बक्षीस ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांखालील गटासाठीची पारितोषिके संदीप ठाकर यांनी त्यांचे पुत्र निहार ठाकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहेत. ११ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ६,००० रुपये रोख बक्षिसे मिळतील तर उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला प्रत्येकी ४,००० आणि २,५०० रुपये मिळतील. अधिक माहितीसाठी आयोजन सचिव जितेश पदुकोण (९८२१० ५१७९०) यांच्याशी संपर्क संपर्क साधा.

एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय

एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मुंबई, २४ मार्च: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) आयोजित एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेत (एलिट ग्रुप) एमसीसी ब्ल्यू संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली. एमसीसी ब्ल्यू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७ षटकांत २३९ धावांची मजल मारली. त्यात झैद मुफ्ती ८७(७३) आणि शौर्य वीर नगरचे ६१(९२) सर्वाधिक योगदान राहिले. जेएसएफकडून निशार्ग चौधरी (५/४५) आणि देव जम्मुला (३/५१) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. हर्षल वाघमारे (४/३०), हृद्या (२/१९) आणि अफसर अहमदच्या (२/३७) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जेएसएफचा पहिला डाव ४०.३ षटकांत १५० धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून मुहम्मद इब्राहिम ५५(८८) आणि देव जम्मुला २७(२७) सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावातील ८९ धावांची आघाडी एमसीसी ब्ल्यू संघासाठी निर्णायक ठरली. एमसीसी ब्ल्यू संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. यांच्याकडून दियान कुबाडिया ५०(४६) आणि डॅलरॉन रॉड्रिग्जने ४३(३४) चांगली फलंदाजी केली. जेएसएफकडून निशार्ग चौधरीने (५/४९) अचूक मारा केला. पराभूत जेएसएफचा अष्टपैलू निशार्ग चौधरीला (संपूर्ण सामन्यात १० विकेट) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक: एमसीसी ब्ल्यू संघ (पहिला डाव) – ४७ षटकांत सर्वबाद २३९(झैद मुफ्ती ८७(७३), शौर्य वीर नगर ६१(९२); निशार्ग चौधरी ५/४५, देव जम्मुला ३/५१). दुसरा डाव – ३० षटकांत ७ बाद १९८(दियान कुबाडिया ५०(४६), डॅलरॉन रॉड्रिग्ज ४३(३४); निशार्ग चौधरी ५/४९). जेएसएफ (पहिला डाव) – ४०.३ षटकांत सर्वबाद १५०(मुहम्मद इब्राहिम ५५(८८), देव जम्मुला २७(२७); हर्षल वाघमारे ४/३०, हृद्या २/१९, अफसर अहमद २/३७). निकाल: सामना अनिर्णित, एमसीसी ब्लू संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी. सामनावीर: निशार्ग चौधरी १२(२७) ५/४५ आणि ५/४९.

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता मडगाव (गोवा) : येथे सुरू असलेल्या Yonex Sunrise ४८व्या भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५-२६ मध्ये मुंबईच्या मुरली सुब्रमण्यम यांनी ६० वर्षांवरील एकेरी गटात दमदार कामगिरी करत…

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!  गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियममध्ये क्रीडा संघटकांचा ऐतिहासिक मेळावा मुंबई: पारंपारिक क्रिकेटच्या चौकटीबाहेर आता नव्या थराराची चाहूल लागली आहे! महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटचा झंझावात घुमवण्यासाठी ‘महाइनडोर क्रिकेट…