Category: क्रीडा

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा खालसाचे तायक्वांडोपटू चमकले मुंबई : जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत किंग सर्कल येथील गुरु नानक खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना तीन कास्य पदकांची कमाई केली.  या अ.भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत देशभरातील २३४ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता, तर एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. खालसा कॉलेजच्या आर्यन येवलेने‌ ६८ किलो वजनी गटात, तर ८० किलो खालील वजनी गटात निहाल भोईरने आणि ओम कदमने आपली छाप पाडताना कांस्य पदके मिळवली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये यांना निसटता पराभव पत्कारावा लागला. अन्यथा त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होता. या तिघांना प्रशिक्षक राजेश मुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे खास  अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका जसवीर कौर यांनी देखील खेळाडूंच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली. ठाणे :- शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेत उपांत्या फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या उपांत्यापूर्व फेरीत कल्याणच्या शिवशंकर मंडळाने विजय क्रीडा मंडळाचा प्रतिकार ४१-३१ असा मोडून काढत उपांत्या फेरी गाठली. पूर्वार्धात लोण देत २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशंकरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत १० गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मंगेश सोनावणे, सुमित साळुंखे यांच्या धारदार चढयांना तुषार भोईर याची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. विघ्नेश चौधरी, रोनक पाटील यांचा चढाई पकडीचा खेळ विजय मंडळाचा पराभव टाळण्यास दुसऱ्या सामन्यात जय बजरंग-वाशिंद संघाने श्री समर्थ मंडळावर ४१-१९ अशी सहज मात केली. आक्रमक खेळ करीत जय बजरंगने पहिल्या डावात २ लोण देत २५-०८ अशी आघाडी घेत आपला विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजू कथोरे, दर्शन पवार यांच्या झंझावाती चढयांना अतुल देसलेची मिळालेली पकडीची साथ यामुळे जय बजरंगने सहज विजय मिळविला. श्री समर्थच्या ओमकार म्हात्रेचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. मोरया मंडळाने जय बजरंग-खारेगाव संघाचा ५०-२४ असा पाडाव करीत उपांत्या फेरी गाठली. विश्रांतीपर्यंत ३लोण देत ३०-१० अशी आघाडी घेत मोरयाने आपला विजय आधीच  निश्चित केला होता. विश्रांतीनंतर औपचारिकता पूर्ण करीत आणखी एक लोण देत सामना आपल्या खिशात टाकला. परेश हरड, धीरज तरे, अजय पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय बजरंगच्या सोहम मोरे, आर्यन पाटील यांची या सामन्यात मात्र चालली नाही. शेवटच्या सामन्यात जय हनुमान-काल्हेर संघाने हुतात्मा शांतराम संघावर ३७-०८ असा सहज विजय मिळविला. गौरव पाटील, हर्ष भोईर, वैभव पाटील यांच्या तुफानी खेळाने हा विजय सोपा केला.

आकाश शिंदे, समरीन बुरोंडकर यांच्या कडे महाराष्ट्राचे नेतृत्व.

५वी वरिष्ठ पुरुष व महिला गट फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-मध्य प्रदेश-२०२६ मुंबई :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने “५व्या वरिष्ठ गट कबड्डी” स्पर्धेकरिता आपले दोन्ही संघ जाहीर केले. संता, मध्य प्रदेश येथे  १९ ते २२ मार्च या कालावधित ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदे कडे पुरुष संघाचे, तर रत्नागिरीच्या सिमरन बुरोंडकर कडे महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोन्ही संघाना स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सोमवार १६ मार्च रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. निवडण्यात आलेला हा संघ १७ मार्चला दुपारी ०१-३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता रवाना झाला. अशी माहिती व संघाची घोषणा राज्य कबड्डी संघटनेचे सचिव माधव गायकवाड यांनी सर्व प्रसार माध्यमाकरिता केली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे. पुरुष संघ :- १) आकाश शिंदे-संघनायक, नाशिक, २)सुरज दूंदले – ठाणे, ३)आकाश अरसूल – मुं. उपनगर, ४) सौरभ राऊत – अ. नगर, ५) संकेत सावंत – मुंबई शहर, ६) सुरेश जाधव – पुणे, ७)साईप्रसाद पाटील – कोल्हापूर, ८)अजित चौहान – पुणे, ९) आदित्य शशिकांत शिंदे – रत्नागिरी, १०)आदित्य पोवार – कोल्हापूर, ११)अनुज गावडे – पुणे, १२)सौरभ फागरे – कोल्हापूर, १३) साहिल राणे – मुंबई शहर, १४) अभिषेक गुंगे – सांगली. प्रशिक्षक :- निलेश शिंदे, मुंबई उपनगर                व्यवस्थापक :- भगीरथ पाटील, ठाणे. महिला संघ :- १) समरीन बुरोंडकर, संघनायिका – रत्नागिरी, २) माधुरी गवंडी – ठाणे, ३) कोमल देवकर – मुंबई उपनगर, ४)तसनिम बुरोंडकर – रत्नागिरी, ५) शुभदा खोत – मुंबई उपनगर, ६) आम्रपाली गलांडे – पुणे, ७) प्रतिक्षा तांडेल – मुंबई शहर, ८) हर्षा शेट्टी – पुणे, ९) याशिका पुजारी – मुंबई उपनगर, १०) समृद्धी मोहिते – मुंबई उपनगर, ११) निकिता पडवळ – पुणे, १२) प्रणाली नागदेवता – मुंबई उपनगर, १३) संजना भोईर – पालघर, १४) साक्षी सावंत – मुंबई शहर. प्रशिक्षिका :- मेघाली म्हसकर         व्यवस्थापिका :- अश्विनी ईश्वलकर.

नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

नूतन विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न मुंबई: महाराष्ट्र मंडळ (भाभा अणुसंशोधन केंद्र) शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यामंदिर शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्य क्रीडा मार्गदर्शक  प्रवीणजी सावंत, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे, कबड्डी प्रशिक्षक  नितीनजी पवार उपस्थित होते. यावेळी लेझीम आणि ढोल पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका सुचिता पवार व ज्येष्ठ शिक्षिका संध्या चंदनशिवे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स-साहित्य व्यायाम प्रकार आणि मनोऱ्यांचे चित्तथरारक सादरीकरण केले.  प्रवीणजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. तर इंद्रजीत मोरे यांनी खेळाडू घडवण्यासाठी बालपणापासूनच व्यायामाची गोडी हवी, असे सांगितले.  नितीन पवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत बक्षीस नेहमीच प्रेरणादायी असते, असे नमूद केले.  हर्ष कदम आणि समृद्धी वाक्षे या विद्यार्थ्यांना आदर्श खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.

हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते 

सुरेखा कडवे स्मृती बुध्दिबळ स्पर्धा हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील १३ वर्षाखालील गटात हिरण्मयी कुळकर्णी, १० वर्षाखालील गटात अथर्व मुळीक आणि ७ वर्षाखालील गटात निधीश खोपकर यांनी विजेतेपद पटकाविले. परिणामी विजेत्यांबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या मातांचा देखील आदर्श महिला पुरस्काराने अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व मंगेश चिंदरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित स्पर्धेमधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत पहिल्या पटावर जी. क्वाड्रसने स्कॉच ओपनिंगचा प्रयोग करीत हिरण्मयी कुळकर्णीच्या राजावर प्रारंभी जोरदार हल्ले केले. परंतु बचाव तंत्राचे अचूक डावपेच रचून अपराजित हिरण्मयीने २८ व्या मिनिटाला बाजी मारली. आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्याने झालेल्या स्पर्धेच्या १३ वर्षाखालील गटात मुलींमध्ये हिरण्मयी कुळकर्णीने (४.५ गुण) प्रथम, जी. क्वाड्रसने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (२.५ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये गोकर्ण औटीने (४ गुण) प्रथम, प्रणव जैनने (३.५ गुण) द्वितीय, अर्णव जगतापने (३ गुण) तृतीय; १० वर्षाखालील गटात मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम, साध्या जाधवने (३ गुण) द्वितीय, विधी येसणेने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये अथर्व मुळीकने (५ गुण) प्रथम, कैवल्य परबने (४ गुण) द्वितीय, अर्णव शेटेने (३ गुण) तृतीय तर ७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये मिर्या तिवारीने (४ गुण) प्रथम, मनस्वी पाटीलने (४ गुण) द्वितीय, पेहेर शाहने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये निधीश खोपकरने (५ गुण) प्रथम, आरुष नेवस्करने (२.५ गुण) द्वितीय, सार्थ शाहने (२.५ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.

आज कुर्ला येथे गोरखनाथ महिला संघाची शालेय मुलींची कबड्डी स्पर्धा

आज कुर्ला येथे गोरखनाथ महिला संघाची शालेय मुलींची कबड्डी स्पर्धा मुंबई : गोरखनाथ महिला संघ, कुर्ला यांच्यातर्फे गौरीशंकर क्रीडा मंडळ, कुर्ला यांच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून १५ वर्षाखालील शालेय…

महत्वाच्या प्रकल्पाला पाठबळ

महत्वाच्या प्रकल्पाला पाठबळ भू-राजकारणाच्या पटावर ग्रेट निकोबार प्रकल्प केवळ आर्थिक योजना नसून राष्ट्रीय सुरक्षेचा भाग ठरतो, मात्र विकासाच्या या चमकदार आराखड्यामागे गंभीर प्रश्नही आहेत. ग्रेट निकोबार हे समृद्ध वर्षावन, प्रवाळभित्ती…

भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिकेसाठी निवड समिती जाहीर

भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिकेसाठी निवड समिती जाहीर महाराष्ट्रच्या गोविंद शर्मांची निवड समितीवर वर्णी भारतीय मातीतील अस्सल आणि वेगवान खेळ असलेल्या खो-खोचा आंतरराष्ट्रीय थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. भारत–नेपाळ खो-खो कसोटी…

ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्चला

ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्चला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती १३ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च…

७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६.

७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६. महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत. वडोदरा : महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत…