Category: ठाणे

Thane news

पारमिता धर्मादाय न्यासातर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील अंदाड येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस…

केडीएमसी महापौरांनी केली आधारवाडीतील आदिवासी वस्तीची पाहणी

पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील आदिवासी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान, रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान, संकुलात वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यासंबंधी गंभीर समस्या उघडकीस आल्या. संकुलात सर्वत्र पसरलेली घाण आणि अव्यवस्था पाहून महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापौरांनी सांगितले की, रहिवाशांना केवळ आधारवाडीतच नव्हे, तर नगरपालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी संकुलातील सर्व प्रमुख समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या भेटीमुळे आदिवासी वस्तीला भेडसावणाऱ्या दीर्घकाळच्या मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

कल्याणमध्ये पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात

कल्याण : आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ, कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर…

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; ३० हजार स्पर्धकांची नोंदणी

अनिल ठाणेकर ठाणे : येत्या ३० ऑगस्टला होणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक स्पर्धकांनी…

लाइफ वॉचर्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती परिसंवाद

राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत मार्गदर्शन कल्याण : लाइफ वॉचर्सतर्फे युवकांमध्ये सामाजिक आणि शालेय आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून एस.डी.टी. कलानी स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापरापासून बचाव या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम लाइफ वॉचर्सच्या स्कूल हेल्थ एज्युकेशन प्रोग्रामअंतर्गत, मनॊदय न्यूरोसायकट्रीक हॉस्पिटल, कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमित धर्माधिकारी यांनी राग समजून घेणे, भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे तसेच समवयस्कांचा दबाव आणि शैक्षणिक ताण यांचा आरोग्यदायी पद्धतीने सामना करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या आणि व्यसनांच्या समस्येबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि योग्य व जबाबदार निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या परिसंवादातील एक महत्त्वपूर्ण संदेश होता — “अमली पदार्थांना ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका.” मित्र किंवा इतर व्यक्तींकडून अमली पदार्थ घेण्यासाठी दबाव आणला जात असल्यास आत्मविश्वासाने नकार कसा द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा कठीण किंवा धोकादायक परिस्थितीत विश्वासू व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना आपल्या भावनांना समजून घेणे, समवयस्कांचा दबाव ओळखणे आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आरोग्यदायी सामोरे जाण्याच्या पद्धती तसेच समस्या निवारणाची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. हा कार्यक्रम लाइफ वॉचर्सच्या संस्थापक डॉ. रुपिंदर कौर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. त्या लाइफ वॉचर्सच्या शालेय आरोग्य शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. शालेय जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण रुजवणे आणि बालक व किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा सर्वांगीण विचार करणारे जनजागृती कार्यक्रम विकसित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला लाइफ वॉचर्सचे सहसंस्थापक रत्नेश महाडिक यांचीही उपस्थिती होती. एस.डी.टी. कलानी स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना मनुजा तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला सहकार्य करून उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रुपिंदर कौर यांनी सांगितले की, योग्य वयात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांना जबाबदार निर्णय घेण्यास मदत होते आणि त्यांना अधिक निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भविष्य घडवता येते.

ईद-ए-मिलाद व रक्षाबंधनातून ‘एकतेचा धागा, सद्भावनेचा संदेश’

कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, मराठी शाळा आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना संगम – ईद-ए-मिलाद व…

आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रामदास आठवले

आरक्षण हा संविधानिक अधिकार, वंचित घटकांना अधिक संधी देण्याची गरज अनिल ठाणेकर ठाणे : देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी…

 कराडमध्ये खो-खोच्या पंचगिरीला आधुनिकतेचा ‘टच’

राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न डिजिटल स्कोअरिंगपासून ऑडिओ-व्हिज्युअल प्रशिक्षणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराड, ता. २६ : खो-खो आता केवळ मैदानावर वेगाने धावणारा खेळ राहिलेला नाही; पंचगिरीपासून स्कोअरिंगपर्यंत संपूर्ण व्यवस्थेलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राच्या खो-खोला अधिक अचूक पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि आधुनिक तांत्रिक व्यवस्थेचा नवा अध्याय मिळाला आहे. नियमांच्या बारकाव्यांपासून निर्णयक्षमतेपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामुळे राज्यातील पंचगिरीला नवी धार मिळणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, द ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन (सांगली) आणि सद्गुरू गाडगे महाराज (एसजीएम) कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. एसजीएम कॉलेजच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील सभागृहात झालेल्या समारोप सोहळ्याने शिबिराची सांगता झाली. राज्यभरातून सहभागी झालेल्या पंचांना आधुनिक नियम, तांत्रिक बाबी आणि सामन्यातील निर्णयप्रक्रियेचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीटी आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर. सामन्यातील गुंतागुंतीचे प्रसंग प्रत्यक्ष दृश्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्याने पंचांना अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीपणे मिळाले. त्यामुळे पंचगिरीत अचूकता, सातत्य आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. समारोपावेळी एसजीएम कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी खो-खोच्या इतिहासाचा आढावा घेत अशा प्रशिक्षणामुळे पंचांची निर्णयक्षमता अधिक अचूक व दर्जेदार होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रविंद्र (भाऊ) पवार यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पोहोचत असल्याचे सांगितले. संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी खो-खोच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी संघटनेच्या आधुनिक उपक्रमांची माहिती दिली. गुणलेखन अर्थात स्कोअरिंग डिजिटल व ऑनलाइन पद्धतीकडे नेण्याची प्रक्रिया सुरू असून, सामन्यांची नोंद, गुणपत्रिका आणि निकाल अधिक वेगवान व अचूक करण्यावर भर दिला जात आहे. एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे यांनी सहभागी पंचांच्या उत्साहाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाचा आवाका प्रत्यक्ष सहभागी पंचांपलीकडे खो-खोच्या व्यापक क्षेत्रापर्यंत पोहोचला. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा, सांगली असोसिएशनचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपाध्यक्ष अर्जुन माने आणि कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख उपस्थित होते. सहभागी पंचांसाठी एसजीएम कॉलेजतर्फे उत्कृष्ट भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले, तर डॉ. प्रशांत इनामदार यांनी आभार मानले. कराडचे हे शिबिर केवळ पंचांचे प्रशिक्षण ठरले नाही, तर महाराष्ट्राच्या खो-खोला आधुनिक, अचूक आणि तंत्रस्नेही बनविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात ठरले. खेळाडूंच्या गुणवत्तेसोबत पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि तांत्रिक व्यवस्थाही सक्षम झाली, तर महाराष्ट्राचा खो-खो देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक भक्कमपणे झेप घेईल. 0000

ठाण्यात समृद्ध मराठी परंपरेतील

मंगळागौरीच्या उत्साहाची नजाकत! भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम, वृषाली वाघुले यांचे आयोजन ठाणे : जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीबरोबरच बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण पद्धतीने बदल करीत शेकडो महिलांनी मंगळागौरीचा उत्सव साजरा केला. युवती बरोबर मध्यमवयीन महिलांनी एकत्र येत अपूर्व समन्वय साधत मांडलेल्या मंगळागौरीच्या खेळांमुळे समृद्ध मराठी परंपरेच्या उत्साहातील नजाकत रसिकांना अनुभवता आली. निमित्त होते भाजप व विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने, दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे मंगळागौरी स्पर्धा भरविले जाते. मराठमोळ्या सणांबरोबरच पिढ्यान पिढ्या सुरू असलेल्या संस्कृतीची युवा पिढीला ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून महिलांनी उपस्थिती दर्शविली. सकाळी साडेदहापासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी ७ पर्यंत सुरू होता. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले यांनी आयोजित केलेल्या उत्सवात मंगळागौरीचे खेळ साजरे केले जात असतानाच, पारपंरिकतेबरोबरच सामाजिक संदेश आणि जनजागृतीवर भर दिला गेला. या उत्कंठावर्धक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्नेहासखी गटाने ३१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले. तर नवी मुंबईतील रुचिरा गटाने २१ हजारांसह द्वितीय, डोंबिवलीतील साझ ह्यो तुझा गटाने ११ हजार रुपयांचे तृतीय, करीरोड येथील शिवाई गटाने ५ हजार रुपयांचे चतुर्थ आणि डोंबिवली येथील मराठमोळ्या गटाला २५०० रुपये मिळाले. या कार्यक्रमाला भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, माधुरी मेटांगे, जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक, मंडल अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी ज्ञानेश्वर अंदुरे, जगदीश मोहिते, प्रशांत कळंबटे, आकाश गोसावी, बाळकृष्ण शिंपी, वसंत वाघुले, हनीफ खान, भक्ती मोहिते, राणी क्षीरसागर, पूजा सरवदे, वैशाली विधाटे, शिल्पा उतेकर, मधुरा जोगळेकर, भाग्यश्री मुळे, भंडारे काकी यांनी प्रयत्न केले. 0000

 खडेगोळवली परिसरात गुन्हेगारांचा धुमाकूळ

दोन दुचाकी पेटवल्या, १५ वाहनांची तोडफोड दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; एका अल्पवयीनाचा समावेश कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेगोळवली परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत दोन दुचाकींना आग लावल्याची तसेच एका रिक्षासह तब्बल १४ चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडेगोळवली येथील पुष्पराज कॉलनीमध्ये आशीष गोकुळ तिळोंजे यांच्या दुचाकीला अज्ञात आरोपींनी आग लावली. त्याचवेळी जवळील नेहरू नगर परिसरात गौतम भिंगारदिवे यांच्या दुचाकीलाही आग लावण्यात आली. दोन्ही घटना एकाच वेळी घडल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. दरम्यान, खडेगोळवली येथील पाण्याच्या टाकीपासून कमलादेवी महाविद्यालयापर्यंत रस्त्यालगत उभी असलेली वाहनेही आरोपींनी लक्ष्य केली. यामध्ये एका रिक्षेसह १४ चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान करण्यात आले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात साहिल फिरोज शेख आणि एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमागील कारण तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. 0000