कल्याण : इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आक्रमक आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर शाखेच्या वतीने माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो पेट्रोल पंप जवळ निदर्शने करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारचा निषेध नोंदविला.
या आंदोलनामध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय, उपशहराध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईटकर, नगरसेवक गणेश लांडगे, विधानसभा सचिव योगेश सोहनी, शहर सचिव महेश मोरे, विभाग प्रमुख कपिल पवार, कामगार सेना सचिव सागर चाळसे, शाखाध्यक्ष दिनेश पाटील, दिलीप गायकवाड, उपविभाग अध्यक्ष संदीप घाडीगावकर, विभाग अध्यक्ष एंटक पाटील, मनविसे रुपेश पाटील, कल्याण पूर्व विधानसभा सचिव सनी खैरनार, उदय वाघमारे, देवेंद्र पिंगळे विभाग अध्यक्ष आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मायलेज कमी होत असून, इंजिन खराब होत असल्याचा मनसेचा दावा आहे.या मिश्रणामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. इथेनॉल धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचा सरकारचा दावा खोटा असून, याचा फायदा ठराविक कंपन्यांनाच होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सरकारने याविषयी स्पष्ट धोरण जाहीर करावे, इथेनॉलच्या सक्तीमुळे झालेल्या वाहनांच्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली.
