ठाणे : प्रती वर्षीप्रमाणे यंदाही श्री माँ विद्यालयाच्या वतीने आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही ‘योग’ स्पर्धा शनिवार २७ जूनला सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आली. इ. ५ वी ते १० वी मधील ठाणे, डोबिवली, बोरीवली, बदलापूर, अंबरनाथ इत्यादी शाळेतील विद्यार्थी या ‘योग’ स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले गेले. ठाण्यातील आणि ठाण्याबाहेर एकुण २७ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ‘योग’ स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे गुणवत्ता प्रशस्ती प्रमाणपत्र व चषक (ट्रॉफी) देण्यात आली. ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या दोन स्वरुप श्रेणींमध्ये घेण्यात आली होती.
निकाल पुढील प्रमाणे –
सिनियर ग्रुप – प्रथम पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; द्वितीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर; तृतीय – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणे
ज्युनिअर ग्रुप – प्रथम पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; द्वितीय – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणे; तृतीय – दि एसआयए प्रायमरी अँड हायस्कुल, डोबिवली
सिनियर ग्रुप (सोलो) – प्रथम पारितोषिक युनीव्हर्सल हायस्कुल, ठाणे; द्वितीय – डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; तृतीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर
ज्युनिअर ग्रुप (सोलो) – दि एसआयए प्रायमरी अँड हायस्कुल, डोबिवली; द्वितीय – अंबर इंटरनॅशनल स्कुल, ठाणे; तृतीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर
००००००००
