मुंबई : हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त खासदार आदरणीय अरविंदजी सावंत आणि जाणीव ट्रस्ट यांच्या पुढाकाराने तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशच्या सहकार्याने दक्षिण मुंबईतील कॅरम खेळाडूंकरिता रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ व १२ जुलै रोजी समाज मंदिर वातानुकूलित सभागृह, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई येथे हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक गटातील पहिल्या आठ क्रमांकाच्या खेळाडूंना रोख पारितोषिक व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी दक्षिण मुंबईतील कॅरमपटूंनी आपल्या आधार कार्डाच्या प्रतीसह दक्षिण विभागातील उबाठाच्या शिवसेना शाखेत ३ जुलैपर्यंत संपर्क करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.
