Month: June 2026

फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे योग दिन उत्साहात साजरा!

मुंबई: फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सूर्यनमस्कार चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला देशभरातून तसेच परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष.…

मैत्रीबोध परिवाराद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

रमेश औताडे मुंबई : मैत्रीबोध परिवाराने शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम, कर्जत येथे एका अनोख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून भारताच्या सभ्यतागत आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. या विचाराला अधिक बळ देण्यासाठी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाला उपस्थित होते.  या प्रसंगी  गोपाल कृष्ण अग्रवाल, आमदार  महेंद्र सदाशिव थोरवे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे  योगाचा अनुभव केवळ आसने आणि शारीरिक व्यायाम यापुरता मर्यादित न राहता, शरीर, मन आणि चेतना यांच्या एकात्मतेच्या रूपात घेता आला. कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणण्यासाठी गणेश वंदना तसेच भारताची प्राचीन योगिक कला असलेल्या मल्लखांबाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. मल्लखांब ही शक्ती, लवचिकता, संतुलन आणि शिस्त विकसित करणारी भारतीय परंपरेतील एक अद्वितीय कला आहे.

मिरा -भाईंदरकर नागरिकांवर पाणीटंचाई आणखी तीव्र

 एमआयडीसीची १० टक्के, तर स्टेमचीही २० टक्के पाणीकपात मिरा -भाईंदर :पावसाने ओढ दिल्याने शहरातील नागरिकांसाठी पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एमआयडीसीकडून १० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता स्टेम प्राधिकरणानेही २० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. ही कपात २४ जूनपासून लागू होणार असून त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने मे महिन्यात १० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानुसार एमआयडीसीकडून मिरा-भाईंदरला होणारा पाणीपुरवठा महिन्यातून दोन वेळा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यापूर्वी स्टेम प्राधिकरणाने कोणतीही कपात लागू केली नव्हती. आता स्टेमने २० टक्के पाणीकपात जाहीर केल्याने शहरातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात वगळण्याची आहे. या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महापौर डिंपल मेहता यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मिरा-भाईंदरला पाणीकपातीमधून मागणी केली होती. मात्र, ही मागणी प्रशासनाने फेटाळून लावली. सध्या एमआयडीसीच्या १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांना दर ४२ तासांनी पाणीपुरवठा केला जात आहे. स्टेमच्या नव्या २० टक्के कपातीनंतर हा कालावधी ४२ तासांवरून तब्बल ५५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी अधिक हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.

 खाशाबा जाधव पुरस्कार ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना जाहिर

– लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्हापूरः  पुण्यातील ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना गौरव करण्यात येणार आहे. कोल्हापूरात ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवार २३ जून रोजी हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खाशाबा जाधव पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम कोल्हापूर, कराडमध्ये ऑलिम्पिक दिनानिमित्त होत आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या सभागृहात सकाळी १० वाजता ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने बंडा पाटील  गौरवित केले जाणार आहे. शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह, रोख ५ हजार रूपये, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्योजक रोहित मुसळे, मनिष झंवर यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शासनाचे कुस्तीचे क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराचा समारंभ करणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पिकपटूंच्या परिवारातील शामराव जाधव व माणिक माणगावे, राष्ट्रीय खो-खो  खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीगीर पृथ्वीराज  मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे यांनी दिली आहे. १९६४ च्या टोकिओमधील ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरातील शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गावातील बंडा पाटील यांनी सलग ७ वेळा राज्य तर २ वेळा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकाचा पराक्रम केला आहे. राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेत कोल्हापूरच्या सानिका चाफेने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा यांचा खाशाबा जाधव पुरस्कारान गौरव करण्यात आला आहे. चौकट लेखक संजय दुधाणे यांचे सलग ३ कार्यक्रम ऑलिम्पिक दिनानिमित्त लेखक संजय दुधाणेंचे याचे कराड व कोल्हापूर येथे सलग ३ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे महान मल्ल खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यासाठी त्यांच्या चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचा विशेष संवाद कार्यक्रम सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालाच्या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्हापरकरांनी नागरी सत्कार केला होता. आता याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्कार समारंभ ऑलिम्पिक दिनी रंगणार आहे. यावेळी खाशाबामय असणारे संजय दुधाणे हे कोल्हापूरातील खाशाबांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.  कराडमध्येही लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम होणार आहे.

१९ वर्षांच्या रुद्रप्रताप पांडेचा मुंबईत धमाका

 ६५० किलो लेग प्रेस करून रचला नवा जागतिक विक्रम! राजेंद्र साळसकर मुंबई-द्द,अफाट शारिरीक ताकद आणि कधीही न डगमगणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर मुंबईच्या एका १९ वर्षांच्या तरुणाने क्रीडा जगतात नवा इतिहास रचला…

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश

ठाणे- काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औपचारिक कार्यक्रम न करता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश देण्यात आला.…

आदिवासींच्या प्रश्नांवर अंबरनाथ तहसीलदारांची तीन तास चर्चा; पाणीटंचाईसह विविध समस्यांवर निर्णय

००००००० ठाणे : आदिवासी कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत तहसीलदार अमित पुरी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी…

बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला सिटूचा जाहीर पाठिंबा

ठाणे- मुंबईकरांना वाहतुकीची अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक बेस्ट उपक्रमाच्या आजी, माजी व वेटलीज कामगारांनी केवळ आपल्या आर्थिक मागण्यांसाठीच नव्हे तर अत्यावश्यक सार्वजनिक बेस्ट सेवेचे अस्तित्व टिकविण्यासाठी, बेस्टच्या मालकीच्या बसेसचा ताफा…

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

ठाणे : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यातील एकल महिला,…

सारडा सर्कल परिसरातील ६५ अतिक्रमणे जमीनदोस्त

हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नाशिक महापालिकेने शनिवारी पहाटे धडक कारवाई करीत जुन्या नाशिकमधील सारडा सर्कल ते चौक मंडई, जहांगीर मशीद परिसर, डिलक्स हॉटेलमागील भागासह विविध ठिकाणांवरील सुमारे ६० ते ७० अनधिकृत दुकाने, टपऱ्या, पत्र्याचे शेड्स आणि इतर अतिक्रमणे हटविली. महापौर हिमगौरी आहेर आडके आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त (अतिक्रमण) सुवर्णा दखणे यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यासाठी महापालिकेचे सहाही विभाग पोलिस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सहभागी झाली होती. कारवाईपूर्वी दोन दिवस परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक व्यावसायीकांनी आपल्या दुकानातील साहित्य मित्रपरिवाराच्या मदतीने पिकअप वाहनांमधून इतरत्र हलविण्यास सुरुवात केली होती. काहींनी स्वखुशीने अतिक्रमणे हटविली, तर काहींनी प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. काही दुकानदारांनी उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे दोन ते तीन तासांचा अवधी मागितला. मात्र मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सारडा सर्कल परिसरातील कब्रस्तान आरक्षणाची जागा, विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता तसेच मंजूर अभिन्यासातील खुल्या जागांवर उभारण्यात आलेली अतिक्रमण हटविण्यात आली. डिलक्स हॉटेल मागील बाजूस मनपाच्या मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आलेले वाहनांचे भंगार साहित्यही हटविण्यात आले. आजच्या मोहिमेत फॅब्रिकेशन दुकाने, कपाट व कोट बनविणारे व्यवसाय, फूड स्टॉल, गॅरेज, मोबाइल रिपेअरिंग व मोबाइल शॉप्स, सर्व्हिस स्टेशन, फुलांची दुकाने तसेच अन्य अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. आ. फरांदे यांनी मानले आभार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे स्वागत केले. आयुक्तांची भेट घेत त्यांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक २३ अंतर्गत पखाल रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर मंगळवारी  कारवाई करण्यात येणार असून, यामध्ये अनधिकृत लॉन्स, मटण व चिकन दुकाने तसेच स्क्रॅप दुकाने यांचा समावेश आहे. रहिवाशांना पावसाळ्यानंतर मुदत हॉटेल यात्रिक परिसरातील तसेच काही अन्य ठिकाणांवरील अनधिकृत निवासी बांधकामांबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई टाळली आहे. शत्रुघ्न वाघचौरे, भरत वाघचौरे, कैलास हनुमान गांगुर्डे आणि किसन गांगुर्डे यांच्या घरांसह काही रहिवाशांना सप्टेंबर -ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानंतर जागा रिकामी न केल्यास अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. होर्डिंग हटविताना निर्माण झाला धोका साक्षी हॉटेलजवळील इमारतीवर लावण्यात आलेले मोठे जाहिरात होर्डिंग क्रेनच्या साहाय्याने हटविताना ते खाली कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी तातडीने नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्याचे आदेश दिले. परिसर रिकामा केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. गॅस गळतीमुळे धावपळ लोखंडी संरचना कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस कटरच्या सिलिंडरमधून काही काळ गॅस गळतीची घटना घडली. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्यामुळे अघटित घडण्याचा धोका होता. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मोठा फौजफाटा तैनात मोहिमेसाठी सहा जेसीबी, चार ट्रॅक्टर, क्रेन, गॅस कटरसह अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. महापालिकेचे सुमारे १०० ते १५० कर्मचारी, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, एनएमसी सुरक्षा पथक आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तसेच मुंबई नाका, पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.