– स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिर
मुंबई :   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिक सहाय्यक केंद्र संचलीत ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळातर्फे झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिरात शालेय लहान गटात श्रेयस जायभाये तर मोठ्या गटात रितू जगताप यांनी सर्वोत्तम योग शिबिरार्थीचा पुरस्कार पटकाविला. विजेत्यांना आकर्षक चषक व भेटवस्तू पुरस्कार स्वरुपात देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, केंद्राचे सचिव सुर्यकांत कोरे व मुख्याध्यापक महेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने शालेय १३९ मुलामुलींच्या सहभागाने झालेल्या योग शिबिरात लहान गटात काव्या म्हसकर द्वितीय व अर्णव कांबळे तृतीय तर मोठ्या गटात यश पोकळे द्वितीय व छायांक उघडे तृतीय पुरस्कार विजेते ठरले. प्रमुख पाहुणे लीलाधर चव्हाण यांनी शारीरिक तंदुरुस्ती व मनशांतीसाठी योग उपयुक्त असल्याचे सांगितले तर सचिव सुर्यकांत कोरे यांनी शास्त्रोक्त पध्दतीने प्रमुख योगासने करून घेत खुलासेवार माहिती दिली. वृषाली सावर्डेकर, संचित बुरुंगळे, संजय बर्गे, प्रवीण शिंदे, तानाजी खाडे, मनीषा पुराडकर आदी शिक्षक मंडळींनी योग शिबीर यशस्वी केले.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *