Month: June 2026

विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…

संपूर्ण मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे आणि ती अविरत चालवणारा प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुंबईचा कणा आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते आमदार सुनिल प्रभु यांनी दिंडोशी बस आगाराला भेट दिली आणि तिथे उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्या बेस्ट कर्मचाऱ्यांची व कामगार प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, त्यांच्या अडचणी आणि त्यांना भेडसावणारे विविध शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न प्रत्यक्ष समजावून घेतले. मुंबईकरांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजीव साबडे यांच्या ‘खाऊगल्ली’ या पुस्तकाचं बुधवारी प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांच्या ‘खाऊ गल्ली’  पुस्तकाचे लज्जतदार प्रकाशन बुधवार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत (रवींद्र नाट्य मंदिर) होणार आहे.…

शिळफाट्यात २९ अनधिकृत गोडाऊनवर प्रशासनाची कारवाई

 नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील यांच्या लक्षवेधीनंतर आरती परब दिवा,: प्रभाग क्रमांक २९ मधील नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर प्रशासनाने…

अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, अश्विनी केंद्रे यांचा प्रशासनाला इशारा

दिवा: दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे…

दादर येथे साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा

ठाणे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी संस्था) आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, थोर देशभक्त आणि प्रेमधर्माचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष…

केडीएमसीच्या वतीने ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी

 ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांचे महापौर, आयुक्तांना पत्र कल्याण : आगरी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने ४००-५०० चौरस फूट जागेत १० हजार पुस्तके, डिजिटल ऑडिओ स्टेशन, ई-लायब्ररी आणि स्मार्ट क्लासरूमसह ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी याबाबत केडीएमसी महापौर, आयुक्तांना पत्र दिले आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर आणि रायगड हा संपूर्ण भौगोलिक पट्टा ऐतिहासिकदृष्ट्या आगरी आणि कोळी समाजाचे मूळ वसतिस्थान आहे. या भूमीच्या विकासात आणि शहरीकरणात इथल्या मूळ भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिले आहे. परंतु, झपाट्याने होणाऱ्या या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आमची मातृभाषा असलेली ‘आगरी बोली’, आमची लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि आमचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत चालला आहे. कोणत्याही समाजाची भाषा जिवंत ठेवायची असेल, तर केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून न राहता तिचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दस्तावेजीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याच उदात्त हेतूने, ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने आम्ही आपणास एक नावीन्यपूर्ण ‘अत्याधुनिक डिजिटल आणि ऑडिओ आगरी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी अथवा समाजमंदिरात अंदाजे ४०० ते ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मर्यादित जागेत ‘मोबाईल कॉम्पॅक्टर’  तंत्रज्ञानाचा वापर करून १० हजार पुस्तकांचे संकलन, आगरी साहित्यासाठी एक ई-लायब्ररी, लुप्त पावत चाललेल्या ‘धवला’ गीतांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल ऑडिओ स्टेशन’ आणि भावी पिढीला या भाषेची ओळख करून देण्यासाठी एक ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचे अत्यंत सूक्ष्म तांत्रिक नियोजन सविस्तर प्रकल्प अहवालात  मांडले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा धोरण २०२४’ आणि ‘सांस्कृतिक थोरण २०२४’ मध्ये नमूद केलेल्या बोलीभाषा संवर्धनाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे केडीएमसीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एका ‘संस्कृती-रक्षक’ महानगरपालिकेच्या रूपात प्रस्थापित होईल. महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘सिटीझन सेंट्रिक’ कारभार राबवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला हा डिजिटल प्रकल्प अत्यंत पूरक ठरणारा आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून या ग्रंथालयासाठी जागा आणि आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था आणि ब-बोली च्या वतीने करण्यात आले आहे.

ठाण्यात विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न

००००००० ठाणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन आणि विकासाला समर्पित १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलच्या वतीने विद्यासागर विद्यालय, ठाणे…

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारानंतर राजकीय वातावरण तापले

 शिवसेना शिंदे व ठाकरे गट आक्रमक कल्याण : कल्याणमध्ये कचरा वेचून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. महेश गायकवाड म्हणाले, “ही घटना कल्याण-डोंबिवलीसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आम्ही सर्वतोपरी मदत करू.” दरम्यान, ठाकरे गटाने या घटनेवरून सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे अॅडव्होकेट नीरज कुमार यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. “कल्याण पूर्व भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर नेते आणि लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात येतात, मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “लाडक्या बहिणींच्या नावाने राजकारण केले जाते, पण महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते,” अशी टीकाही त्यांनी केली. या घटनेनंतर कल्याणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलुंड फोर्टिस हॉस्पिटलचे उल्हासनगरमध्ये मेडिकल सेंटर सुरू

डोंबिवली, २१ जून : फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने उल्हासनगर येथे नवीन फोर्टिस मेडिकल सेंटर सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सुलभ केली आहे. या केंद्रामुळे उल्हासनगर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना…