सुनिल इंगळे
उल्हासनगर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या १० लाख मोफत वही वाटप उपक्रमा अंतर्गत,नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा, शिवनेरी नगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई), उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद सालेकर, विभागप्रमुख प्रमोद पाण्डेय, विभाग संघटक आदेश पाटील, युवासेना उल्हासनगर संपर्क प्रमुख तुषार बांदल, विजय इंजे, प्रदीप आयरे, अनंत सावंत, अरुण कोळी तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व समस्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शिक्षण हीच खरी ताकद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध!” असलायचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी सांगितले.
०००००००
