Category: देश

National-News

माथेरान रेल्वे स्टेशनमध्ये सेल्फी फलक लावण्याची मागणी

माथेरान : माथेरान रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागात आय लव्ह माथेरान हा प्लास्टिक फलक अनेक दिवसांपूर्वी काढण्यात आल्यामुळे याठिकाणी सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होताना दिसून येत आहे. मिनिट्रेनने प्रवास करण्यास तिकीट…

इंद्रलोक अग्नितांडवमध्ये तीन निष्पापांचा बळी

भाईंदर पूर्व, येथील इंद्रलोक फेज ३ परिसरात काल रात्री सिलेंडर स्फोटामुळे घडलेली आगीची घटना केवळ एक अपघात नसून, तो महापालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या भ्रष्ट डोळेझाकपणाचा क्रूर परिणाम आहे. या भीषण दुर्घटनेत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या घटनेची माहिती मिळताच *महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेत ज्या निष्पाप मुलांनी आणि व्यक्तीने आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करत, त्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशासकीय ढिसाळपणामुळे सामान्य जनतेचा बळी जाऊ देणार नाही आणि इंद्रलोक परिसरात चालणारे हे अवैध साम्राज्य मुळासकट उखडून टाकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केले.सदर घटना घडलेला परिसर हा खाजगी मालकीचा असून तो कांदळवन क्षेत्रात येतो. नियमानुसार येथे कोणत्याही बांधकामाला परवानगी नसतानाही, भूमाफियांनी कांदळवनाची कत्तल करून येथे बेकायदेशीर वस्त्या वसवल्या आहेत. कमलेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने येथे अवैधरित्या झोपड्या बांधून गरिबांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले, तसेच बेकायदेशीर बोअरवेल आणि वीज जोडण्याही पुरवल्या होत्या. तब्बल २३ सिलेंडरचा स्फोट होणे, हे या परिसरात चालणाऱ्या मोठ्या अवैध धंद्यांचे जिवंत उदाहरण आहे.या भीषण परिस्थितीवर संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक तहसीलदार यांची कडक शब्दांत कानउघडणी केली.”वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष का केले? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच आज तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याला सर्वस्वी जबाबदार इथले प्रशासन आहे,” अशा शब्दांत सरनाईक यांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि तात्काळ सर्व अवैध वस्त्यांवर बुलडोझर फिरवण्याचे निर्देश दिले आहेत.या दुर्घटनेत मृत पावलेले व्यक्ती हे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असले तरी, ते बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीरा-भाईंदर शहरात वाढणारी ही घुसखोरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, पोलिसांनी अशा बेकायदेशीर झोपडपट्ट्यांची झाडाझडती घेऊन घुसखोरांवर तात्काळ कारवाई करावी, अशा कडक सूचना मंत्री सरनाईक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

लोकसभेत खासदार ५४३ वरून ८१६ होणार

लोकसभेत खासदार ५४३ वरून ८१६ होणार नवी दिल्ली: लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ ते १८ एप्रिल दरम्यान असे तीन दिवस वाढवण्यात आले…

 उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा

उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली – मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळेवर १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करावे, ‘स्वयंचलित’ दरवाजा बंद होणारी प्रणाली सर्व गाड्यांमध्ये अनिवार्य करावी आणि स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या. दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे अध्यक्ष असलेल्या रेल्वेच्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक संसद भवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या कमिटीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून खासदार नरेश म्हस्के व खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. रेल्वेच्या देशापातळीवरील विविध महत्वपूर्ण कामांची माहिती बैठकीत देऊन, चर्चा करुन निर्णय घेतले जातात व धोरण निश्चित केले जाते. रेल्वे राज्यमंत्री  वी. सोमन्ना, रवनीत सिंह बिट्टू तसेच रेल्वेचे केंद्रीय स्तरावरील सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई उपनगरीय सेवेबद्दल महत्वपूर्ण सूचना केल्या.  सुरक्षितता, नोकर भरती, धोरण व उपाययोजनेबाबत यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत विस्तृतपणे माहिती दिली. देशभरातून प्रत्येक राज्यातून ज्यांना या कमिटीमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे त्यांनी सुध्दा या बैठकीत चर्चा केली. आज देशपातळीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा जो विकास होत आहे त्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले. आज स्टेशनवर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू होत आहे. १२ डब्यांच्या ट्रेनमधून क्षमतेपेक्षा ४ पट अधिक प्रवासी मजबुरीने प्रवास करत आहेत. यामुळे ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होणे, जखमी होणे आणि कायमचा प्रवासी जायबंदी होण्याच्या घटना नित्याच्या झाल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणली. याकरता १५ डब्यांच्या लोकल गाड्या तातडीने मोठ्या संख्येने सुरु कराव्यात, स्वयंचलीत दरवाजे तातडीने बसवावेत, फलाटांची उंची व रुंदी वाढविण्याचे काम जे संथ गतीने सुरु आहे ते जलद गतीने सुरु करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच रेल्वे स्थानकांतील गर्दीवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याची महत्वपूर्ण सूचनाही नरेश म्हस्के यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढे मांडल्या. सिडको प्राधिकरण आणि रेल्वे यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे बेलापूर मधील रेल्वे स्थानकांचा विकास थांबला आहे. रेल्वे मंत्र्यांनी यात स्वत: लक्ष घालण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी करत दोन्ही प्राधिकारांमधील विसंवाद दुर करण्याची सूचना  केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता बेलापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी ठाणे, मिरा भाईंदर, वाशी आणि एमएमआर रिजन मधील रेल्वे स्थानकांच्या समस्यांचे निवेदन खासदार नरेश म्हस्के आणि खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले.

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली? -वर्षा गायकवाड

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली? -वर्षा गायकवाड नवी दिल्ली : अंगणवाडीतील पायाभूत सुविधा व कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये —विशेषतः अनधिकृत वस्त्यांमध्ये—अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणाची बोंबाबोंब आहे. केंद्र सरकारने यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, त्याची सविस्तर आकडेवारी द्यावी, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेत प्रश्न उपस्थित करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात सध्या किती अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत, जिथे स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत आणि या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत?महाराष्ट्रातील आदिवासी व पोषणदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ‘पोषण ट्रॅकर’  अंतर्गत संकलित करण्यात आलेल्या माहितीची सद्यस्थिती काय आहे व जन्मावेळी कमी वजन असलेल्या मुलांविषयीची अद्ययावत आकडेवारी काय आहे? ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत, मुंबईमध्ये काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या मुलांची प्रभागनिहाय संख्या किती आहे? तसेच, त्यांच्या पुनर्वसनासाठी निधीचा वापर केला जात आहे का? मुंबईसारख्या महानगरांमध्ये पोषणसेवा, अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत? असे प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत. वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला महिला व बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी उत्तर दिले आहे, मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत, अंगणवाडी केंद्रांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत, ‘मनरेगा’ (MGNREGA) योजनेशी समन्वय साधून, दरवर्षी १०,००० या दराने एकूण ५०,००० अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम केले जात आहे. या योजने अंतर्गत, निधीची तरतूद करण्यात आली असून MGNREGA अंतर्गत ₹८.०० लाख, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत (किंवा इतर कोणताही विना-निर्बंध निधी) ₹२.०० लाख, आणि महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ₹२.०० लाख; हा निधी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये, निधी-वाटपाच्या विशिष्ट पद्धतीवर आधारित असलेल्या गुणोत्तरामध्ये विभागला जातो. अंगणवाडी केंद्रांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने, मंत्रालयाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, यामध्ये, इतर बाबींसह, अंगणवाडी केंद्रांमधील पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालयांसाठी वाटप करण्यात येणारा निधी अनुक्रमे ₹१०,००० वरून ₹१७,००० पर्यंत आणि ₹१२,००० वरून ₹३६,००० पर्यंत वाढवण्याचा समावेश आहे.’मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांच्या अधिकारक्षेत्रात येते. ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांची (AWCs) एकूण संख्या—तसेच पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा आणि विकास देखरेख निर्देशकांवर आधारित कार्यरत अंगणवाडी केंद्रांची संख्या https://www.poshantracker.in/statistics या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना ‘टेक-होम रेशन’ (THR) चा पुरवठा अखंडितपणे होत राहील याची खात्री करण्यासाठी, ‘पोषण ट्रॅकर’मध्ये ‘नॉमिनी मॉड्यूल’ सुरू करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, ‘मिशन वात्सल्य’च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाला ₹१४४.९७ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली. याव्यतिरिक्त, बाल संगोपन संस्थांच्या (CCIs) माध्यमातून ३,६६७ मुलांना लाभ मिळाला, आणि ‘मिशन वात्सल्य’च्या संस्थाबाह्य संगोपन घटकाअंतर्गत ३२,५२० मुलांना सहाय्य पुरवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही”, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च…

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता मडगाव (गोवा) : येथे सुरू असलेल्या Yonex Sunrise ४८व्या भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५-२६ मध्ये मुंबईच्या मुरली सुब्रमण्यम यांनी ६० वर्षांवरील एकेरी गटात दमदार कामगिरी करत…

मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा – वर्षा गायकवाड

मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा – वर्षा गायकवाड नवी दिल्ली : मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामामुळे हजारो कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्या घरांवर तोडफोडीचे संकट निर्माण झाले आहे.  स्थानिकांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. ही फक्त झोपडपट्टी नाही, तर हजारो कुटुंबांचे संसार आणि त्यांच्या मुलांचे भविष्य आहे. या लोकांनी कष्टाने उभारलेल्या घरांचे संरक्षण व्हावे व  त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत शून्य प्रहरात कुर्ला ट्रॉम्बे झोपडपट्टीवासियांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कुर्ला–ट्रॉम्बे मार्गालगत असलेल्या ३,१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्यासाठी रेल्वे प्रशासन नोटीसा पाठवत आहे. ही झोपडपट्टी दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात असून हजारो गरीब व कष्टकरी कुटुंबांचे ते घर आहे. ३,००० हून अधिक झोपड्या पाडणे हे अमानवी व अव्यवहार्य असून हजारो कुटुंबे रातोरात बेघर होतील. हे पाडकाम करण्याआधी बाधित कुटुंबांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करावे. मुंबईत लाखो नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, केंद्र सरकारच्या जागेवरील या लोकांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे ठोस धोरणाच नाही. राज्य आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी धोरण तयार करावे. या विषयावर संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली आहे, सरकारने या लोकांना बेघर करू नये असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

नाबाद८९३१ दिवस !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनातील नवा विक्रम स्थापित केला आहे. तब्बल सलग ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी…

 खासदार नरेश म्हस्के वाढदिवशी प्रत्यक्ष भेटणार नाहीत

खासदार नरेश म्हस्के वाढदिवशी प्रत्यक्ष भेटणार नाहीत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याने शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. या आदर्श निर्णयाचे अनुकरण करत  खासदार नरेश म्हस्के यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी, २४ मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र परिवार दरवर्षी मोठ्या जल्लोषात खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र यंदा आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत   खासदार नरेश म्हस्के यांनी  आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नरेश म्हस्के यांना दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक हारतुरे घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी येत असतात. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने खासदार नरेश म्हस्के हे दिल्लीत असून वाढदिवशी  प्रत्यक्ष ठाण्यात कोणालाही भेटू शकणार नाहीत. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता असल्याने कार्यकर्ते, हितचिंतक वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा देत असल्याने त्यांचा स्वीकार करत खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यकर्ते, हितचिंतकांचे आभार मानले आहेत.