अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने वानखेडवर दिमाखात रणजी विजेतेपद पटकावले. रणजी ट्राॅफी जिंकण्याची मुंबईची ही ४२ वी वेळ आहे. तर फायनल गाठण्याची मुंबईची ही ४८ वी वेळ आहे. तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर मुंबईने ही अजिंक्य कामगिरी केली आहे. फायनलमध्ये मुंबईने विदर्भ संघाचा १६९ रन्सने पराभव केला.