नवी मुंबई : महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील श्री.बळीराम फकीर भोईर (जागामालक व विकासक), तळवलीगांव, यशलॉजजवळ, घणसोली, नवी मुंबई येथे यांचे तळमजला + दोन मजल्याचे आर.सी.सी., बांधकाम पुर्ण झाले होते. नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम केले होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी आतील भागात अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरच्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेने तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम 01 जेसीबी मशिन्स, 02 ब्रेकर, 01 गॅस कटर, व 12 कामगार यांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी मुख्यालयातील तसेच घणसोली अतिक्रमण विभागातील अधिकारी / कर्मचारी, व पोलिस पथक तैनात होते. यापुढे देखील अशाप्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.