मालेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज धुळ्यात महिलांसाठी विविध घोषणांचा काँग्रेसचा वचननामाच जणू त्यांना जाहिर केला. काँग्रेस सत्तेत आल्यास भारतातील प्रत्येक गरीब महिलेला आम्ही लखपती करू अशी घोषणा त्यांनी केली.
गरीब महिलांसाठी आम्ही बँक खात्यात १ लाख रुपये वर्षाला देणार आहोत. नरेंद्र मोदी जर करोडपतींचे कर्ज माफ करणार असेल तर आम्ही गरिबांचे करणार आहोत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
मोदींनी मोठ्या धूम धडाक्यात महिला आरक्षण दिले. फटाके फोडले नाचले आणि सांगितले गेले की, सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देणार असे म्हणण्यात आले. काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेच आरक्षण देणार. कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये देणार. सरकारी नोकरीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार. आशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार. सावित्री बाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार आहे, अशा घोषणा काँग्रेसकडून धुळे येथे झालेल्या महिला मेळाव्यात करण्यात आल्या.
धुळ्यानंतर मालेगावमध्ये राहुल गांधी यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. रोड शो नंतर त्यांनी जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशात 22 असे लोक आहेत. ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच 70 कोटी लोकांकडे आहे. 24 वर्षासाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागते. तितकीच कर्ज माफी मोदी सरकारने 16 लाख करोड रुपये 22 उद्योगपतींना दिले आहे, अशी आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली आहे.