माथेरान : बुधवार दि.20 मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात बाळासाहेब भवन, कर्जत येथे संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान तालुका प्रमुख संभाजी जगताप व जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी निवडणुकीच्या नियोजन संदर्भात सूचना केल्या.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महायुतीच्या माध्यमातुन या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. महायुतीचे तीनही प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती मधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत. यापुढील लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातुन सर्वाधिक मताधिक्य हे कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातून मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना करून दिली. यापुढे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अश्या सूचना केल्या.
या बैठकीला जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर, जिल्हा सल्लागार गजूभाई वाघेश्वर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, तालुका संघटक सुनील रसाळ, तालुका समन्वयक रमेश मते, युवासेना जिल्हाप्रमुख जयेंद्र देशमुख, युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ, उपतालुकाप्रमुख विभागप्रमुख, तसेच जिल्हा परिषद विभागातील व कर्जत शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा सचिव पदी रत्नाकर कोळंबे व संतोष भोईर यांची रायगड जिल्हा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. या दरम्यान कर्जत तालुका आदिवासी सेलच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या.