नितीन दूधसागर

ठाणे : श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे २२ वर्षे वास्तव्य होते. तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२ एकरांच्या जागेवर भव्य असा अनुभुती प्रकल्प साकारण्यात येत आहे.
अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामीसमर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली १०८ फुटी भव्य मूर्ती (स्टॅच्यु ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार असून त्यासोबत दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंच कर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांची असून श्री महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तू विशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांनी अक्कलकोट संस्थानची सुमारे २५० कोटीहून जास्त मुल्याची ४२ एकर जागा सेवा स्वरूपात दिलेली आहे. आता सर्व स्वामीभक्तांचा स्वामीसेवा स्वरुपात या प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा राहावा अशी इच्छा श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांनी व्यक्त केली.
यावेळी ध्वनी – चित्रफीतीच्या माध्यमातून अनुभुती या भव्य प्रकल्पाचे सादरीकरण देखील करण्यात आले. यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे व डॉ. महेश नामपुरकर उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकल्पाची माहिती www.swamisamarthanubhuti.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
सुयोग्य प्रकाश योजना, दिशा दर्शक फलक, भाविकांना मनःशांती प्रदान करणारी भारतीय आध्यात्मिक वृक्ष आणि फुलझाडांची नक्षत्र वन हे देखील या प्रकल्पाचे आकर्षण ठरणार आहे. तज्ज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागीरांच्या कलाविष्कारातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनात आपला वेगळा ठसा उमटविणारा ठरणार आहे.
या प्रकल्पाव्दारे पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देण्यात येणार असून अक्कलकोटच्या राजघराण्याची झलक देखील यातून मिळणार आहे. यातील शाही निवासस्थान अनुभूती प्रकल्पाला समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारे ठरणार आहे.

प्रकल्पाची विस्तृत माहिती

ब्रह्मस्थान (स्टॅच्यु ऑफ मिरॅकल) ह्या नावाने श्री स्वामी समर्थ महाराज यांची १०८ फुटी पंचधातूमध्ये मूर्ती उभारण्यात येणार आहे. ब्रहास्थान (स्टॅच्यु ऑफ मिरॅकल) हे प्रस्तावित प्रकल्पाच्या आरेखनाला परिपूर्ण आणि चपखल अर्थ प्रदान करणारे आहे. येथे चौथन्यावर स्थापित श्री स्वामी समर्थाचे भव्य शिल्प शांतता आणि समतोलाची अनुभुती देणारे असणार आहे. सादर १०८ फुटी मूर्तीच्या खाली २२ फुटी कमळ आहे. त्या कमळाच्या खाती ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र भाविकांसाठी चालू असणार आहे.
स्टुडिओ अपार्टमेंट :- विविध सोयी सुविधांनी युक्त स्टुडिओ अपार्टमेंट या निवासस्थानात यजमान आणि अतिथींना सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत ७८७
बहुउद्देशीय रुग्णालय आणि पार्किंग: अनुभूती प्रकल्पामधील येणाऱ्या उत्पन्नातून अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले हे बहुउद्देशीय रुग्णालय समाजाप्रती असलेली सेवेची बांधिलकी व्यक्त करण्यात येणार आहे. मानवतेचे प्रतीक असलेले बहुउद्देशीय रुग्णालय अवकोलकोटवासीयांच्या सेवेसाठी निः शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या पार्किंग साठी ५०० कार, पाच बस आणि अग्निशामक यंत्रणा उभी करण्यासाठी वृक्षेच्या छायेखाली जागा उपलब्ध करून देणार आहे. याठिकाणी कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहे. सदरचे पार्किंग हे वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापासून साधारण १०० मीटर अंतरावर आहे.जदिव्य दर्शन :- दिव्य दर्शनमधील दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव कामातून पर्यटकांना श्री स्वामी समर्थाच्या जीवन चरित्राचा आस्वाद १८ गुफांमधून घेता येणार आहे. येथील प्रत्येक शिल्पा मधून भाविक आणि पर्यटकांना निराळा अनुभव मिळणार आहे.
पंच कर्मा रिसॉर्ट :- १०८ फुटी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती समोर आणि स्वामींच्या सानिध्यात असलेले १८ वैशिष्टपूर्ण बंगल्याचे रिसॉर्ट देखील उभारण्यात येणार आहे.
।फूड कोर्ट :- स्वामी समर्थ महाराज यांची भव्य मूर्तीच्या परिसरात असलेले फूड कोर्ट मध्ये २० वेगवेगळे चविष्ट उपहारगृह अक्कलकोट वासियांसाठी व भाविकांसाठी उभारण्यात येणार आहेत.
प्रकाश, ध्वनी आणि जलाचा मनोहारी सांगीतिक आविष्कार असलेल्या लाईट आणि संगीत कार्यक्रम या विभागातून पर्यटकांना अतिउच्च आनंदाचा अनुभव मिळणार आहे. या प्रकल्पाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला प्रसादम् विभागात सात्विक प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
कुंजर बन :- शाही हत्तींचे परिपूर्ण निवासस्थान असलेल्या विभागाचे नामकरण कुंजर बन असे करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची माहिती www.swamisamarthanubhuti.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *