माथेरान : रायगड जिल्हात आदिवासी समाजातील अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील भावी खासदार मा. संजोग वाघेरे पाटील यांची भेट घेतली.
आदिवासी समाजाला लोकशाही व संविधानाचे महत्व काय आहे याची जाणीव होऊ लागली आहे. त्यासाठी लोकशाही व संविधान टिकणे आवश्यक आहे, अशी चर्चा करत आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण, बेकायदेशीरपणे असणारी खरेदी- विक्री, वन जमिनी तसेच आदिवासींच्या गावठाण या सारखे अनेक विषयाबाबत भेट घेऊन मावळचे भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आदिवासी समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष जयवंत शिद, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते विष्णूशेठ खैर, सोबत शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, जेष्ठ शिवसैनिक पिंगळे आदी. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *